नेल्सन मंडेला.. गौरवर्णीयांविरोधात कृष्णवर्णीयांचे नेतृत्व करीत दक्षिण आफ्रिकेत स्वातंत्र्यलढा उभा करणारी आणि तो जिंकून दाखविणारी असामी. ज्यांनी आपल्या आयुष्यातील १० हजार दिवस काळ्या कोठडीत काढले. कधी योद्धा, कधी मुत्सद्दी, कधी हुतात्मा तर कधी राष्ट्रपुरुष, अशा विविध भूमिका त्यांनी आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांच्या हितासाठी वठविल्या. ‘‘प्रश्न तत्त्वाचा नव्हे, तर क्लृप्त्यांचा असतो’’ या सूत्रावर या माणसाची नितांत श्रद्धा! रोलीहलाहला हे त्यांचे मूळ नाव. नावाचा अर्थच मुळी – खटय़ाळ, उपद्व्यापी! तर अशा या मडीबांच्या नेतृत्वाची चाप जगावर उमटली. त्यांच्या नेतृत्वातील वेगळेपणाचे हे आठ पलू.

धाडस अर्थात कधीच न घाबरणे नव्हे, तर त्यावर मात करण्यासाठी इतरांना प्रेरित करणे :
अनेकदा आपल्या आयुष्यात भीतिदायक प्रसंग येतात. आपण त्यावेळी घाबरतोही, पण मडीबांचं वैशिष्टय़ हेच की त्यांनी या संकटाच्या प्रसंगात ‘आतून घाबरलेले असतानाही’ काहीच झालेले नाही असे दर्शविले. थोडक्यात आपण घाबरलेलो असतानाही उसने अवसान आणून का होईना, पण शांत मुद्रेने आणि अविचल अंत:करणाने वावरण्याचे कसब त्यांनी आत्मसात केले होते. त्यामुळे, बरोबरचे सहकारी कितीही घाबरले असले तरीही त्यावर मात करण्याची प्रेरणा त्यांना नेल्सन यांच्या अविचलतेतून मिळायची.
आघाडीवर राहाच, पण ‘पाया’ विसरू नका
एकदा तुरुंगात असताना सहकैद्यांपासून मंडेला यांना वेगळे ठेवण्यात आले. एकेकाळी कैद्यांना वाटाघाटींचे स्वातंत्र्य नसते अशी भूमिका घेणाऱ्या मंडेलांनी यावेळी मात्र तुरुंग प्रशासनाबरोबर वाटाघाटींची बोलणी करण्यास सुरुवात केली. त्याक्षणी तुरुंगात मंडेलांविरोधात संशय बळाविण्यास जागा होती, पण मंडेलांनी प्रत्येक कैद्याकडे जात त्याला आपली बदलती भूमिका आणि त्यामागील चिंतन समजावून सांगितले. आपल्या नेतृत्वाच्या यशाचा खरा ‘पाया’ आणि ‘आधार’ त्यांनी दुर्लक्षित केला नाही. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास अढळ राहिला.
नेतृत्व पिछाडीवर राहून करा अर्थात इतरांना आपणच नेते असल्याचे जाणवू दे :
सामान्यपणे नेत्याने पुढे राहून लढले पाहिजे असे आपण म्हणतो. पण मंडेलांचे सूत्र बरोबर उलटे होते. नेत्याने मेंढपाळासारखे असावे असे त्यांना वाटे. मेंढपाळ जसा मागे राहतो, पण जेव्हा मेंढय़ा विखुरतात तेव्हाच तो आघाडीवर येत सर्वाना एकत्र ठेवतो. त्याचप्रमाणे, जिथे मतभेद होतात तिथे खरा नेता मतक्य निर्माण करण्यापुरते आघाडीचे नेतृत्व स्वीकारतो आणि वाट प्रवाही करतो. काय करावे हे सांगणे नव्हे तर मतक्य निर्माण करणे हे नेत्याचे खरे काम आहे. नेत्याने मांडलेली नवीन संकल्पना ही नेत्याची नव्हे तर ती ‘माझी’ संकल्पना आहे, असे प्रत्येक सहकाऱ्याला वाटायला लावणे हे खरे कौशल्य आहे, जे मडीबांकडे होते.
आपला शत्रू ओळखा आणि त्याच्या लाडक्या ‘कौशल्यांचे’ ज्ञान मिळवा :
अत्यंत क्रूर आणि अशक्यप्राय परिस्थितीतही वाटाघाटी हात देतात ही मंडेलांची धारणा होती. ज्यांच्या विरोधात लढायचे आहे, त्यांची भाषा- संस्कृती- आचार- विचार आणि दृष्टी मंडेलांनी समजावून घेतली होती. एक तर यामुळे तुम्ही कोणाशी लढता आहात याचे भान येते, शिवाय तुम्ही विरोधकांना आपलेसे करू शकता.
मित्रांना दूर सारू नकाच पण तुमच्या विरोधातील बंडखोरांना अधिक जवळ ठेवा :
अनेकदा ज्यांच्यावर आपला अजिबात विश्वास नाही त्यांनाही मंडेला महत्त्वाच्या बठकींना बोलावीत असत. कोणते धोरण आखावे याबद्दल त्यांच्याशी खल करीत असत. त्यांना भेटवस्तू देत असत, त्यांचे अंत:करण जिंकून घेत असत. त्यांचे वाढदिवस, त्यांच्या घरातील दु:खद प्रसंग अशावेळी मडीबा आवर्जून उपस्थित असत. आपल्या विश्वासू व्यक्तींच्या वर्तुळात असे बंडखोर कमी धोकादायक ठरतात मात्र त्यांना जर मोकळे रान दिले तर ते अधिक ‘तापदायक’ ठरू शकतात, असे
मडीबांना वाटे.
सुहास्य वदन आणि छाप पाडणारे व्यक्तिमत्त्व :
देहबोली आणि नेतृत्वाचा स्वीकार यांच्यातील ऐतिहासिक नाते आपण अनेकदा दुर्लक्षित करतो. पण प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि हसरा चेहेरा अनेकांना आश्वस्त करण्यासाठी उपयुक्त असतो. त्यामुळे लोकांचा नेतृत्वास अधिक सहजपणे पािठबा मिळतो. आपल्या व्यक्तिमत्त्वातील प्रसन्नता आणि प्रांजळपणा आपल्या ‘उद्दिष्टा’साठी किती गरजेचा आहे हे मंडेलांनी खूपच लवकर ताडले होते. आपल्या राहाणीमानास त्यांनी प्रसन्नतेची आणि विश्वासार्हतेची उंची मिळवून दिली होती.
विविध शक्यता पडताळण्याची तयारी :
आपल्याला जे वाटतं ते तसंच असतं असं नाही, आपण कोणत्याही गोष्टीकडे काळी किंवा पांढरी म्हणून पाहातो, पण अनेकदा काही बाबी ‘करडय़ा’ही असतात याकडे दुर्लक्ष करतो. मंडेलांनी आयुष्यभर ‘परस्पर विसंगती’ असलेली व्यक्तिमत्त्वे मान्य केली. आपल्याला अपेक्षित शेवट नेमका काय आहे आणि तिथवर पोहोचण्याचे विविध व्यावहारिक मार्ग कोणते, याचा नेत्याने कायम विचार करावयास हवा असे त्यांचे मत होते.
माघार हाही नेतृत्वाचाच एक भाग असतो :
१९९३ मध्ये मंडेला यांनी त्यांचे चरित्रकार रिचर्ड स्टेंगेल यांना जगभरात ‘१८पेक्षा कमी वय असतानाही मतदान करण्याची मुभा असलेले देश आहेत का’ असे विचारले. त्यांनी महिती काढून असे देश असल्याचे सांगितले. त्यावर मंडेलांनी आफ्रिकेसमोर मतदानाचे पात्रता वय कमी करण्याचा प्रस्ताव मांडला. देशभरातून त्याला विरोध होताच त्यांनी तो मागे घेतला. जी कल्पना सहकाऱ्यांना, अनुयायांना मानवत नाही, ती सोडून देत पुढे मार्गक्रमण करणे आणि या माघारीचा अहंकाराशी संबंध न जोडणे यात नेतृत्वाचे खरे यश असते.
(टाइम साप्ताहिकामधून : अनुवाद- स्वरुप पंडित)

