हिंदीसह मराठी, बंगाली, कन्नड अशा विविध भाषांमधून तब्बल साडेतीन हजार गाणी गाणाऱ्या मन्ना डे यांचे अल्पचरित्र..
मूळ नाव- प्रबोधचंद्र डे
जन्मदिनांक- १ मे १९१९, कोलकाता येथे
काका कृष्णचंद्र डे हे प्रसिद्ध संगीतकार असल्याने घरात संगीताचे वातावरण, होते. साहजिकच मन्नादांवर लहानपणापासून गाण्याचे संस्कार झाले. के. सी. डे व उस्ताद डबीर खाँ यांच्याकडून त्यांनी गाण्याची मुळाक्षरे गिरवली. पुढे स्कॅाटिश चर्च कॉलेजमध्ये शिकताना सलग तीन वर्ष संगीत स्पध्रेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. संगीतात कारकीर्द करण्यासाठी १९४२ मध्ये के. सी. डे यांच्यासोबत मुंबईत दाखल झाले.
मुंबईत के. सी. डे, खेमचंद प्रकाश, अनिल विश्वास व सचिनदेव बर्मन यांच्याकडे संगीत सहाय्यक या नात्याने त्यांनी उमेदवारी केली. याच काळात हिंदी चित्रपटसंगीत त्यांना जवळून अभ्यासता आले. एकीकडे सहाय्यक संगीतकाराची जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी आपली मूळ आवड म्हणजे शास्त्रीय संगीताचे शिक्षणही सुरूच ठेवले होते. मुंबईत उस्ताद अमन अली खाँ आणि उस्ताद अब्दुल रहेमान खाँ यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे पुढील शिक्षण घेतले.
१९४३ मध्ये रामराज्य या चित्रपटासाठी शंकरराव व्यास यांच्या संगीत दिग्र्दशनात हिंदी चित्रपटासाठी पहिले पाश्र्वगायन करण्याची संधी त्यांना मिळाली. मात्र उपर गगन विशाल (मशाल) या सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यामुळे त्यांना लोकप्रियता लाभली. संगीतकार शंकर-जयकिशन यांनी त्यांच्या गायकीचा चांगला वापर करून घेतला. हिंदीसह मराठी, गुजराती, बंगाली, मल्याळम, कन्नड, आसामी आदी अनेक भाषांतून सुमारे साडेतीन हजार गाण्यांचे पाश्र्वगायन त्यांनी केले.
मिळालेले पुरस्कार
* १९७१ पद्मश्री  ल्ल २००४ जीवनगौरव महाराष्ट्र शासन ल्ल २००५ पद्मभूषण ल्ल २००७ दादासाहेब फाळके पुरस्कार
* झनक झनक तोरी बाजें पायलिया(मेरे हुजूर) या गाण्यासाठी सर्वोत्कष्ट पाश्र्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार
*  ए भाय जरा देखके चलो (मेरा नाम जोकर) या गाण्यासाठी सर्वोत्कष्ट पाश्र्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार तसेच फिल्मफेअर पुरस्कार

लोकप्रिय हिंदी चित्रपटगीते
* ए मेरे प्यारे वतन (काबुलीवाला)
* प्यार हुआ इकरार हुआ है ( श्री ४२०)
* धरती कहे पूकार कें  (दो बिघा जमीन)
* सूर ना सजे (बसंत बहार)
* तू प्यार का सागर है (सीमा)
* लागा चुनरीमें दाग (दिल ही तो है)
* ए मेरी जोहरजबीं (वक्त)
*आजा सनम मधूर चाँदनी में हम (चोरी चोरी)
* ये रात भिगी भिगी (चोरी चोरी)
* उमड घुमडकर आयी रे घटा (दो आँखे बारह हाथ)
* पूछो ना कैसे मने रैन बिताई (मेरी सूरत तेरी आँखे)
* कौन आया मेरे मनके द्वारे (देख कबिरा रोया)
* याल्ला याल्ला दिल ले गई (उजाला)
* मस्तीभरा है समा (चित्रपट- परवरिश)
* ना तो कारवाँ की तलाश है  (बरसात की रात)
* तू छुपी है कहाँ (नवरंग)
* झनक झनक तोरी बाजे पायलियाँ  (मेरे हुजूर)
* तुम गगन के चंद्रमा (सती सावित्री)
* मेरे दिलमें है एक बात (पोस्ट बॉक्स नं ९९९)
* दिलकी गिरह खोल दों (रात और दिन)
* हर तरफ अब यही अफसानें है (हिंदुस्थान की कसम)
* आओ ट्विस्ट करे (भूत बंगला)
* कस्मे वादे प्यार वफा सब (उपकार)
* यारी है इमान मेरा (जंजीर)

Story img Loader