मीजरी २६ हून अधिक वष्रे नौदलाच्या सेवेत असलो, तरीही माझी आई आणि माझ्या बऱ्याच मित्रांना आम्ही नेमके काय करतो? हे अद्यापही माहीत नाही़ ‘मैं हू ना’ या हिंदी चित्रपटात शाहरूख खानला बोमन इराणी जसा वेगवेगळ्या नावांनी संबोधतो, तशीच माझी आई मला कमिशनरपासून ते फौजदारापर्यंत कोणत्याही नावाने हाक मारत़े माझ्या काही नातेवाईकांच्या मते तर माझं आयुष्य अगदी हेवा वाटावा असं आह़े याचं कारण नौदल काय करतं हेच त्यांना माहीत नसतं़ पारंपरिकरीत्या देशाच्या संरक्षणाबाबत नौदल तीन भूमिका बजावत़े लष्करी कारवाया, रखवालदारी आणि धोरणात्मक भूमिका़ त्यात आता आणखी एका गोष्टीचीही भर पडली आहे, ती म्हणजे मानवतावादी साहाय्य आणि आपत्ती निवारण़ या पूर्वीही अनौपचारिकरीत्या हे काम नौदलाकडे होतेच, पण आता ते रीतसर नौदलाकडे आह़े आता नौदलाच्या या जबाबदाऱ्या क्रमाने सोदाहरण पाहूया़ आपली सागरी मालमत्ता, किनारपट्टी यांचे रक्षण करणे, एवढय़ापुरतीच नौदलाची लष्करी भूमिका मर्यादित नाही; तर प्रत्यक्ष युद्धप्रसंगांत देशाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी साहाय्य करणे, हीसुद्धा नौदलाची जबाबदारी आह़े १९७१च्या युद्धात तर भारतीय नौदलाने लक्षणीय कामगिरी केली होती़ बेधडक कारवाई करीत भारतीय नौदलाच्या नौका थेट कराचीच्या किनाऱ्याला भिडल्या होत्या़ विक्रांत या विमानवाहू नौकेवरील विमानांनी तर शत्रूवर बॉम्बगोळ्यांचा भडिमार केला होता़ या युद्धात ‘गाझी’ ही पाकिस्तानची पाणबुडीही आपण उद्ध्वस्त केली होती़ नौदलाच्या लष्करी कारवाईचं याहूनही ताजे उदाहरण घ्यायचं, तर श्रीलंकेच्या कारवाई अर्थात ऑपरेशन पवनअंतर्गत भूदलाला केलेल्या साहाय्याचे घेता येईल़ तसेच ‘ऑपरेशन कॅक्टस’अंतर्गत नौदलाने ताब्यात घेतलेल्या एमव्ही प्रोग्रेस लाइटमुळे मालदीवमधील बंड शांत करण्यातही मोठे साहाय्य झाले होत़े
१९९९ साली कारगीलच्या युद्धात आणि त्यानंतर ‘ऑपरेशन पराक्रम’ या मोहिमेच्या वेळी नौदलाने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानी युद्धनौकांना त्यांच्या नाविक तळातून बाहेर पडणंही अवघड झालं होतं़ सागरी सुव्यवस्था राखणं, हे रखवालदार म्हणून नौदलाचं कर्तव्य असतं़ समुद्र किती विस्तृत असू शकतो हे फार लोकांच्या लक्षातही येत नाही़ आम्हाला मात्र बऱ्याच कायदेशीर आणि विधायक उपक्रमांना साहाय्य करत असताना समुद्रात अनेक बेकायदेशीर गोष्टीही पाहायला मिळतात़ जशा की, चाचेगिरी, शस्त्र- अमली पदार्थ यांची अवैध वाहतूक, मानवी तस्करी, अनधिकृत मासेमारी, समुद्रतळातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा अवैध उपसा, विध्वंसक शस्त्रास्त्रांचा प्रसार आणि समुद्रोद्भव आतंकवाद अशी काही समुद्रात चालणाऱ्या बेकायदेशीर गोष्टींची उदाहरणे आहेत़ ऑक्टोबर २००८ पासून एडनच्या आखातात भारतीय नौदल चाचेगिरीविरोधात घेत असलेले श्रम हा ‘रखवालदार’ म्हणून नौदल बजावीत असलेल्या कामगिरीचे उत्तमउदाहरण आह़े आम्ही आतापर्यंत दोन हजारांहून अधिक नौकांची समुद्र प्रवासात सुरक्षेसाठी सोबत केली आह़े मोठय़ा संख्येने चाच्यांना ताब्यात घेतलं आह़े तसेच सोमालियन चाच्यांकडून त्यांचे प्रभावक्षेत्र वाढविण्याचे होणारे प्रयत्नही आम्ही सातत्याने हाणून पाडत आहोत़
सैनिक, धर्मप्रचारक, व्यापारी आदीच्या प्रवासासाठी अज्ञात काळापासून नौकांचा वापर होत आला आह़े त्यामुळे नौका आणि नौदल हे केवळ वस्तूंच्याच नव्हे, तर विचार, रीतिरिवाज, परंपरा आणि संस्कृतीच्या देवाणघेवाणीचं माध्यम बनलं़ त्यामुळे दुसऱ्या देशात जाणाऱ्या युद्धनौकांना एकाप्रकारे ‘राजदूत’च समजलं जातं़ परदेशात तैनात केल्या जाणाऱ्या आपल्या नौका आपल्या वतीने सद्भावनेचा संदेश पोहोचवत असतात आणि मैत्रीचा सेतूही उभारतात़ एकमेकांना समजून घेण्यासाठी आणि चांगल्या बाबींची देवाणघेवाण करण्यासाठी इतर देशांच्या मोठय़ा किंवा मध्यम आकाराच्या नौदलासोबत आम्ही जेव्हा सराव करतो, तेव्हा लहान नौदलांच्या क्षमता वाढविण्यासाठी प्रशिक्षण उपक्रमांचं आयोजन करणं आणि तांत्रिक सल्ले देणं आदी प्रकारे साहाय्य त्यांना करतो़ मॉरिशस आणि सियचिल्स या लहान देशांना तर त्यांच्या सागरी सीमामध्ये गस्त घालण्यासही आम्ही सहकार्य करतो़ तसेच आपल्या सागरी शेजाऱ्यांना काही मूलभूत सुविधांसाठीही नौदल साहाय्य करतं़ आपल्या देशाच्या संकल्पनेतून आलेली आणि देशातच बांधण्यात आलेली नौका, ही बाब जगासमोर आपल्यासाठी अभिमानाची ठरत़े आपल्या देशाची तंत्रज्ञानातील आघाडी आणि विशेष क्षमता असणाऱ्या मोजक्याच देशांपैकी आपणही एक असल्याचं प्रात्यक्षिक जगासमोर सादर केलं जातं़ त्या वेळी आपल्या देशातील विविधता, बहुत्वता आणि बहुजिनसीपणा आदी गोष्टींचं प्रतिनिधित्व आमची माणसं करत असतात़ थोडक्यात सांगायचं तर, भारतीय नौदलाचे सैनिक आपल्या चैतन्यपूर्ण लोकशाही, बहुसांस्कृतिक आणि बहुधार्मिक समाजजीवनाची जगभर जाहिरात करत असतात़   ‘मानवी साहाय्य आणि आपत्ती निवारण’ ही शस्त्र धारण करणाऱ्या प्रत्येकाची निर्विवाद जबाबदारी आह़े परंतु, इच्छा आणि प्रत्यक्ष कृती यांच्यातील अंतर भरून काढण्याची क्षमता असणंही महत्त्वाचं असतं़ भारतीय नौदलाकडे ही क्षमता अतिउत्तम आह़े २००४ सालच्या त्सुनामीनंतर आपण भारतातच नव्हे, तर श्रीलंका, मालदीव, इंडोनेशिया या देशांनाही साहाय्य केले आह़े
नौदलाच्या वेगवेगळ्या भूमिका पाहता एक गोष्ट स्पष्ट होते की, नौदलाचं अस्तित्व देशाचा व्यापारउदीम अव्याहत आणि सुरळीतपणे सुरू राहण्याची शाश्वती देत असतं़ जगातील ९० टक्के व्यापार हा समुद्रमार्गेच चालतो़ जगात शांतता आणि स्थैर्य टिकून राहण्यासाठी हा व्यापार सुरळीत सुरू राहणे आवश्यक आह़े केवळ कल्पना करून पाहा तुमच्या गाडीसाठी तुमच्याकडे इंधन नसेल किंवा तुमच्या कारखान्यात तयार झालेल्या वस्तू घेऊन निघालेला कंटेनर चाच्यांनी लांबवला, तर काय होईल? सागरी वाट सुरक्षित ठेवून नौदल देशाच्या विकास आणि भरभराटीची हमी देतं़ या वर्षीच्या नौदल सप्ताहाची संकल्पनाही ‘सागरी शक्ती देशाच्या भरभराटीसाठी’ अशीच आह़े यात समुद्री सुरक्षितता आणि आर्थिक वृद्धी यातील संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आह़े नौदलामुळे शासकीय तिजोरीला भरुदड बसतो, असा काही जणांचा चुकीचा समज आह़े उलट राष्ट्रीय संपत्ती निर्मितीला आम्ही हातभार लावत असतो़ भारतीय नौदल खडा पहारा आणि कणखर कारवायांनी गेल्या दोन दशकांपासून भारतीय अर्थव्यस्थेच्या वृद्धीतील छुपा पण महत्त्वाचा भाग बनला आह़े माणसे आणि मालाची मुक्तपणे ने-आण, जागतिक बाजारपेठेत प्रवेश, नवनवीन विचारांची देवाणघेवाण, अशी जी आंतरराष्ट्रीय यंत्रणा आपण पाहात आहोत, ती नाविकांच्याच व्यवहारातूनच निर्माण झालेली आह़े त्यांच्यासाठी जगाच्या पाठीवरचा सगळा समुद्र सारखाच होता आणि आह़े ‘वसुधैव कुटुंबकम्’ या प्राचीन उक्तीपेक्षा ही यंत्रणा वेगळी नाही़ ज्या भारतीय नौदलाकडे १९४७ साली अध्र्या डझनापेक्षाही कमी गलबतं होती, तेच नौदल आज जगातील मोठय़ा नौदलांपैकी एक झालं आहे आणि म्हणूनच भारतीय नौदल प्रगतिपथावर असलेल्या भारताचा महत्त्वाचा घटक आह़े समुद्र ही इंटरनेटची पहिली आवृत्ती आहे, नाविक हे जागतिकीकरणाचे प्रणेते आहेत आणि त्यांचा शुभ्र गणवेश हा मूळचा काळा कोट आहे, अशी कल्पना केल्यास ‘नौदल’ म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं सोपं होईल़ भारतीय नौदल जागतिक सागरी मूल्य आत्मसात करतानाच आपल्या देशाचे अद्वितीय समाजजीवनही दर्शवीत आह़े पांढऱ्या गणवेशातील आपल्या या मंडळींचे अभिनंदन करण्याची आणि त्यांचं देशासाठीच योगदान साजरे करण्याची हीच योग्य वेळ आह़े

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा