मुलींना काय कळतं फुटबॉलमधलं, त्या फक्त खेळाडूंचं दिसणं बघतात आणि त्यावरूनच फेव्हरेट प्लेअर ठरवतात, अशी सर्वसाधारण भावना. पण हे काही खरं नाही. हा खेळ समजून बघणाऱ्याही मुली आहेत. फूटबॉल-क्रेझी मुलींविषयी वेगळे दृष्टीकोन मांडणारे लेख.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘काय मस्त गोल मारलाय यार याने.. कमालच!’ रात्री दोन वाजता डोळे ताणून टीव्हीसमोर बसून अशी प्रतिक्रिया येणे ही हल्ली अत्यंत स्वाभाविक गोष्ट झाली आहे. यालाच आम्ही फिफा फीवर म्हणतो. सध्या सगळीच मुलं या फुटबॉल तापाने फणफणली आहेत. हो.. पण या तापाचेही प्रकार आहेत बरं का.. म्हणजे, ‘काय क्युट दिसतो ना हा रोनाल्डो’, असे शब्द कानावर आले तर या फीवरने मुलीला गाठलंय आणि तो साधासुधा फिवर नाही तर क्रेझी फॅन फीव्हर आहे, हे नक्की.
मुलांचं फुटबॉलसाठीचं वेड आणि मुलींचं फुटबॉलवरचं ‘सो कॉल्ड प्रेम’ यात फरक आहे. एखादीला कदाचित फुटबॉलच्या टेक्निकॅलिटीज माहीत असतीलच नाही असं नाही. पण ते अपवादवगळता बहुतेक क्रेझी फॅन क्लबमधल्या मुली आवडत्या फुटबॉलरला स्क्रीनवर पाहण्यासाठी सगळी तगमग करतात. एरव्ही नवीन फॅशन ट्रेंड्स डिस्कस करणारे मुलींचे संवाद आता फुटबॉलविषयी जास्तच बोलके होऊ लागलेत. या फीवरचे इफेक्ट्स थेट व्हॉट्स अप आणि फेसबुकपर्यंत जाऊन पोचलेत. आपल्या आवडत्या फुटबॉलरचे फोटो डिसप्लेपिक, कव्हर फोटो किंवा स्क्रीन सेव्हर म्हणून ठेवणे ही नवीन पद्धतच रुजू लागलीये. एखादा नवीन बॉलीवूड हीरो आवडावा तसाच काहीसा प्रकार या फुटबॉलरच्या बाबतीत घडून येताना दिसतोय.
ख्रिस्तियानो रोनाल्डो, मेस्सी, म्युलर यांवर कॉलेज-गोअर मुली आता फिदा झाल्यात.                     यावरून एक गोष्ट मात्र क्लीयर झाली आहे, हल्लीची पिढी म्हणजे ‘जशी लाट येईल तसं पोहायचं’ या वाक्याला सार्थ ठरवते. फुटबॉलमधलं अ ब क ड माहीत नसलेल्या मुली फुटबॉल फॉलो करताना दिसतायत. क्या बात है! लगे रहो!       