अनेक शेतकरी शेताच्या बांधावर किंवा रिकाम्या जागेत कढीपत्त्याची झाडे लावत त्याची पाने बाजारात विकतात. साताऱ्यातील शेतकरी हणमंत कुचेकर यांना या अशाप्रकारे कढीपत्ता विक्रीतून आपल्या हाती फारसे काहीच लागत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी कढीपत्त्याची पावडर करण्याचा व्यवसाय हाती घेतला. पाहता पाहता यामध्ये यश तर मिळालेच पण आता हे उत्पादन २५ टनांवर गेले असून त्याची विक्री जगभरात होऊ लागली आहे.

कढीपत्ता हे रोजच्या स्वयंपाकात लागणारी गोष्ट. अनेक शेतकरी शेताच्या बांधावर किंवा रिकाम्या जागेत कढीपत्त्याची झाडे लावत त्याची पाने बाजारात विकतात. सामान्यपणे सर्वत्र चालणारा हा शेती व्यवसाय साताऱ्यातील शेतकरी हणमंत कुचेकर हेही करत होते. परंतु या कढीपत्ता विक्रीतून आपल्या हाती फारसे काहीच लागत नाही. कष्ट आपले आणि त्यावर पैसे व्यापारीच कमवत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग खटपट करत त्यांनी या उत्पादनावर प्रक्रिया करत कढीपत्त्याची पावडर घेण्याचा व्यवसाय हाती घेतला. पाहता पाहता यामध्ये यश तर मिळालेच पण आता हे उत्पादन २५ टनांवर गेले असून त्याची विक्री जगभरात होऊ लागली आहे.

Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
tur dal price , tur dal price sangli , tur dal,
तूरडाळ सामान्यांच्या आवाक्यात !
tur dal cost decrease by rs 50 per kg other pulses price drop
तूरडाळ किलोमागे ५० रुपयांनी स्वस्त
farmer cabbage farm destroyed
कोल्हापूर : दर घसरल्याने शेतकऱ्याने कोबीवर ट्रॅक्टर फिरवला
Deadline Looms as India Struggles to Meet Soybean Procuremen
शेतकऱ्यांपुढे नवेच संकट, ‘हे’च संपले म्हणून खरेदी ठप्प. जबाबदार कोण ?
Soyabean Purchase Objective Failed farmers in trouble
सोयाबीन खरेदीचा खेळखंडोबा; जाणून घ्या, खरेदीचे उद्दिष्ट का फसले, शेतकऱ्यांचे किती कोटी थकले ?
Lucky bamboo plant care
बांबूचे रोप सुकत चाललयं? ‘या’ सोप्या पद्धतीने घ्या काळजी

हेही वाचा : लोकशिवार: क्षारपड जमीन निर्मूलनाची यशकथा!

कुचेकर यांची साताऱ्यातील वाडे फाटा येथे शेती आहे. त्यांनी सर्वप्रथम २०१० मध्ये कढीपत्त्याची लागवड केली. सुरुवातीचे उत्पादन कमी होते. त्याची त्यांनी स्थानिक बाजारपेठेत विक्री केली. २०११ साली सुवासिनी प्रकारच्या जातीच्या कढीपत्त्याची ५० गुंठ्यात लागवड केली. एक वर्ष पूर्णपणे त्याची जोपासना केली. कढीपत्त्याची पहिली काढणी झाल्यानंतर ओला कढीपत्ता पुणे-मुंबई येथील व्यापाऱ्यांना विकण्यास सुरुवात केली. परंतु या वेळी कुचेकर यांच्या लक्षात आलं की आपल्या मालाला जास्त भाव मिळत नाही. आपल्या मालावर व्यापारीच जास्त पैसे कमवत आहेत. मग त्यांनी आपल्या मालावर प्रक्रिया करून नवे उत्पादन करण्यासाठी खटपट सुरू केली. आपणच हा नफा का कमवू शकत नाही, असा विचार केला. हाच ध्यास मनात ठेवत कुचेकर यांनी कढीपत्त्याची पावडर बनवण्याचे स्वप्न मनात तयार केले.

यासाठी कुचेकर यांनी कृषी विभाग, आत्मा यांच्याशी संपर्क साधून अनुदानावर ‘सोलर ड्रायर’ घेतला आणि कढीपत्ता धुऊन कढीपत्त्याची पाने ‘सोलर ड्रायर’वर वाळवण्यास सुरुवात केली. दरम्यान वाळवलेल्या कढीपत्त्याची पाने सुरुवातीला कुचेकर मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार केली. स्वत:चा व्यवसाय सुरू करून तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय कृषी मेळावे तसेच प्रदर्शने यांमध्ये विक्री करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तयार केलेल्या मालाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर उत्पादन क्षमता कमी पडल्याने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून घेतलेल्या कर्जामधून पाचशे ते हजार किलोच्या क्षमतेची यंत्रणा घेऊन व्यवसायाची वाढ होण्यास सुरुवात केली.

हेही वाचा : ड्रोन तंत्रज्ञानात मराठवाडा अग्रेसर

यापूर्वी त्यांना कढीपत्ता हा एक मसाल्यातील घटक असल्याची माहिती होती मात्र व्यवसायातील स्वत:ला बदल करून घेतल्यानंतर त्यांना कढीपत्त्याचे महत्त्व आणखी कळाले. आधुनिक काळाप्रमाणे चालायला हवे असे मनाशी ठरवले आणि त्यांनी व्यवसायासाठी ‘इंटरनेट’चा वापर करण्यास सुरुवात केली त्यातून त्यांनी आपल्या व्यवसायासाठी जगाचे दार खुले केले. त्यांनी परदेशात कढीपत्त्याची निर्यात करण्यास सुरुवात केली. याबरोबरच त्यांनी कढीपत्त्याची पावडर आणि अनेक उपपदार्थांचीही निर्यात करण्यास सुरुवात केली. दरम्यान कुचेकर यांनी आपल्या या शेतीपूरक व्यवसायाची माहिती देणारे संकेतस्थळ सुरू केले. यामुळे परदेशातील ग्राहकांनी स्वत: परदेशातून येऊन कुचेकर यांच्या शेतीला भेट देऊ लागले. यातून त्यांना परदेशातूनही मोठी मागणी मिळण्यास सुरुवात झाली.

कुचेकर सेंद्रिय पद्धतीने कढीपत्त्याचे उत्पादन घेतात. त्यांनी परिसरातील अन्य शेतकऱ्यांना देखील कढीपत्त्याचे महत्त्व पटवून देत त्यांना कढीपत्ता उत्पादनाकडे वळवले आहे. कुचेकर या शेतकऱ्यांकडून गरज भासेल त्याप्रमाणे कढीपत्ता विकत घेतात. केवळ कढीपत्ता विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा पावडर विक्रीतून पाच ते सात पटीने वाढीव मिळते. कुचेकर हे २०१० पासून कढीपत्ता उत्पादन घेत आहेत. आता या लागवडीखालील त्यांचे क्षेत्रही त्यांनी वाढवले आहे. यासाठी चांगली रोपे मिळावी म्हणून त्यांनी काही झाडे राखीव ठेवली आहे. या लागवड क्षेत्रात आंतरपीक म्हणून ते सोयाबीनचे उत्पादन घेतात. कुचेकर म्हणतात, की कढीपत्त्यामध्ये नैसर्गिक गुण आहे. सहजासहजी लोक कढीपत्ता खात नाही उलट तो कढीपत्ता जेवणामधून बाहेर काढून टाकतात. पण कढीपत्त्यामध्ये असणारे लोह, मिनरल, कॅल्शियम हे घटक असतात हे घटक काढून टाकू नये. जर खाद्यापदार्थांमध्ये कढीपत्ता पावडर वापरली तर याचे हे सर्व गुणधर्म आपल्याला प्राप्त होतील. कढीपत्ता आरोग्यवर्धक आहे.

आयुर्वेदामध्ये कढीपत्त्याचे महत्त्व सांगितले आहे. म्हणूनच कढीपत्त्याचा स्वयंपाकघरात दररोज वापर होतो. कढीपत्ता वजन कमी करण्याच्या क्षेत्रात अत्यंत फायदेशीर आहे. कच्चा किंवा रस प्यायल्यावर पाने ‘डिटॉक्स ड्रिंक’ म्हणून काम करतात, शरीर आतून स्वच्छ करतात, चरबी जाळतात, वाईट ‘कोलेस्ट्रॉल’ कमी करतात आणि पचन सुधारतात. कढीपत्त्याचे नियमित सेवन केल्याने निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येतात. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अशा वेगवेगळ्या शेतीतील मसाला पिकांकडे व त्याच्या उत्पादनाकडे आणि प्रयोगाकडे वळावे. नक्की सर्वांना आर्थिक फायदा होईल असेही ते म्हणतात.

हेही वाचा : शिक्षणात पुढे जाताना…

रोजच्या जेवणात असणारा कढीपत्ता लोक सहजासहजी खात नाही उलट तो ताटातून बाजूला काढतात. पण कढीपत्त्यामध्ये असणारे लोह, मिनरल, कॅल्शियम हे घटक आहेत. मी हा कढीपत्ता लोकांच्या पोटात वेगवेगळ्या मार्गाने जाईल, यासाठी प्रयत्न केला आणि त्याला मोठे यश आले. मी कढीपत्त्याची करत असलेली पावडर आज जगात विकली जाते. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याने केलेला शेतीतील आणि स्वत:तील बदल त्यामुळे मला केवळ शेतातील यश नाही मिळाले तर नव्या व्यवसायाचे ज्ञान देखील मिळाले. – हणमंत कुचेकर, कढीपत्ता उत्पादक

vishwas. pawar@expressindia. com

Story img Loader