हिंदीसह मराठी, बंगाली, कन्नड अशा विविध भाषांमधून तब्बल साडेतीन हजार गाणी गाणाऱ्या मन्ना डे यांचे अल्पचरित्र..
मूळ नाव- प्रबोधचंद्र डे
जन्मदिनांक- १ मे १९१९, कोलकाता येथे
काका कृष्णचंद्र डे हे प्रसिद्ध संगीतकार असल्याने घरात संगीताचे वातावरण, होते. साहजिकच मन्नादांवर लहानपणापासून गाण्याचे संस्कार झाले. के. सी. डे व उस्ताद डबीर खाँ यांच्याकडून त्यांनी गाण्याची मुळाक्षरे गिरवली. पुढे स्कॅाटिश चर्च कॉलेजमध्ये शिकताना सलग तीन वर्ष संगीत स्पध्रेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. संगीतात कारकीर्द करण्यासाठी १९४२ मध्ये के. सी. डे यांच्यासोबत मुंबईत दाखल झाले.
मुंबईत के. सी. डे, खेमचंद प्रकाश, अनिल विश्वास व सचिनदेव बर्मन यांच्याकडे संगीत सहाय्यक या नात्याने त्यांनी उमेदवारी केली. याच काळात हिंदी चित्रपटसंगीत त्यांना जवळून अभ्यासता आले. एकीकडे सहाय्यक संगीतकाराची जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी आपली मूळ आवड म्हणजे शास्त्रीय संगीताचे शिक्षणही सुरूच ठेवले होते. मुंबईत उस्ताद अमन अली खाँ आणि उस्ताद अब्दुल रहेमान खाँ यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे पुढील शिक्षण घेतले.
१९४३ मध्ये रामराज्य या चित्रपटासाठी शंकरराव व्यास यांच्या संगीत दिग्र्दशनात हिंदी चित्रपटासाठी पहिले पाश्र्वगायन करण्याची संधी त्यांना मिळाली. मात्र उपर गगन विशाल (मशाल) या सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यामुळे त्यांना लोकप्रियता लाभली. संगीतकार शंकर-जयकिशन यांनी त्यांच्या गायकीचा चांगला वापर करून घेतला. हिंदीसह मराठी, गुजराती, बंगाली, मल्याळम, कन्नड, आसामी आदी अनेक भाषांतून सुमारे साडेतीन हजार गाण्यांचे पाश्र्वगायन त्यांनी केले.
मिळालेले पुरस्कार
* १९७१ पद्मश्री ल्ल २००४ जीवनगौरव महाराष्ट्र शासन ल्ल २००५ पद्मभूषण ल्ल २००७ दादासाहेब फाळके पुरस्कार
* झनक झनक तोरी बाजें पायलिया(मेरे हुजूर) या गाण्यासाठी सर्वोत्कष्ट पाश्र्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार
* ए भाय जरा देखके चलो (मेरा नाम जोकर) या गाण्यासाठी सर्वोत्कष्ट पाश्र्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार तसेच फिल्मफेअर पुरस्कार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा