मुंबई विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) अकरावीचे प्रवेश ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून केले जाणार आहेत. या भागात अकरावीच्या एकूण २ लाख ७२ हजार ४२ जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी इनहाऊस, अल्पसंख्याक व व्यवस्थापन कोटा वगळून राहिलेल्या १ लाख ५३ हजार ४७८ जागा ऑनलाइनमधून भरल्या जातात. या जागांसाठी दर वर्षी सुमारे दोन लाखांच्या आसपास विद्यार्थी इच्छुक असतात.
ऑनलाइनला जागा जरी खूप असल्या तरी विद्यार्थ्यांचा कल पदवी महाविद्यालयाशी संलग्नित नामवंत कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याचा असतो. तसेच, शिक्षणाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक आदी अशैक्षणिक उपक्रमांसाठी नावाजल्या जाणाऱ्या महाविद्यालयांनाही विद्यार्थ्यांच्या पसंतीक्रमात वरचे स्थान असते. अकरावीला मनाजोगे महाविद्यालय मिळावे यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांना देण्यात आलेली अकरावी ऑनलाइची माहिती पुस्तिका नीट वाचणे आणि त्यातील सूचनांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना अडणाऱ्या अनेक लहानसहान बाबींचा खुलासा या पुस्तिकेत केला गेला आहे. याशिवाय http://fyjc.org.in/mumbai या संकेतस्थळावरही विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा