महाराष्ट्रभर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घरातल्या गणपतीच्या पूजेपासून ते गल्लोगल्ली मोठमोठे मंडप बांधून सर्व स्तरातील आणि वयाची मंडळी दहा दिवस गणरायाची मनोभावे आराधना करतात. मोठ्या गणेशमूर्ती, भव्य देखावे आणि आरास घरापासून ते मंडपापर्यंत सर्वच गणेश मंडळांत पाहायला मिळते. गणेशाची पूजा करताना दररोज दिवसातून कमीत कमी दोन वेळा घरातील सर्व मंडळी आणि मित्र परिवार एकत्र येऊन आरती करतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘लोकसत्ता’ भाविकांना ‘श्री गणेश आरती संग्रह’ उपलब्ध करून देत आहे. विशेष म्हणजे यावर्षी हा आरती संग्रह फक्त लिखित स्वरूपात नसून, सर्व महत्वाच्या आरत्यांचा एक खास व्हिडिओ ‘लोकसत्ता’तर्फे तयार करण्यात आला आहे. आपल्या घरातील पूजेसाठी आपणास त्याचा जरूर उपयोग होईल.
‘श्री गणेश आरती संग्रह’
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 'लोकसत्ता' भाविकांना 'श्री गणेश आरती संग्रह' उपलब्ध करून देत आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 06-09-2013 at 07:46 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shri ganesh aarti collection by loksatta