कन्नड मतदारसंघात ‘शासन आपल्या दारी’चा उपक्रम घेण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार कमालीचे उत्सुक होते. त्यांना शिंदे गटात सहभागी न झालेले आमदार उदयसिंग राजपूत यांच्या मतदारसंघात हा कार्यक्रम मोठय़ा थाटामाटात घ्यायचा होता. या मतदारसंघातून नितीन पाटील यांना प्रोत्साहन द्यायचे असल्याने त्यांनी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम आखला म्हणे. कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांवर फुले उधळली. गर्दी पाहून तेही खूश झाले. लाभाचा समारंभ उत्तम करताना मंत्री सत्तार अगदी घरच्या कार्यक्रमात जसे वावरतात तसे वावरले. ते सारे काही पार पाडत होते. कोणी किती वेळ बोलावे, कोणाला बोलताना थांबवावे, हेही त्यांनीच सांगितले. ते कधी सूत्रसंचालन करीत होते. कधी ते मार्गदर्शक होते तर मधूनच ते मंत्री म्हणूनही वावरत होते. ‘सब कुछ सत्तार’ असे कार्यक्रमाचे सूत्र असावे असे त्यांच्या वर्तणुकीचे सूत्र होते. त्याला प्रशासनाची अजोड साथ होती. अशाने शासन खरोखरीच आपल्या दारी पोहचणार कसे, असा प्रश्न पडतोय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा