बडय़ा हॉटेल्समध्ये, थोरामोठय़ांच्या समारंभात, परदेशातल्या शाही मेजवानीप्रसंगी भला मोठा केक कापल्याचं आपल्या ऐकिवात असतं. बडय़ा हॉटेलचे शेफच असं जिकिरीचं काम करू जाणे, असंही ते पाहिल्यावर वाटतं. असे एक्स्ट्रीम केक सहजासहजी पाहायलादेखील मिळत नाहीत; पण मुंबईतल्या आठ जणी हा समज खोटा ठरवणार आहेत. मुंबईच्या मॉलमध्ये हा एक्स्ट्रीम केक बघायला मिळेल.
येत्या २४ डिसेंबरला मालाडच्या इनफिनिटी मॉलमध्ये दहा फूट लांब आणि दहा फूट उंच केक साकारण्यात येणार आहे आणि तो बनवणार आहेत होम बेकर्स.. म्हणजे घरच्या घरी प्रोफेशनल क्वालिटीचा केक बनवणारे. बेकिंगची आवड जपणाऱ्या पुनीत भाटिया, मेगन मकवाना, रचना आनंद, इशा फर्नाडिस, तेजल, मलाइका बाप्तिस्ट, पायल दोशी, स्वाती सुब्रमण्यम या आठ जणी हा भलामोठा केक बनवणार आहेत. ३२ डिग्री स्टुडिओतर्फे हे आगळं केक आर्ट एक्झिबिशन भरवण्यात येत आहे.
या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना यातल्या एक होम बेकर स्वाती सुब्रमण्यम म्हणाल्या, ‘‘ख्रिसमसनिमित्त हा उपक्रम करतोय. सांताक्लॉजची स्लेज ही केकची थीम असेल. आम्ही आपापल्या घरी या केकचे पार्ट्स बनवून मग मॉलमध्ये ते सांधणार आहोत. साधारण ३०० किलोचा हा केक असेल.’’ केक मास्टर राकेश सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली हा केक बनवण्यात येणार आहे. ‘‘या केकमध्ये थर्माकोल किंवा कुठल्याही डमीचा वापर आम्ही करणार नाही. १० फुटांचा पूर्ण भरीव केक असेल,’’ असंही स्वाती म्हणाल्या. केक कटिंग सेरिमनीसुद्धा मॉलमध्ये होणार असून त्यानंतर मॉलमध्ये येणारे ग्राहक केकची चव चाखू शकतात. चॅरिटी हादेखील या उपक्रमाचा उद्देश आहे. या केकच्या विक्रीतून मिळणारी रक्कम गरजूंना दान करण्यात येणार आहे.
१० फुटांचा केक
बडय़ा हॉटेल्समध्ये, थोरामोठय़ांच्या समारंभात, परदेशातल्या शाही मेजवानीप्रसंगी भला मोठा केक कापल्याचं आपल्या ऐकिवात असतं. बडय़ा हॉटेलचे शेफच असं जिकिरीचं काम करू जाणे, असंही ते पाहिल्यावर वाटतं. असे एक्स्ट्रीम केक सहजासहजी पाहायलादेखील मिळत नाहीत; पण मुंबईतल्या आठ जणी हा समज खोटा …
आणखी वाचा
First published on: 19-12-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 ft cake