या मोहिमेसाठी जागतिक आरोग्य संघटनेने सहाय्य केले आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना बॉलीवूडमधील चित्रपटांचा आढावा घेऊन त्यात असलेल्या तंबाखूसेवनाच्या दृश्यांबाबत निषेध, प्रतिक्रिया व्यक्त करण्याची संधी दिली जाते.
या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यामध्ये पाच शाळांतील तसेच चार महाविद्यालयांमधील तरुणांनी गेल्या पाच महिन्यांमध्ये प्रदर्शित झालेल्या २० चित्रपटांचा आढावा घेतला. तंबाखूसेवनाबाबत भारतीय कायद्याने ठरवून दिलेल्या बाबींची पूर्तता या दृश्यांमध्ये झाली की नाही, याची पाहणी या तरुणांनी केली.
तरुणांनी ‘जब तक हैं जान’ या ब्लॉकबस्टरी चित्रपटापासून पाहणी सुरू केली. या चित्रपटाला ‘थम्ब्ज अप’ करून मुलांनी त्यात धूम्रपानविषयक आक्षेपार्ह दृश्ये नसल्याचा निर्वाळा दिला. पाहणीत ‘तलाश’, ‘दबंग -२’,
चित्रपटांची क्रमवारी : जब तक हैं जान, तलाश, दबंग -२, सन ऑफ सरदार, खिलाडी ७८६, सिगरेट की तरह, टेबल नंबर २१, राजधानी एक्स्प्रेस, मटरू की बिजली का मन्डोला, इन्कार, आकाशवाणी, रेस -२, लिसन अमाया, स्पेशल २६, विश्वरूपम, एबीसीडी, मर्डर-३, झिला गाझियाबाद, काय पो चे, डेव्हिड.
चित्रपटांमध्ये धूम्रपानविषयक दृश्यांबाबत सतर्कता बाळगणारे, नियम बनविणारे भारत पहिले राष्ट्र आहे. तरीही चित्रपटांमधील दृश्ये विविध पळवाटा काढताना दिसत आहेत. करण जोहर, राम गोपाल वर्मा यांसारखे दिग्दर्शक नियमांना पाळण्यात आघाडीवर आहेत.
हीरोईन चित्रपटामध्ये करिना कपूर हिने धूम्रपानाचे जे दृश्य दिले होते, ते काढून टाकण्यासाठी ‘हृदय’ संस्थेतील विद्यार्थ्यांनी करिनाला पत्र लिहिले. आपल्या आवडीचा अभिनेता सिगारेट ओढताना पाहूनच अनेकांनी पहिली सिगारेट घेतल्याचे अहवालांनी सिद्ध झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा