ली सेन लूंग (सिंगापूरचे पंतप्रधान)
आज विश्वास बसणार नाही, पण एकेकाळी सिंगापूरही दुर्गंधीयुक्त होते! स्वच्छतेत सिंगापूर नदीचाही विचार झाल्यामुळे आज खाडीचे पाणी शुद्ध करून वापरात येऊ शकते. सिंगापूर आणि भारताचा स्वच्छता- अनुभव सामायिक ठरो..
‘स्वच्छ भारत’ची आपली संकल्पना साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांपूर्वी २०१९ पर्यंत स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली होती. ज्यांनी स्वच्छतेला राष्ट्रीय प्राथमिकता मानले, अशा महात्मा गांधींची २ ऑक्टोबर १९९० ला १५०वी जयंती आहे, हाही एक योगायोग आहे. गेल्या चार वर्षांमध्ये भारताने ८ कोटी ६० लाख घरांमध्ये शौचालये बांधून, तसेच सुमारे ५ लाख गावांना उघडय़ावर शौचापासून मुक्त घोषित करून या दिशेने बरीच प्रगती केली आहे.
सिंगापूरनेही या मार्गावर वाटचाल केलेली आहे. स्वातंत्र्यानंतरच आम्ही आमच्या जनतेसाठी स्वच्छ व हरित वातावरण निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. सुरुवातीच्या काळात अनेक घरांमध्ये मलनिस्सारणाची व्यवस्था नव्हती. मल बादल्यांमध्ये गोळा करून तो ट्रकांमधून मलशुद्धीकरण संयंत्रांपर्यंत नेला जाई. याचा असह्य़ दुर्गंध पसरत असे. मानवी मल जवळचे कालवे व नद्यांमध्ये प्रवाहित केला जात असल्याने पाणी प्रदूषित आणि विषारी होत असे. अशुद्ध पाण्यामुळे नेहमी आजारांचा प्रादुर्भावही होत असे.
आमच्या राष्ट्रनिर्मात्यांनी निर्णायक स्वरूपात काम करण्याचा संकल्प केला. त्यांनी ‘सिंगापूर स्वच्छ ठेवा’ ही राष्ट्रीय मोहीम राबवली. आम्ही प्रत्येक घरात मलनिस्सारणाची व्यवस्था बनवली, आपल्या नद्या स्वच्छ केल्या आणि सिंगापूरला स्वच्छ व हरित शहर बनवले. खास करून सिंगापूर नदीला स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेत आम्हाला हजारो अतिक्रमणकर्ते, घरांच्या आवारात चालणारे उद्योग, डुक्कर पाळणारे कोंडवाडे आणि प्रदूषणाचे अनेक स्रोत तराईच्या भागातून हटवावे लागले. आज एक स्वच्छ सिंगापूर नदी शहराच्या मध्यभागातून वाहत मरिना खाडीस मिळते. आमच्या राष्ट्रीय पाणीपुरवठा योजनेला यातून पाणीपुरवठा होतो.
आकाराच्या दृष्टीने पाहिले, तर भारत सिंगापूरपेक्षा खूप मोठा आहे. गंगा नदी सिंगापूर नदीपेक्षा जवळजवळ हजारपट मोठी आहे. असे असतानाही सिंगापूर व भारत यांच्याबाबतीत स्वच्छतेच्या अभियानात बरीच साम्यस्थळे आहेत.
सगळ्यात पहिले, दोन्ही देशांचा अनुभव संकल्पना व नेतृत्वाचे महत्त्व दर्शवतो. दिवंगत पंतप्रधान ली कुआन यू आणि पंतप्रधान मोदी या दोघांनीही देशाला स्वच्छ आणि हरित ठेवण्यासाठी प्राधान्य दिले. दोन्ही नेत्यांनी स्वत: झाडू उचलले आणि रस्ते स्वच्छ करण्यासाठी ते जनतेसोबत कामाला लागले. ली हे आपल्यासाठी वैयक्तिक प्रेरणास्रोत होते आणि कुठल्याही राष्ट्राचा कायापालट ‘आम्ही कसे आहोत’ येथून सुरू होतो हे आपण ली यांच्याकडून शिकलो आहोत’, असे मोदी यांनी पूर्वीच म्हटले आहे.
दुसरे, सफलतेसाठी दीर्घकालीन राष्ट्रीय बांधिलकीची आवश्यकता असते. सिंगापूरमध्ये आम्ही घाण पाण्याचे निस्सारण आणि मलनिस्सारणाची यंत्रणा वेगवेगळ्या करण्यासाठी मलनिस्सारणाचा एक मास्टर प्लॅन लागू केला. याचा उद्देश पावसाचे पाणी प्रदूषित होण्यापासून वाचवण्याचा होता, जेणेकरून ते गोळा करून वापरात आणले जाऊ शकेल. सोबतच सिंगापूर मलशुद्धीकरण सयंत्रांमधून निघालेल्या शिल्लक पाण्याचा पुनर्वापर केला जातो आणि ते रिव्हर्स ऑस्मॉसिस तंत्राने शुद्ध केले जाते. वापरलेल्या पाण्याचे काय करावे, ही समस्या ओळखून आम्ही त्यातून पाणीटंचाई ही दुसरी समस्या सोडवण्यात तिचा वापर केला.
तिसरे, सिंगापूर व भारत हे दोघेही आंतरराष्ट्रीय सहकार्याला महत्त्व देतात. वेगवेगळ्या देशांमध्ये एकसारखेच उपाय यशस्वी व्हावेत, हे आवश्यक नाही; मात्र एकमेकांपासून शिकून आणि अनुभवांची देवाणघेवाण करून आपण सर्व यांचा लाभ घेऊ शकतो. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी मी भारताचे अभिनंदन करतो. जगभरातील नेते, या क्षेत्रात काम करणारे आणि स्वच्छतेशी संबंधित तज्ज्ञ आपले अनुभव वाटून घेण्यासाठी या संमेलनात सहभागी झाले होते.
सिंगापूरही अशाप्रकारच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करतो. दर दोन वर्षांनी आयोजित करण्यात येणारे जागतिक शहर शिखर संमेलन आणि सिंगापूर आंतरराष्ट्रीय जल सप्ताह ही त्यांची उदाहरणे आहेत. स्वच्छतेच्या जागतिक आव्हानाबाबत जागरुकता वाढवण्यासाठी १९ नोव्हेंबर हा ‘जागतिक स्वच्छता दिवस’ म्हणून साजरा करण्यासाठी सिंगापूरचा ‘सर्वासाठी स्वच्छता’ हा संकल्प संयुक्त राष्ट्रांनी २०१३ साली स्वीकारला होता.
भारत देशभरात राहण्यायोग्य आणखी शहरे व स्थायी स्मार्ट शहरे यांचा सतत विकास करत असताना, आपला अनुभव भारतासोबत वाटून घेण्यात सिंगापूरला आनंद आहे. शहर नियोजन, तसेच पाणी व कचऱ्याचे व्यवस्थापन याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी सिंगापूर भारताच्या शहर व राष्ट्र नियोजन संघटनेसोबत सहकार्य करत आहे. आंध्र प्रदेश व महाराष्ट्रासारखी राज्ये त्यांच्या शहरांचा विकास करत असताना, शहरी समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सिंगापूर त्यांच्याशी सहकार्य करण्यास तयार आहे.
भारताला स्वच्छ बनवण्याच्या उद्देशाने राबवलेल्या ‘स्वच्छ भारत अभियानाच्या’ यशस्वीतेसाठी मी पंतप्रधान मोदी व भारताच्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. आमच्या लोकांना अनेक पिढय़ा स्वच्छ पाणी व स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच संयुक्त राष्ट्रांचे शाश्वत विकासाचे लक्ष्य गाठण्यासाठी दोन्ही देशांमधील सहकार्य आणखी वाढवण्यास मी कटिबद्धता दर्शवीत आहे.