‘वीमेन अनलिमिटेड’ या विशेष लेखमालेसह भरगच्च मजकुराने सजलेला अक्षर दिवाळी अंक म्हणजे साहित्याची मेजवानीच! या अंकात संध्या गोखले, वंदना भागवत, राजकुमार तांगडे, अनघा भट आणि ऋषीकेश गुप्ते यांच्या कथा आहेत. ‘वीमेन अनलिमिटेड’ या विशेष लेखमालेत मलाला युसुफझाई, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां दिवंगत मृणाल गोरे, सरोगेट मातांचं वसतिगृह सुरू करणाऱ्या डॉ. नयना पटेल, स्त्रीवादी प्रकाशक रितू मेनन, युद्धाचे वार्ताकन करणारी मारी कॉल्विन यांची ओळख करून देण्यात आली आहे.
त्यासोबत रामदास भटकळ, प्रज्ञा पवार, सत्यजित भटकळ, लक्ष्मण माने, सुबोध जावडेकर, अनिल अवचट, निळू दामले आदींचे लेख आहेत. या अंकात मेधा पाटकर, उषा मेहता, शांताराम पवार यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे. संपादक – मीना कर्णिक, हेमंत कर्णिक,
पृष्ठे-२५८, किंमत – १०० रु.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा