|| अमृतांशु नेरुरकर
आजवर अनेक विचारवंत, विधिज्ञ व अभ्यासकांनी गोपनीयतेच्या अधिकाराचा मूलभूत मानवी अधिकारांमध्ये समावेश होणे जरुरी असल्याचे आग्रही प्रतिपादन केले आहे खरे; पण गोपनीयतेची नेमकी व्याख्या काय?
आपल्या व्यक्तिगत विदेच्या (डेटा) गोपनीयतेचे रक्षण आणि खासगीपणाची जपणूक प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वपूर्ण आहे यात काही शंका नाही. आपल्या जाणिवा, क्षमता व एकंदरच संपूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी गोपनीयतेचे (प्रायव्हसी) महत्त्व अनन्यसाधारण आहे. मागील लेखांमध्ये या विषयातील विचारवंत, विधिज्ञ व अभ्यासकांची मते आपण जाणून घेतली. त्यातल्या जवळपास प्रत्येकाने गोपनीयतेच्या अधिकाराचा मूलभूत मानवी अधिकारांमध्ये समावेश होणे जरुरी आहे, असे आग्रही प्रतिपादन केलेय.
या विश्लेषणानंतरही एक प्रश्न अनुत्तरितच राहतो, तो म्हणजे- गोपनीयतेची नेमकी व्याख्या कशी करता येईल? वास्तविक गोपनीयतेची व्यापक स्तरावर अधिकृतपणे स्वीकारली गेलेली, सर्वसमावेशक अशी कोणतीच व्याख्या अस्तित्वात नाही. एका अर्थी ते अपेक्षितच, कारण या विषयासंदर्भातील प्रत्येक पैलूला न्याय देऊ शकेल अशी एकच एक व्याख्या तयार करणे सोपे नाही. उलट अशा प्रयत्नात या संकल्पनेचे सुलभीकरण किंवा सरसकटीकरण (जनरलायझेशन) होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे गोपनीयतेची सर्वसमावेशक व्याख्या करण्यापेक्षा तिच्या प्रत्येक पैलूला खोलात जाऊन समजून घेणे अधिक फायदेशीर ठरेल, ज्यामुळे या विषयाची तर्काधिष्ठित चिकित्सा आपल्याला करता येईल.
कोणत्याही व्यक्तीला सहजपणे जाणवणारा गोपनीयतेचा पहिला आणि सर्वात तार्किक पैलू म्हणजे- व्यक्तिगत माहितीची गुप्तता (सिक्रसी) राखणे. आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण सर्वच बाबतींत आपले मत व्यक्त करत नाही, अनेक खासगी गोष्टी जाणूनबुजून लपवतो. पण मग आपण स्वत:बद्दलच्या ज्या माहितीची इतरांसह देवाणघेवाण करतो ती कधीच खासगी नसते असा याचा अर्थ होतो का? उदाहरणार्थ, बऱ्याचदा मित्रमंडळींशी वा कार्यालयामधल्या सहकाऱ्यांबरोबर आपण अनेक खासगी गोष्टींबद्दल (आवडीनिवडी, आरोग्याच्या समस्या, राजकीय मते वगैरे) सहज बोलून जातो. त्यामुळे व्यक्तिगत खासगी माहितीची गुप्तता हे गोपनीयतेचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे यात वाद नाही, पण ते गोपनीयतेचे समग्र दर्शन घडवत नाही.
गोपनीयतेचा विचार, आपली काही ठरावीक गोष्टी किंवा व्यक्तींशी जवळीक साधण्याची क्षमता (इण्टिमसी) या दृष्टिकोनातूनही आपण करू शकतो. आपल्याला, विशेषत: सार्वजनिक जीवनात सतत वावरणाऱ्या व्यक्तींना (राजकारणी, खेळाडू, अभिनेते, इत्यादी) कोलाहल व झगमगाटापासून, लोकांच्या नजरेपासून दूर अशा ठिकाणी आपल्या जिव्हाळ्याच्या लोकांबरोबर वेळ घालवायला आवडतो, कारण तिथे आपल्यावर कोणाचीही पाळत नसल्याने आपण आपले विचार स्वतंत्रपणे, कोणत्याही दडपणाशिवाय मांडू शकतो. आपल्या अत्यंत जिव्हाळ्याची असलेली प्रत्येक गोष्ट किंवा माहिती बऱ्याचदा खासगी स्वरूपाचीच असते. पण म्हणून प्रत्येक खासगी अथवा गोपनीय माहिती जिव्हाळ्याची असेलच असे नाही. उदाहरणार्थ, आपला क्रेडिट कार्ड क्रमांक किंवा बँक खात्याचा क्रमांक गोपनीय असले म्हणून त्यांना कोणी आपल्या व्यक्तिगत जिव्हाळ्याची माहिती असे म्हणेल का?
