येई एक मंगल क्षण, श्रीगजाननाचे होता आगमन
कला-कल्पनांचे अधिष्ठान, लाभो श्रींचे वरदान!
उत्सवा येतसे उधाण, जपावेत अनमोल क्षण
वाटूया आनंद आपुला इतरांसवे, उपक्रम एक चिरंतन!
गणेशोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने वाचकांसाठी आयोजित केलेल्या ‘घरचा गणेश’ उपक्रमाअंतर्गत तुमच्या घरातील गणपती आणि त्या भोवती केलेली सुंदर आरास याचा छानसा फोटो pratikriya@expressindia.com या ई-मेलवर पाठवा. सब्जेक्टमध्ये ‘घरचा गणेश’ लिहिण्यास विसरू नका.
मेलमध्ये आपले नाव आणि राहण्याचे ठिकाण अवश्य लिहा. निवडक फोटोंचा अल्बम ‘लोकसत्ता डॉट कॉम’वर प्रसिद्ध केला जाईल. त्याचप्रमाणे या अल्बमची लिंक लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरही शेअर केली जाईल. याशिवाय तुम्ही पाठविलेल्या फोटोंपैकी सर्वोत्कृष्ट फोटोला लोकसत्ताच्या फेसबुक पेजवर कव्हर फोटो होण्याची संधी मिळेल.

Story img Loader