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Steve Smith Smashes 34th Test Century and 11th Hundred Against India Most By any Batter IND vs AUS
IND vs AUS: स्टिव्ह स्मिथचं ऐतिहासिक कसोटी शतक, भारताविरूद्ध ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Sing Death : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, “माझे आदर्श आणि मार्गदर्शक..”
satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?

मंडेला कुटुंबीय हेलावले
जोहान्सबर्ग : नेल्सन मंडेला मृत्यूशी झुंज देत असताना जनतेने दिलेला भरघोस पाठिंबा आणि त्यांच्या निधनानंतर संपूर्ण जगभरातून व्यक्त करण्यात आलेले दु:ख याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्दच नसल्याची भावना मंडेला यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.
मंडेला मृत्यूशी झुंज देत असताना देशातून आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जो पाठिंबा मिळाला त्याबद्दल आपण सर्वाचे ऋणी आहोत. मंडेला हे केवळ आमच्या कुटुंबापुरतेच मर्यादित नव्हते तर ते संपूर्ण जगाशी निगडित होते, अशा भावना मंडेला यांचे नातू मंडला यांनी व्यक्त केल्या आहेत. गुरुवारी रात्रीपासून आमच्याकडे शोकसंवेदना व्यक्त करणारे संदेश येत आहेत ते हृदयाला भिडणारे आहेत. दक्षिण आफ्रिका सरकार, दक्षिण आफ्रिका काँग्रेस आणि मंडेला यांच्यावर अहोरात्र उपचार करणाऱ्या डॉक्टरांचेही आम्ही ऋणी आहोत, असे मंडला मंडेला यांनी म्हटले आहे.
आजोबा या नात्याने आम्हा नातवंडांशी त्यांचे असलेले नाते सहृदयतेचे होते, समाजातील एक उत्तम सदस्य कसा होता येईल, यासाठी ते आम्हाला सातत्याने सल्ला देत होते, असेही मंडला मंडेला म्हणाले.

Story img Loader