शीळफाटय़ाजवळची ७४ बळी घेणारी इमारत- दुर्घटना मानवी गैरकारभारांमुळे घडू शकणाऱ्या उत्पातांचेच एक उदाहरण आहे. मुंब्रा, दिवा, ठाणे, मीरा-भाईंदर, अशी अनेक शहरे महाराष्ट्रात असतील की जेथे अनधिकृत बांधकामे निम्म्याहून अधिक असतील. या तसेच अन्य शहरांमध्ये सनदी नोकर, पोलीस, नगरसेवक, बांधकाम व्यावसायिक हे एकमेकांचे भागीदार असावेत अशा पद्धतीने कामकाज चालते. ठाणे महापालिकेच्या हद्दीतील शीळफाटा भागात जे घडले त्यात जितके बांधकाम व्यवसायिक जबाबदार आहेत तितकेच सनदी नोकरशहा, नागरसेवक, आमदार, पोलीसदेखील जबाबदार आहेत.
त्यामुळेच, इमारत कोसळून रहिवाशांचे बळी गेल्याप्रकरणी बांधकाम व्यवसायिकांवर ‘सदोष मनुष्यवध’ हे कलम लागणार असेल तर तेच कलम बाकी सर्व भागीदारांवर लागले पाहेजे व त्वरित दोषींना शिक्षा झाली पाहिजे. असे झाले तरच ही अभद्र युती तुटेल व विनाकारण जीव जाण्यापासून लाखो लोक बचावतील.
– विश्राम दीक्षित
उपहासाचा अन्वयार्थ समजेल की नाही?
दुष्काळग्रस्तांच्या पाणीसमस्येबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उधळलेल्या मुक्ताफळांचा समाचार घेणारा ‘दादा, माफी मागे घ्या..’ हा अन्वयार्थ (९ एप्रिल) तिरकस लिखणामुळे अप्रतिम वाटला. सुरुवातीला शीर्षक वाचून चक्रावलोच. राजकारण्यांच्या बेताल कृती-उक्तींचा परखड समाचार घेणाऱ्या ‘लोकसत्ते’ने अशी कशी भूमिका घेतली असे वाटले. पण अन्वयार्थ वाचल्यावर लक्षात आले की शीर्षक ‘गुगली’ होता.
तिरकस टोले, उपहास, उपरोधिक गुणगौरव अशा विनोदाच्या विविध शैली या अन्वयार्थमध्ये एकवटल्या आहेत. टीका करायची म्हणजे केवळ जहाल शब्द आणि निषेधाचे आसूड ओढायचे असेच सर्वत्र दिसत असताना विनोदाच्या शस्त्राचा वापर करून अजितदादांच्या विधानाचा केलेला निषेध हा वेगळय़ा धाटणीचे लिखाण म्हणून कौतुकास्पद होता. वर्तमात्रपत्रांमधील मजुकरातील लेखनवैविध्य कमी होत असताना तिरकस लिखाणाचे हे उदाहरण एका व्यंगचित्रासारखे होते. या शाब्दिक मेजवानीबद्दल आभार. आपल्यावरील व्यंगचित्र पाहून आत्मपरीक्षण करतो असे काहीवेळा राजकारणी म्हणतात. या शाब्दिक व्यंगचित्रामुळे अजितदादाही आत्मपरीक्षण करून आपले वर्तन सुधारतील अशी आशा करूयात.
– गिरीश जोशी, कल्याण</strong>
आता तरी यांना ‘दादा’ म्हणणे बंद करा..
जो माणूस दुष्काळात होरपळून निघणाऱ्या जनतेची अश्लील आणि अश्लाघ्य शब्दात खिल्ली उडवू शकतो त्यास आपुलकीच्या आणि बंधुत्वाच्या विशेषणाने हाक मारणे कदापि योग्य नाही. ‘दादा’ या शब्दाने तर नाहीच नाही. ज्या लोकांना दादागिरीपलीकडे दादा या शब्दाचा अर्थ कळत नाही तेच लोक आज राजकारणात दादा होऊन बसले आहेत.
आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे याचे चपखल उदाहरण. मुळात अजित पवार यांना अजितदादा पवार बनवले कुणी? तुम्ही-आम्ही सामान्य माणसांनीच ना? एकच वादा- अजितदादा अशा घोषणा ठोकत त्यांच्यामागे जाणाऱ्या कार्यकर्त्यांनीच ना?
अजित पवारांचे अजितदादा असे नामांतर करण्यामध्ये प्रसारमाध्यमांची भूमिकाही काही कमी नाही. वाहिन्या तर ‘दादा’ म्हणतातच पण ‘लोकसत्ता’मधील ‘राजकीय जीवनातील सगळ्यात मोठी चूक’ या अजित पवारांच्या संदर्भातील बातमीमध्येही (९ एप्रिल) हेच दिसून येते. उण्यापुऱ्या सव्वातीनशे शब्दांच्या
त्या वृत्तांकनामध्ये तब्बल २० वेळा अजित पवारांचा उल्लेख ‘अजितदादा’ अस करण्यात आला आहे. अजित पवारांना अजितदादा म्हणायला विरोध नाही पण ते आता ‘दादा’ म्हणवून घेण्याच्या योग्यतेचे नसतानाही त्यांना ती योग्यता दिली जाते याला विरोध आहे. त्यांच्या चांगल्या कामाचा गौरव तर केलाच जाईल पण आजपर्यंतच्या त्यांच्या टगेगिरीचा, दादागिरीचा, निष्क्रिय कामगिरीचा आणि आता लघवीगिरीचा निषेध म्हणून इतका विरोध तर आपण करूच शकतो.
यात लोकांना त्यांची चूक कळली असेल तर प्रथम त्यांनी आपल्या डोक्यावर घेतलेल्या अशा दादांना बाजूला सारावे आणि इथून पुढे कोणालाही ‘दादा’ म्हणून संबोधताना लाख वेळा विचार करावा.
– उमेश स्वामी,
माटुंगा, मुंबई.
राजीनामा नसेल, तर हकालपट्टीच हवी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर मुक्कामी आपल्या अकलेचे जे तारे तोडले, ते वाचून तळपायाची आग मस्तकात गेली. या भयानक विधानांद्वारे शिमगा साजरा केल्यावर, पश्चातबुद्धीने माफी मागण्याचे नाटकही त्यांनी पार पाडले.. ‘‘माझ्या वक्तव्यामुळे दुष्काळग्रस्त जनतेच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो’’ असे त्यांचे शब्द आहेत- त्यांचा गर्भितार्थ असा की, ‘जर तुमच्या भावना दुखावल्याच असतील, तर मी माफी मागून मोकळा होतो’.
अशा प्रकारे राज्यातील दुष्काळग्रस्त जनतेचा उपमर्द करणाऱ्या अजित पवारांना क्षणभरही मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही. ‘कारकिर्दीतील सर्वात मोठी चूक’ असे अजित पवारच ज्याला आता म्हणताहेत, त्या या बेमुर्वत वक्तव्यामुळे त्यांनी स्वत:हून राजीनामा द्यायला हवा होता. त्यांनी तसे केलेले नाही.
म्हणूनच, राज्यपालांनी आणि मुख्यमंत्र्यांनी लोकशाही संकेतांनुसार बाणेदारपणा दाखवून, कोणताही मुलाहिजा न ठेवता अजितदादांची हकालपट्टी करावी, तरच दुष्काळग्रस्त जनतेला खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल.
– विजयानंद हडकर, डोंबिवली.
भावना दुखावतील कशा?
सत्तेचा माज व्यक्तीला किती विवस्त्र करू शकतो याचे उत्तम उदाहरण ज्युनियरसाहेबांनी दाखवून दिले. त्यासोबतच सामान्य जनतेच्या प्रश्नाबाबत त्यांची भावना किती निर्लज्जपणाची आहे हेही दिसले.
तसे पाहिले तर आपल्या देशात हे काही नवीन नाही. ही वाचाळवीरांची गटारगंगा अव्याहत वाहत आहे आणि त्यात कुंभमेळ्यासारखे आपल्या शिष्यासह स्नान करणाऱ्यांचे राजकीय आखाडे आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात आहेत. ज्युनियरसाहेबांनी माफी जरी मागितली असली तरी त्यामुळे मनाला फार वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नाही.
बाकी राहता राहिला प्रश्न जनतेच्या भावना दुखावण्याचा. त्याचीही चिंता नाही; कारण आता
भावना या शिल्लकच नाहीत त्यामुळे दुखावणार तरी कुठून?
– प्रसाद एस. जोशी, मानवत, जि. परभणी</strong>
संस्थानने धरण बांधावे!
अब्जावधीच्या मालमत्तेचे मालक असलेल्या शिर्डीच्या साई संस्थानात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असेल तर त्यासाठी या संस्थानाचे व्यवस्थापनही जबाबदार म्हणावे लागेल. यावर उपाय म्हणून त्यांनी स्वतच धरण बांधून जनतेला व सरकारलाही योग्य दराने पाण्याचा पुरवठा करावा. आगामी काळात उद्योगाच्या क्षेत्रात खासगी उद्योगांकडून पाणी पुरवठा हा नवीन उद्योग ठरू शकतो.
अर्थात, सरकारने खासगी उद्योगांना या क्षेत्रात उतरण्याची परवानगी दिली तरच ते शक्य आहे. सहकारी संस्थाही या क्षेत्रात उतरू शकतात. मोठय़ा धरणांपेक्षा छोटी धरणे अधिक योग्य, संयुक्तिक व फायदेशीर आहेत, हे संबंधित तज्ज्ञांनी आपल्याला सांगून ठेवलेलेच आहे. साई संस्थानाने या धोरणाचा शुभारंभ करावा.
– विजय बनसोड, पुलगाव (जि. वर्धा)
मनाचा तोल जाऊ नये..
अजित पवार यांचे भरसभेतील अशोभनीय उद्गार ऐकून एक शिकलेला इसम एवढय़ा मोठय़ा हुद्दय़ावर असताना असे बोलू शकतो, याची लाज वाटली. कसे बोलावे, याचे धडे स्वत:च्या काकांकडून अजित पवारांनी घ्यावेत. मागील पाच-सहा दशकांपासून शरद पवार यांच्यावर कितीही गंभीर आरोप झाले तरी मनाचा तोल जाऊ न देता कधीही / कोणाहीबद्दल त्यांनी अपशब्द वापरलेले नाहीत. हा आदर्श इतर राजकीय नेत्यांनीही ठेवावा.
– राम देशपांडे, नेरूळ.
पायउतार व्हा!
अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली, पण राज्यकर्त्यांकडूनच झालेल्या अपमानाची जखम केवळ माफी मागण्याने भरून येईल काय?
महाराष्ट्राच्या सभ्यता, संस्कृतीचा सन्मान ठेवायचा असेल तर अजित पवार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सत्तेवरून पायउतार व्हावे.
– सुनील म. कुवरे, शिवडी.