दीपक महाले

कचरावेचक हा समाजातला उपेक्षित घटक.  पुस्तकांऐवजी कचऱ्याची पिशवी त्यांच्या मुलांच्या हाती येत़े  जळगावातील सुधर्मा ज्ञानसभा संस्थेने या मुलांना ज्ञानवेचक बनविण्याचा निर्धार केला़  गेल्या दोन दशकांत अशी अनेक मुले ज्ञानकण वेचून विविध क्षेत्रांत उच्चपदावर पोहोचली आहेत़  

Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
agricultural pumps powered
राज्यात १.३० लाखांवर कृषिपंपांना दिवसा ‘ऊर्जा’, सौर ऊर्जेद्वारे…
amravati rain news
अमरावती : थंडीची लाट…! विभागीय आयुक्तांनी काय दिला इशारा?
Borivali air, Air pollution Mumbai, Air pollution Borivali,
बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच
Subsidy e-rickshaw Pimpri, Pimpri municipal corporation,
पिंपरी : ई-रिक्षाधारकांना ३० हजार रुपये अनुदान; काय आहे महापालिकेचा उपक्रम?
Mumbai zopu yojana loksatta news
घर मिळालेल्या झोपडीवासीयांच्या नावे पुन्हा पात्रता! घोटाळा उघड होऊन वर्षभरानंतरही कारवाई नाही

वा ढत्या गरिबीबरोबर कागद, काच, पत्रा, प्लास्टिक आणि भंगार वेचकांची संख्याही वाढते आहे. त्यात बालक-किशोरवयीन मुलांची संख्या मोठी. खेळण्यांऐवजी या मुलांच्या हाती कचऱ्याची पिशवी येते. सर्वसाधारण कुटुंबातील मुले शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडतात त्यावेळी अशा मुलांना कचरा वेचण्यासाठी बाहेर पडावे लागते. गरिबीशी झुंजण्यासाठी त्यांना कचऱ्याचा आधार असतो. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गढून गेलेल्या या मुलांच्या आयुष्याला आकार देण्याचे काम जळगावातील सुधर्मा संस्थेचे संस्थापक हेमंत बेलसरे आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. 

बेलसरे हे नोकरीनिमित्ताने नशिराबादहून जळगावला ये-जा करीत असताना एका मन हेलावणाऱ्या प्रसंगातून या कार्याकडे वळल़े  एके दिवशी नशिराबादहून जळगावला रिक्षाने कार्यालयात जात असताना त्यांना प्रभात चौकाजवळ कचराकुंडीभोवती लहान मुलांची गर्दी दिसली़  नीट निरखून पाहिले असता, उष्टावलेल्या पत्रावळींवरचे अन्न गोळा करण्यासाठी या मुलांची धडपड सुरू असताना कुत्रे, डुकरांचीही त्यांच्याशी स्पर्धा सुरू होती़  हे चित्र पाहून विषण्णावस्थेतच त्यांनी कार्यालय गाठल़े  ही मुले कुठे राहतात, याची माहिती घेऊन त्यांनी दुपारी भोजनावेळी कार्यालयातील सहकाऱ्यांना हा प्रकार सांगितला़  या मुलांसाठी काहीतरी विधायक काम करण्याच्या निश्चय करून काही सहकाऱ्यांनी दरमहा ठरावीक रक्कम देणगी म्हणून देण्याचे ठरवल़े  त्याच दिवशी सायंकाळी बेलसरे हे पत्नीसह ही मुले राहत असलेल्या झोपडपट्टीत पोहोचले. अर्थात, या मुलांचे पालक हे कचरावेचक होते. त्यांनी मुलांना शाळेत घातलेले नव्हते. बेलसरे यांनी प्रथम पालकांचे प्रबोधन केल़े  मुलांनीही शिकण्याची तयारी दर्शवली आणि त्यांच्या झोपडीजवळ एक अनोखी शाळा सुरू झाली़  हेमंत बेलसरे यांना त्यांच्या पत्नी सुनीता या सुरुवातीपासूनच मदत करत होत्या़  एके दिवशी जळगाव आकाशवाणीच्या उद्घोषिका उषा शर्मा या झोपडपट्टीजवळून जात असताना त्यांनी ही बिनिभतीची शाळा पाहिली. याबाबत सविस्तर माहिती घेऊन त्यांनी ‘बिनिभतीची शाळा’ हा कार्यक्रम आकाशवाणीवर प्रसारित केल्यानंतर जळगावकरांना बेलसरे दाम्पत्याच्या या कार्याची ओळख झाली़

