मकरसंक्रांत आणि उत्तरायण हा हेमंत मोने यांचा १३ जानेवारीचा लेख वाचला. त्यावरील चंद्रमोहन वैद्य यांनी ३ फेब्रुवारीच्या अंकामध्ये दिलेली प्रतिक्रियादेखील वाचली. हेमंत मोने यांच्या लेखाचा एकूण रोख ‘उत्तरायण व मकरसंक्रमण यांची पृथ्वीच्या परांचन गतीमुळे होणारी फारकत’ व त्यामुळे ‘संक्रात मकरसंक्रमणाऐवजी उत्तरायणाबरोबर साजरी करण्याचे आवाहन’ असा वाटतो; तर उत्तरायण, सूर्याचे राश्यांतर, संपातिबदू वगरे कल्पना अवैज्ञानिक तसेच भ्रामक असल्याचे वैद्य यांचे म्हणणे आहे.
वस्तुत पृथ्वीच्या अनेक गतींपकी दोन प्रमुख गती म्हणजे पृथ्वीचे परिवलन व परिभ्रमण. पृथ्वीच्या परिवलनाचा एक दृश्य परिणाम म्हणजे पृथ्वीवर दिवस व रात्र होणे तर आपण स्वत राहात असलेल्या पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे ताऱ्याच्या पाश्र्वभूमीवर होणारे सूर्याचे भासमान भ्रमण हा पृथ्वीच्या परिभ्रमणाचा परिणाम. याखेरीज पृथ्वीच्या आणखी एका गतीचा म्हणजे परांचन गतीचा परिणाम म्हणजे उत्तरायण व मकरसंक्रमण यांची होणारी फारकत. मात्र पृथ्वीच्या या परांचन गतीचा परिणाम अतिशय सूक्ष्म असतो. त्यामुळे ही गती व या गतीमुळे होणारे सूक्ष्म बदल हे समजावण्यास प्रथम Celestial Mechanics समजावून घेणे आवश्यक आहे. पृथ्वी, पृथ्वीचे विषुववृत्त, पृथ्वीचा कललेला अक्ष व पृथ्वीचे सूर्याभोवती फिरण्याचे प्रतल या सर्वाचा विचार करून तयार झालेले संपातिबदू व सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन या भासमान, तरीही पूर्णपणे वैज्ञानिक संकल्पना. Celestial Mechanics या भूगोल-खगोलाशी निगडित शाखेत या व अशा संकल्पनांचा परामर्श घेतला जातो. ज्या संपातिबदूंना चंद्रमोहन वैद्य अवैज्ञानिक म्हणतात, त्यापकीच एका संपातिबदूस- ‘वसंतसंपात’ बिंदूस आरंभिबदू मानून आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेने खगोलशास्त्रीय निर्देशक पद्धत ठरविली आहे. आजही याच वसंतसंपात बिंदूस आरंभिबदू मानून मोजण्यात येत असलेल्या वैषुवांश (Right Ascension) व वैषुविकवृत्तापासून दक्षिणेस व उत्तरेस मोजलेली क्रांती (Declination) या स्वरूपात अवकाशस्थ वस्तूची स्थिती नमूद केली जाते. त्यामुळे संपात बिंदूंस अवैज्ञानिक म्हणणे चूक आहे. एकमेकांपासून दूरवर पसरलेल्या, आपसांत कोणताही संबंध नसलेल्या ताऱ्यांच्या समूहापासून तयार केलेले एकंदर ८८ तारकासमूह (Constellations) आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेने १९३०च्या तिसऱ्या कमिशनमध्ये पारित केले. १२ राशी (Zodiacal Constellations) यादेखील त्यापकीच. नोव्हेंबर महिन्यात आकाशाच्या विशिष्ट भागामधून उल्कावर्षांव होतो असे सांगणे किंवा आकाशातील अमुक अमुक वैषुवांश व तमुक तमुक क्रांती या भागामधून उल्कावर्षांव होतो असे सांगणे, यापेक्षा ‘सिंह राशीमधून उल्का वर्षांव होतो’ असे सांगणे अधिक सोयीचे नाही का? मग भले सिंह राशीतील ताऱ्यांचा त्या उल्कांशी काही संबंध नसला म्हणून काय झाले? एक Reference frame म्हणून राशी, नक्षत्रे, तारकासमूह यांचा उपयोग करणे म्हणजे अंधश्रद्धा उरी बाळगणे नव्हे.
उत्तरायण व दक्षिणायनाचा अर्थ लोक ‘सूर्य स्वत पॅक-अप करतो’ असा लावतील, या भीतीने सरसकट या संकल्पनेस ‘भ्रामक कल्पना’ठरविणे हे देखील चूक. पृथ्वीच्या कललेल्या अक्षाचा व परिभ्रमणाचा तो एक परिणाम आहे, हा शाळकरी मुलांस ठाऊक असलेला अस्सल भूगोल आहे. एकंदर, जे जे काही भासमान, ते सारे अवैज्ञानिक हे गृहीतक तर सपशेल चूक.
परांचनगती ही खगोलशास्त्रातील काहीशी अवघड संकल्पना हेमंत मोने यांनी मांडण्याचा प्रयत्न केला व त्यावरील अयोग्य टीकेमुळे जनमानसांत संभ्रम होऊ नये म्हणून हा पत्रप्रपंच.
शिशिर देशमुख,
डोंबिवली
( हेमंत मोने यांच्या भूमिकेशी सहमती दर्शविणारी पत्रे आणखी काही वाचकांनी पाठविली आहेत. या विषयावरील चर्चा आता येथेच थांबविण्यात येत आहे.)
पडसाद : जे भासमान, ते अवैज्ञानिक हे गृहीतक चूकच
मकरसंक्रांत आणि उत्तरायण हा हेमंत मोने यांचा १३ जानेवारीचा लेख वाचला. त्यावरील चंद्रमोहन वैद्य यांनी ३ फेब्रुवारीच्या अंकामध्ये दिलेली प्रतिक्रियादेखील वाचली. हेमंत मोने यांच्या लेखाचा एकूण रोख ‘उत्तरायण व मकरसंक्रमण यांची पृथ्वीच्या परांचन गतीमुळे होणारी फारकत’ व त्यामुळे ‘संक्रात मकरसंक्रमणाऐवजी उत्तरायणाबरोबर साजरी करण्याचे आवाहन’ असा वाटतो.
First published on: 17-02-2013 at 12:35 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What ever apparent that is unscientific this assumption is wrong