|| विद्याधर कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोलापुरात ज्येष्ठ संगीत अभ्यासक प्रा. श्रीराम पुजारी यांच्या पुढाकाराने २००७ मध्ये संगीत संग्रहालय सुरू झाले. त्यात शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, कर्नाटक संगीत, गजल, ठुमरी, भक्तिगीते, भावगीते, नाटय़संगीत असा विविध गानप्रकारांचा अमूल्य ठेवा जतन करण्यात आला आहे. रसिकांना दुर्मीळ संगीताचा श्रवणानंद देतानाच या संगीतठेव्याचे डिजिटायझेशन करण्याचा संकल्प संग्रहालयाने केला आहे.

गिरणगाव अशी सोलापूरची ओळख. लक्ष्मी-विष्णू मिल, एन. जी. मिल आणि जुनी गिरणी या तीन गिरण्या येथील लोकांच्या रोजगाराचे केंद्र होत्या. सोलापुरी चादर आणि सोलापूरची शेंगदाणा चटणी जगभरात लोकप्रिय आहे. सिद्धेश्वर हे ग्रामदैवत आणि संक्रांतीपासून सुरू होणारी गड्डय़ाची यात्रा हा सोलापूरकरांच्या श्रद्धेचा आणि जिव्हाळ्याचा विषय होता. तुटपुंज्या पगारामध्ये प्रपंच चालवताना मनोरंजनाची हौस ‘भागवत’मध्ये पूर्ण करायची, एवढेच येथील लोकांना ठाऊक होते. पूर्वी गिरणीची ‘शिफ्ट’ म्हणजेच पाळी सुरू होताना आणि संपताना वाजणाऱ्या भोंग्याचे संगीत सोलापूरकरांच्या नित्य परिचयाचे झाले होते. मात्र, रेडिओवरून प्रसारित होणारी गीते ऐकण्याचा छंद अनेकांनी जोपासला. काळाच्या ओघात गिरण्या बंद पडल्या आणि रेडिओची जागा दूरचित्रवाणीने घेतली. सोलापूर शहरामध्ये संगीताची आवड जपली गेली. त्यातही अभिजात संगीताचे शिक्षण देणाऱ्या संस्थांमुळे युवा कलाकारांना शास्त्रीय संगीताविषयी गोडी वाटू लागली. ही बाब ध्यानात घेऊन शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाने २००७ मध्ये संगीत संग्रहालय सुरू केले. त्यासाठी ज्येष्ठ संगीत अभ्यासक आणि मर्मज्ञ रसिक प्रा. श्रीराम पुजारी यांची प्रेरणा कारणीभूत ठरली. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर ‘श्रीराम पुजारी संगीत संग्रहालय’ असे या संग्रहालयाचे नामकरण करण्यात आले.

स्वातंत्र्यपूर्व काळात १८५३ मध्ये श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाची स्थापना झाली. मुरारजी पेठ या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वाचनालयासाठी वालचंद उद्योगसमूहाने देणगी दिली होती. १६६ व्या वर्षांत पदार्पण केलेल्या वाचनालयाचा जुळे सोलापूर भागात विस्तारित कक्ष कार्यरत आहे. विष्णू नारायण शिवापूरकर अभ्यासिका, रामकृष्ण रामय्या रापेल्ली बालविभाग असे दोन स्वतंत्र विभाग आहेत. वाचनालयातील संपूर्ण पुस्तकांचे बारकोडीकरण आणि संगणकीकरण पूर्ण झाले असून ग्रंथालयामध्ये संदर्भ ग्रंथांचे वाचन करण्यासाठी स्वतंत्र दालनाची सोय करण्यात आली आहे. वाचनालयातर्फे सोलापूरकर रसिक वाचकांसाठी नावीन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. डॉ. प्रकाश जोशी हे वाचनालयाचे अध्यक्ष असून, प्रा. शंकर साळुंके उपाध्यक्ष आहेत. प्रा. श्रीकांत येळेगावकर प्रमुख कार्यवाह, दत्ता गायकवाड आणि डॉ. श्रीकांत कामतकर कार्यवाह असून प्रा. पुष्पा आगरकर, श्रीनिवास येमूल, नरसिंग मेंगजी, मंजूषा गाडगीळ, आनंद कुंभार, मोहन सोहनी, प्रा. सुलभा पिशवीकर, प्रा. नभा काकडे, अ‍ॅड. धनंजय माने आणि नितीन वैद्य यांचा कार्यकारी मंडळामध्ये समावेश आहे. अ‍ॅड. नीला मोरे, डॉ. नवनीत तोष्णीवाल, वालचंद समूहाचे प्रतिनिधी शेठ राजस रतनचंद यांचा स्वीकृत सदस्यांमध्ये अंतर्भाव आहे.

वाचनालयाच्या प्रा. श्रीराम पुजारी संगीत संग्रहालयामध्ये शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, कर्नाटक संगीत, गजल, ठुमरी, भक्तिगीते, भावगीते, नाटय़संगीत असा विविध गानप्रकारांचा अमूल्य ठेवा जतन करण्यात आला आहे. ग्रामोफोन रेकॉर्ड्स, ध्वनिफिती म्हणजेच कॅसेट्स, कॉम्पॅक्ट डिस्क (सीडी), व्हिडीओ कॉम्पॅक्ट डिस्क (व्हीसीडी) अशा विविध माध्यमांतून हा संग्रह उपलब्ध आहे. ज्येष्ठ गायक पं. प्रभुदेव सरदार यांच्या गायनाच्या ७५ कॅसेट्स असून ठुमरी आणि दादरा गायन प्रकाराच्या ८० रेकॉर्ड्स आणि तीनशे सीडी उपलब्ध आहेत. शास्त्रीय संगीतामध्ये कंठसंगीत, वाद्यसंगीत मिळून ६५० रेकॉर्ड्स आहेत. गजल गायनाच्या ४० रेकॉर्ड्स, नाटय़संगीताच्या ५५ रेकॉर्ड्स आणि अभंगांच्या ४५ रेकॉर्ड्स आहेत. संग्रहालयाने संगणकावर १२०० जीबी संगीताचे जतन करून ठेवले आहे. मोहन सोहनी संगीत संग्रहालयाचे प्रमुख म्हणून काम पाहतात. त्यांना या कामामध्ये राजेंद्रकुमार कांबळे यांचे सहकार्य लाभते.

श्रीराम पुजारी संगीत संग्रहालयाची सुरुवात कशी झाली, याची कथा मोठी रंजक आहे. ‘सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स’ ही जुन्या आणि दुर्मीळ संगीताचे जतन करणारी संस्था कार्यरत आहे. त्या वेळी बँकेत नोकरीस असलेले जयंत राळेरासकर आणि राज्य विद्युत मंडळामध्ये कार्यरत असलेले मोहन सोहनी यांनी या संस्थेची शाखा सोलापूरमध्ये सुरू केली. या संस्थेमार्फत १९७२ पासून दोघेही आपल्या स्तरावर रेकॉर्ड्स संकलित करण्याचे काम करत होते. आपल्या संग्रहातील हा दुर्मीळ ठेवा रसिकांसाठी खुला करावा आणि त्यांनाही संगीताचा आनंद लुटता यावा या उद्देशातून ‘सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स’ सोलापूर शाखेतर्फे १९९२ पासून सेवासदन प्रशालेच्या सभागृहामध्ये नियमितपणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. रेकॉर्ड म्हणजे काय याची रसिकांना माहिती व्हावी यासाठी रेकॉर्ड्सचे प्रदर्शनही भरविले होते. रेडिओ आणि ग्रामोफोन यांचे मिश्रण असलेला रेडिओग्राम या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आला होता. या रेडिओग्राममध्ये सुधीर फडके यांच्या स्वरांतील गीतरामायण उपलब्ध आहे.

हिराचंद नेमचंद वाचनालयाची नवी वास्तू १९९४ मध्ये साकारली गेली. त्या वेळी राळेरासकर आणि सोहनी यांनी आपल्या संग्रहातील रेकॉर्ड्स संस्थेला देत या वास्तूमध्ये संगीत संग्रहालय सुरू करण्याची संकल्पना मांडली.  या रेकॉर्ड्स योग्य ठिकाणी सुरक्षित राहाव्यात हा उद्देश त्यामागे होता. संस्थेच्या प्रमुखपदी असलेले डॉ. श्रीराम पुजारी यांनी ही संकल्पना उचलून धरली आणि स्वतंत्र जागा निश्चित करून संगीत संग्रहालय सुरू करण्यात आले. हे संग्रहालय सुरू करताना पुजारी यांनी त्यांच्या संग्रहातील दिग्गज गायक कलाकारांच्या सुमारे तीनशे मैफलींच्या ध्वनिमुद्रणाचा संग्रह भेट स्वरूपात दिला. संग्रहालय सुरू झाल्याचे समजताच अनेक संगीतप्रेमी रसिकांनी आपल्या व्यक्तिगत संग्रहातील रेकॉर्ड्स संग्रहालयाला भेट दिल्या. त्यामुळे संग्रहालयाचा साठा वाढण्यास मदत झाली. या विषयातील डॉ. पुजारी यांचे योगदान ध्यानात घेऊन संगीत संग्रहालयाचे ‘श्रीराम पुजारी संगीत संग्रहालय’ असे नामकरण करण्यात आले. एल. पी. (लाँग प्ले) रेकॉर्ड्स, ई. पी. (एक्स्टेंडेड प्ले) रेकॉर्ड्स, एकाच बाजूला ध्वनिमुद्रण असलेल्या वन सायडेड रेकॉर्ड्स, ध्वनिफिती म्हणजेच कॅसेट, सीडी आणि पेन ड्राइव्ह अशा वेगवेगळ्या स्वरूपांतील संगीत संग्रह येथे पाहावयास मिळतो. वन सायडेड रेकॉर्ड स्वरूपात गौहरजान यांच्या आवाजातील पाच रेकॉर्ड्स आहेत.

