प्रियांका वाघुले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
फिटनेसच्या बाबतीत रुपेरी पडद्यावरचे कलाकार हे आपल्यासाठी पहिला आरसा ठरतात. त्यांचा फिटनेस, त्यांची शरीरयष्टी आपल्याला भावली की ते नेमके कोणता व्यायाम करतात, काय डाएट घेतात, याचा शोध आपण घेतो. ‘फिट-नट’ या सदरातून तरुण कलाकारांची फिटनेस स्टोरी आपण जाणून घेणार आहोत.
सध्या अक्की.. अक्की म्हणून दोन नायिकांमध्ये अडकलेल्या जो नायक घराघरांत परिचित आहे तो म्हणजे चिन्मय उद्गीरकर. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार २००९’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला चिन्मय पहिल्यांदा स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘स्वप्नांच्या पलीकडले’ या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आला. तो लोकप्रिय ठरला ते ‘नांदा सौख्य भरे’ आणि सध्या सुरू असलेली ‘घाडगे अँड सून’ या मालिकेतून.. फिटनेसच्या फंडय़ात चोख असणारा चिन्मय नियमित व्यायाम करतो. शूटिंगमधून वेळ काढून व्यायाम करण्याची तारेवरची कसरत ही प्रत्येक कलाकाराला करावीच लागते. शूटिंगच्या वेळा आणि आपला व्यायाम याचे गणित जुळवणे, हा प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतो. कारण फिट राहणे आणि फिट दिसणे हे कलाकार म्हणून त्यांच्यासाठी गरजेचे असते. फिट राहण्यासाठी जिम, व्यायाम याच्याबरोबरीने ध्यानधारणाही तितकीच महत्त्वाची असते, असं चिन्मय सांगतो. त्याच्या फिटनेस फंडय़ात व्यायामापेक्षाही ध्यानधारणेला अधिक महत्त्व असल्याचे त्याने सांगितले.
स्वत:च्या शरीरयष्टीसाठी मेहनत करणे हे प्रत्येकालाच आवडतं असं नाही, पण फिट राहण्यासाठी आपल्याला ते करावं लागतं आणि ही शारीरिक मेहनत घेण्यासाठी आपल्याला आपल्या मनाला रोजच तयार करावं लागतं. मनाला शिस्त लावायची तर त्यासाठी मुळात आपल्या मेंदूला तशा सूचना देणे, त्याला सतर्क ठेवणे महत्त्वाचे ठरते आणि इथे व्यायामाआधी ध्यानाचे महत्त्व असते, असं त्याने सांगितलं. ध्यानधारणा म्हणजे स्वत:च्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे. विचारांवर, बुद्धीवर प्रभुत्व मिळवणे, आत्मसंवाद साधणे होय. व्यायामासाठी जी मनाची शक्ती लागते ती ठाम निश्चयातून येते. मला माझे मन-शरीर फिट ठेवायचे असेल तर मला व्यायाम केलाच पाहिजे, हा विचार ठाम असावा लागतो. ध्यानधारणेद्वारे स्वत:वर नियंत्रण आणणे, संयम वाढवणे आणि मनाचा निश्चय वाढवणे शक्य होते. त्यामुळे फिजिकल फिटनेस राखण्यासाठी मेन्टल फिटनेसचा विचार पहिला केला पाहिजे. व्यायामाला ध्यानाची जोड देणे गरजेचे आहे, असे चिन्मयने सांगितले.
त्यामुळे रोजच्या नियमित व्यायामाबरोबर चिन्मय ध्यानधारणेला वेळ देतो. आत्मपरीक्षण करतो. ज्यामुळे आपल्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची गरज भासत नाही. कोणत्याही परिस्थितीत आपले मनोबल राखण्यासाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल, हा विश्वास असल्याने रोज ठरलेल्या व्यायामानंतर थोडा वेळ ध्यान करायलाच हवे, असे तो आग्रहाने नमूद करतो.