जून २००१ मध्ये या मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देण्याचे बेलसरे यांनी ठरविले. शाळेत दाखल करण्यासाठी जन्मदाखल्याची गरज होती. पालकांना जन्मतारीखही माहीत नव्हती, तिथे दाखला तर दूरची गोष्ट. अखेर बेलसरे यांनी प्रतिज्ञापत्राच्या आधारे १६ मुलांना नगरपालिकेच्या शाळेत दाखल केले. या मुलांकडे ना दप्तर होते, ना गणवेश. बेलसरे यांनी आपल्याला मिळालेल्या बोनसची रक्कम या मुलांच्या गणवेश, दप्तरावर खर्च केली. बेलसरे यांचा कार्याचा व्याप वाढू लागला आणि कचरा वेचणाऱ्या मुलांसह बालकामगारांसाठी काम करणारी सुधर्मा ही संस्था जन्माला आली. दर महिन्याच्या वेतनातील दहा हजार रुपये ते या मुलांसाठी बाजूला काढून ठेवू लागल़े  जळगावमधील रायसोनीनगर भागात राहणारे आणि कल्याण ब्रेक्स (आताची हिताची) कंपनीतून निवृत्ती घेत सध्या जैन उद्योगसमूहातील गांधी रिसर्च फाउंडेशनमध्ये काम करणारे हेमंत बेलसरे यांनी वीस वर्षांपूर्वी कंपनीतील दहा मित्रांसमवेत नशिराबादच्या संत झिपरूअण्णा महाराजांच्या समाधीस्थळी शपथ घेऊन समाजकार्याची संस्थात्मक मुहूर्तमेढ रोवली. २००२ मध्ये विजयादशमीला सुधर्मा ज्ञानसभा असे कार्याचे नामकरण करून त्यांनी आपले पुढील लक्ष्य निश्चित केले. बेलसरे यांच्यासाठी हे काम इतके सोपे नव्हते. मात्र, ते निश्चयी वाटचाल करत आहेत.

कुटुंबातूनच समाजसेवेचा वारसा

हेमंत बेलसरे मूळचे जळगाव जिल्ह्यातील नशिराबादचे. वडील प्राथमिक शिक्षक आणि स्वातंत्र्यसैनिक होते. घराच्या अंगणात प्रौढशिक्षणाची शाळा भरत असे. वडील या शाळेतही शिकवीत. हेमंत हे नशिराबादला शाळेत शिकत असतानाच वडिलांचे निधन झाले आणि घराची जबाबदारी अंगावर पडली. मात्र, ते डगमगले नाहीत़  शिकत असतानाच नोकरी करून ते आईला हातभार लावू लागल़े बारावीनंतर त्यांनी वालचंदनगरला वालचंद इंडस्ट्रीजमध्ये तीन वर्षे प्रशिक्षणार्थी कामगार म्हणून काम केले. या अनुभवावर जळगावला कल्याणी ब्रेक्समध्ये कामगार म्हणून काम मिळाले. कंपनीत प्रामाणिकपणे काम केल्याने ते राज्य शासनाच्या गुणवंत कामगार पुरस्कारासह अन्य पुरस्कारांचे मानकरी ठरले. कंपनीत व्यवस्थापक आणि कामगार यातील समन्वयकाची भूमिका त्यांनी यशस्वीपणे बजावली. कंपनीत पुस्तक वाचन मालिकांचा उपक्रम त्यांनी कामगारांसाठी राबविला. या कामाचा उपयोग त्यांना सुधर्मा संस्था चालवताना होतो़ 

झोपडपट्टीतील कचरावेचक मुलांचे आयुष्य घडविण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. विविध प्रशिक्षणांतून गरीब मुलांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यात लोकसहभागही महत्वाचा असतो. संस्था देणगीरूपी विविध वस्तूंसह शालेय साहित्य, वह्या, दप्तरे, सायकली इत्यादींचा स्वीकार करते. शासनाकडून सहकार्य नसले तरी समाजातून अनेक दाते मदतीचा हात पुढे करीत आहेत. दात्यांकडून मुलामुलींसाठी शाळेत जाण्यासाठी सायकली दिल्या जातात, संगणकही दिले जात आहेत. संस्थेतर्फे आजपर्यंत सुमारे ६०० मुलांचा शैक्षणिक खर्च करण्यात आला आहे. त्यांना गणवेशापासून तर शैक्षणिक साहित्य आणि शुल्कापर्यंतची मदत मिळवून देण्यात आली.

मुलांसाठी वाचनालय

जळगावातील राजीव गांधीनगर, समतानगर, तांबापुरा, भिलपुरा आणि इतर झोपडपट्टय़ांसह कुसुंबा, खेडी, मन्यारखेडा, सावखेडा बुद्रुक येथे कचरावेचक मुलांसाठी सुधर्मा संस्थेने वाचनालय सुरू केले आहे. मुलांना वाचनाची गोडी लावण्याबरोबरच कलाप्रशिक्षणही दिले जात़े

संस्थेचा कार्यविस्तार

जळगावच्या राजीव गांधीनगर झोपडपट्टी, समतानगर झोपडपट्टी, तांबापुरा झोपडपट्टी, भिलपुरा झोपडपट्टीसह शहरातील इतर झोपडपट्टय़ांमधील मुलांवर संस्थेने लक्ष केंद्रित केले आहे. तेथील मुले शिक्षणप्रवाहात आणण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. जळगावसह परिसरातील कुसुंबा, खेडी, मन्यारखेडा, सावखेडा बुद्रुक यांसह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत आता संस्थेचे पदाधिकारी कचरावेचक मुलांसाठी काम करीत आहेत. सुधर्मा संस्थेने आपल्या कार्याचा विस्तार केला. नुकतेच १५ ऑगस्ट रोजी चोपडा तालुक्यातील कुंडय़ापाणी, बढई या दोन शाळांतील ७५ विद्यार्थ्यांना संस्थेने दत्तक घेतले. शैक्षणिक साहित्य असो, शुल्कभरणा असो, वा शाळेत जाण्यासाठी सायकल असो, मुला-मुलींना  सुधर्माचा आधार वाटतो़   सध्या बेलसरे दाम्पत्यास संस्थेचे सचिव सुनील ठाकूर, सहसचिव दिनकर बाविस्कर, सदस्य जितेंद्र ठाकूर, शंकर सुशीर, ध्रुव भांबोरे, परिक्षित पाटील, डी. जे. सोनवणे यांचे सहकार्य मिळत आहे. करोनाकाळात वाणसामान वाटपाबरोबरच आरोग्य शिबिरे आयोजित करून संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासली़ कचरावेचकांसह उपेक्षितांसाठी सेवाभावी वृत्तीने कार्यरत असलेल्या सुधर्माला कार्यविस्तारासाठी मदतीचे हात हवे आहेत़ 

दीपक महाले

सुधर्मा ज्ञानसभा SUDHARMA DNYANSABHA

संस्थेपर्यंत कसे जाल?

मुंबईहून जळगाव ४१३ किलोमीटर, नाशिकहून जळगाव २६३ किलोमीटर. जळगावातील इच्छादेवी चौकातून पुढे मोहाडी रस्त्यावरील लांडोरखोरी वनोद्यानासमोर रायसोनीनगरात संस्थेचे कार्यालय आहे.

ऑनलाइन देणगीसाठी

ऑनलाइन देणगीसाठी

खाते क्र. 097100102134, (कॉसमॉस बॅंक –  नवी पेठ, जळगाव)

आयएफएससी कोड : COSB0000097

धनादेश येथे पाठवा..

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय  

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय    

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय      

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, शिवाजीनगर, पुणे- ४११००४.  ०२०-६७२४११२५

नागपूर कार्यालय       

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१

दिल्ली कार्यालय       

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००

Story img Loader