संग्रहालयातील दुर्मीळ संगीत श्रोत्यांना ऐकविण्यासाठी दरमहा किमान एक कार्यक्रम आयोजित केला जातो. ज्येष्ठ संगीतकार सी. रामचंद्र यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी स्वरबद्ध केलेल्या हिंदूी चित्रपटगीतांची चित्रफीत दाखविण्याबरोबरच साहिर लुधियानवी यांच्या गीतांवर आधारित दृक्-श्राव्य कार्यक्रम आणि ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्यावर चित्रित झालेल्या गीतांवर आधारित कार्यक्रम असे कार्यक्रम संगीत संग्रहालयामध्ये सादर करण्यात आले. ध्वनिमुद्रित स्वरूपात असलेल्या संगीताच्या अमूल्य ठेव्याचे डिजिटायझेशन करण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. याचे कारण रेकॉर्ड्सचे आयुष्य किती असेल याचा अंदाज बांधता येणे शक्य होत नाही. ग्रामोफोन दुरुस्त करणारा एकमेव कारागीर सोलापूरमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे ग्रामोफोन बिघडल्यानंतर त्यांना दूरध्वनी करून बोलावले जाते. सीडी आणि व्हीसीडीच्या जमान्यात कॅसेट्स आता कालबाह्य़ झाल्या आहेत. त्यामुळे कॅसेटमधील बरेचसे ध्वनिमुद्रण सीडी माध्यमात नेऊन ठेवले आहे. त्याचप्रमाणे संस्थेने दीड हजार जीबी एवढय़ा क्षमतेचे ध्वनिमुद्रण करून ठेवले आहे. संगीताचे शिक्षण घेणारे विद्यार्थी, अभ्यासक आणि जाणकार रसिकांसाठी हा संग्रह खुला  आहे.

संगीताचा खजिना

संगीत संग्रहालयामध्ये शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, कर्नाटक संगीत, वाद्यसंगीत, चित्रपटगीते, नाटय़गीते, भावगीते अशा वैविध्यपूर्ण संगीताचा संग्रह आहे. उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद फय्याज खाँ, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. बसवराज राजगुरू, गंगुबाई हनगल, पं. फिरोज दस्तूर अशा दिग्गज कलाकारांसह उस्ताद झिया मोईनुद्दीन डागर यांचे रुद्रवीणावादन आणि सोलापूरचे सिद्राम जाधव यांचे सुंद्रीवादन असा संगीताचा खजिना आहे. डॉ. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेल्या ‘कटय़ार काळजात घुसली’ नाटकाचे ऑडिओ ध्वनिमुद्रण संग्रहालयाकडे उपलब्ध आहे. येथे एक ग्रामोफोन, दोन रेकॉर्ड प्लेअर आणि अ‍ॅम्प्लिफायर यासह इतर साधनसामग्री आहे.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल?

श्रीराम पुजारी संगीत संग्रहालय

सोलापूर एसटी स्थानकातून बाहेर पडल्यानंतर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून रिक्षाने अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर. सोलापूर रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर महात्मा गांधी पुतळ्यापासून रिक्षाने दहा मिनिटांच्या अंतरावर.

श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाचे श्रीराम पुजारी संगीत संग्रहालय १३४, मुरारजी पेठ, सोलापूर – ४१३००१ (दूरध्वनी क्र. ०२१७-२७२६६२०)

धनादेश -‘श्री हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर’

(Shri Hirachand Nemchand Wachnalaya, Solapur)

या नावाने काढावा. धनादेशामागे अथवा सोबत देणगीदाराने त्याचे संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा. त्यावरून संस्थेला पावती पाठविता येईल. संस्थेकडे धनादेश ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुपूर्द केले जातील.