गोपनीयतेचा तिसरा पैलू हा वॉरन आणि ब्रॅण्डाईस यांनी म्हटल्याप्रमाणे एकांत जतन करण्याच्या अधिकाराशी (राइट टु बी लेट अलोन) निगडित आहे. स्वत:च्या खासगीपणाचे संरक्षण करण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीकडे असायला हवा, असे गोपनीयतेचा हा दृष्टिकोन सांगतो. मग जर रस्त्यात एकटे चालत असताना कोणा अनोळखी व्यक्तीने कोणत्याही कारणासाठी आपल्याला मध्येच थांबवले किंवा लांबून हाक मारली तर प्रत्येक वेळी आपल्या एकांताचा व पर्यायाने गोपनीयतेचा भंग होतो का? एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित असताना कोणा छायाचित्रकाराने आपले छायाचित्र काढले तर आपल्या खासगीपणाचे उल्लंघन होते का? थोडक्यात, एकांत जतन करण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीकडे नि:संशय असायलाच हवा, पण हा अधिकार कधी हिरावला जातो आणि गोपनीयतेचा भंग नेमका केव्हा होतो, याचे सुस्पष्ट मार्गदर्शन गोपनीयतेची ही व्याख्या करत नाही.
गोपनीयतेची इतरही अनेक परस्परांशी संबंधित असलेली अंगे अभ्यासली गेली आहेत. उदाहरणार्थ, विश्वास (ट्रस्ट)- आपली आरोग्यासंबंधीची गोपनीय माहिती आपण आपल्या डॉक्टरसमोर विनासंकोच खुली करतो, कारण तिच्या गोपनीयतेचा भंग डॉक्टरकडून होणार नाही याची आपल्याला असलेली खात्री! दुसरे अंग म्हणजे संदिग्धता (ऑब्स्क्युअरिटी)- जर आपली वैयक्तिक विदा आंतरजालावर सहजतेने उपलब्ध होत नसेल तर गोपनीयतेच्या उल्लंघनापासून किंवा विविध प्रकारच्या सायबर हल्ल्यांपासून आपण तुलनेने सुरक्षित आहोत. याचबरोबर स्वायत्तता (ऑटोनॉमी) हेदेखील गोपनीयतेचे महत्त्वाचे अंग आहे. आपला खासगीपणा जपण्यासारखे व्यक्तिगत निर्णय कसल्याही सक्ती किंवा बाह्य हस्तक्षेपाशिवाय घेता येणे स्वायत्ततेशिवाय निव्वळ अशक्य आहे.
वर उल्लेखलेल्या पैलूंच्या बरोबरीने डिजिटल युगात गोपनीयतेला ‘नियंत्रणा’चे (कण्ट्रोल) एक नवे परिमाण मिळालेय. बऱ्याच अभ्यासकांच्या मते, विदा संरक्षणाच्या दृष्टीने वैयक्तिक माहितीच्या वहनावर व्यक्तीचे कितपत नियंत्रण आहे ही फार महत्त्वाची बाब आहे. मागील महिन्यात आपल्या गोपनीयतेच्या धोरणात (प्रायव्हसी पॉलिसी) महत्त्वाचे बदल करण्याचे सूतोवाच केल्यानंतर झालेल्या गदारोळाला उत्तर देताना व्हॉट्सअॅपने गोपनीयता आमच्या नसानसांत भिनली असल्याचा दावा केला होता व विदासुरक्षेत कसल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचे निक्षून सांगितले होते. त्या वेळी व्हॉट्सअॅपचा रोख हा खासगी विदेच्या वहनावर वापरकत्र्यांचेच केवळ नियंत्रण कसे आहे यावर होता. फेसबुकचा प्रणेता मार्क झकरबर्गदेखील विदासुरक्षा व गोपनीयतेला फेसबुकच्या आरेखनात कसे सर्वोच्च प्राधान्य दिले जाते याबद्दल विविध व्यासपीठांवर नेहमीच शपथपूर्वक सांगत असतो.
आपल्या व्यक्तिगत माहितीचे नियंत्रण पूर्णपणे आपल्या हाती आहे असे सांगून समाजमाध्यमी कंपन्या आपल्यासारख्यांना आश्वस्त करत असल्या आणि त्या भरवशावर निर्धास्तपणे माहितीची देवाणघेवाण करण्यास उद्युक्त करत असल्या, तरीही त्यांनी दिलेले हे आश्वासन हा निव्वळ एक भ्रम असण्याचीच शक्यता असते. कारण बऱ्याचदा समाजमाध्यमांचा प्रयत्न हा त्या कंपन्यांना व त्यांच्या जाहिरातदारांना अभिप्रेत असलेले वर्तन आपल्याकडून करवून घेण्याचा असतो. त्यामुळे नियंत्रण आपल्या हाती येण्याऐवजी उलट आपणच नियंत्रित होण्याचा धोका असतो.
दुसरे म्हणजे, माहितीवहनाच्या नियंत्रणासाठी द्याव्या लागणाऱ्या विविध परवानग्या (प्रायव्हसी सेटिंग्स) समजून त्यावर कृती करणे बऱ्याचदा सामान्य वापरकत्र्याच्या आकलनापलीकडे असते. परत या कंपन्यांची गोपनीयतेची धोरणे वरचेवर बदलत असतात, ज्याचा सतत पाठपुरावा करत राहणे अशक्यच असते. त्यामुळे याबाबतीतल्या आपल्या निष्क्रियतेला आपली ‘मूक संमती’ समजले जाण्याचा पुष्कळ धोका असतो. थोडक्यात, डिजिटल संसाधने वापरताना गोपनीयतेचे संपूर्ण नियंत्रण हे वापरकत्र्याच्या हाती असते हे गृहीतक जरी मान्य केले तरीही सर्वसामान्य वापरकत्र्याला त्याचा फारसा उपयोग होईल याची शाश्वती नाही. डिजिटल युगातील गोपनीयतेचे विश्लेषण करताना हा विषय पुढे विस्ताराने पाहूच.
वरील विचारमंथनातून गोपनीयता या विषयाची व्याप्ती ध्यानात येऊ शकेल. म्हणूनच आजवर या विषयाच्या अभ्यासकांनी तिची व्याख्या तयार करण्याऐवजी तिचे विविध कंगोरे जाणून घेण्याचाच केवळ प्रयत्न केलाय. जॉर्ज वॉशिंग्टन लॉ स्कूलचे मानद प्राध्यापक व गोपनीयतेसंदर्भातल्या विषयांचे तज्ज्ञ डॅनिएल सोलॉव्ह यांच्या म्हणण्याप्रमाणे, हा विषय नीट जाणून घेण्यासाठी गोपनीयतेच्या या विविध पैलूंची पार्श्वभूमी ध्यानात ठेवून गोपनीयतेचे उल्लंघन नेमके कधी व कसे होते, आपल्या खासगी विदेचे संकलन, विश्लेषण आणि वहन कसे होते, विदासुरक्षेतल्या तडजोडीमुळे आपले कितपत व कशा प्रकारचे नुकसान होऊ शकते, नवतंत्रज्ञानामुळे गोपनीयतेला नेमके कोणते धोके पोहोचतात यांसारख्या विषयांचे आकलन होणे गरजेचे आहे. या लेखमालेत विदासुरक्षा व गोपनीयतेचे आपण वरील मुद्द्यांच्या अनुषंगानेच विश्लेषण करणार आहोत.
असो. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात लागलेल्या तारयंत्र (टेलिग्राफ) व टेलिफोन या दोन महत्त्वपूर्ण शोधांमुळे खासगीपणाच्या उल्लंघनाची परिभाषा आमूलाग्र बदलली. या दोन्ही शोधांमुळे दीर्घ अंतरावरील दोन व्यक्ती वा संस्थांना जलदगतीने संदेशवहन व संभाषण करणे सहजशक्य झाले. पण त्याचबरोबरीने खासगी संदेश अथवा संभाषणांवर अधिकृत वा अनधिकृतपणे डल्ला मारण्यासाठीचे टॅपिंग तंत्रज्ञानही समांतरपणे अस्तित्वात आले. नवतंत्रज्ञानामुळे गोपनीयतेवरच्या हल्ल्यांची व्याप्ती व वारंवारता पुढील काळात वाढतच जाणार होती, ज्याची ही केवळ नांदी होती. टॅपिंग तंत्रज्ञानाच्या उदयामुळे गोपनीयतेवर झालेल्या परिणामांची चर्चा पुढील लेखात करू.
लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ओपन सोर्स, विदासुरक्षा व गोपनीयता तसेच डिजिटल परिवर्तन या विषयांचे अभ्यासक आहेत.
amrutaunshu@gmail.com