समाजातील वंचित घटकांसाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी समाजानेदेखील उभे राहावे या हेतूने ‘लोकसत्ता’ने हाती घेतलेल्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचे हे आठवे पर्व. वंचित घटकांसाठी तसेच विज्ञाननिष्ठ व उपक्रमशील शिक्षण, आरोग्यप्रसार, वाचनसंस्कृतीत भर घालून ती नेटाने पुढे नेणाऱ्या संस्था, कलाविषयक संचिताचा वसा हाती घेऊन अविरतपणे कार्यरत असलेल्यांच्या कामाला आर्थिक आधार मिळावा हा या उपक्रमाचा मुख्य हेतू. गेल्या सात वर्षांत अशा ७०हून अधिक संस्थांची माहिती गणेशोत्सवाच्या कालावधीत ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केली व वाचकांना मदतीचे आवाहन केले. या उपक्रमाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या वर्षीच्या गणेशोत्सवातही ‘लोकसत्ता’ने दहा संस्थांच्या कामाची ओळख करून दिली. या संस्थांना मदत करण्यासाठी मिळत असलेला वाचक सहभाग यंदाही तितकाच उत्स्फूर्त असल्याचे अनुभवास येत आहे. मदतीच्या धनादेशाचा ओघ ‘लोकसत्ता’ कार्यालयांकडे येऊ लागला असून एक हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांची मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे प्रसिद्ध करीत आहोत..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा