मितेश जोशी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मराठी मनोरंजनसृष्टीत चॉकलेट बॉय अशी ओळख असणारा अभिनेता स्वप्निल जोशी याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. नाटक, मालिका, चित्रपट, वेबमालिका अशा सगळय़ाच माध्यमातून त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. स्वप्निलच्या मते प्रत्येक हाताची चव वेगळी असते.. त्यामुळे त्या पदार्थाची गोडीही वेगळी जाणवते.
स्वप्निलच्या दिवसाची सुरुवात ब्लॅक टीने होते. त्यानंतर तो थेट दुपारी एक ते दोनच्या सुमारास पोटभर जेवतो. संध्याकाळी चहा आणि हलका नाश्ता झाल्यानंतर रात्री दहा वाजता जेवण या वेळा काटेकोर पाळत तो खाण्यापिण्याचं रुटीन जपतो. मधल्या वेळेची भूक शमवण्यासाठी ऋतुमानानुसार त्याला वेगवेगळी पेयं प्यायला आवडतात. दुपारचं जेवण त्याचं सेटवरच होतं. शूटिंगसाठी जागा निश्चित करण्याआधी त्याच्या अवतीभवती डबे देणारे कोण आहेत? हे सर्वात आधी मी चेक करतो, असं तो सांगतो. खाण्यापिण्याची सोय उत्तम होणार असेल तरच जागा फिक्स केली जाते. तो खाण्याच्या वेळेच्या बाबतीत काटेकोर असला तरी काय खायचं याबाबतीत तो मस्त कलंदर आहे. त्यामुळे त्याला रोज वेगवेगळय़ा डिश ट्राय करायला आवडतात. दाल फ्राय तडका आणि चायनीज फ्राइड राइस हे पंजाबी चायनीजचं विरोधी कॉम्बिनेशन त्याला प्रचंड आवडतं.
बालपणीच्या खवय्येगिरीच्या आठवणी सांगताना स्वप्निल म्हणाला, ‘वयाच्या नऊ वर्षांपर्यंत मी अत्यंत बारीक व अशक्त होतो. आईने माझी तब्येत सुधारण्यासाठी जिवाचा अक्षरश: आटापिटा केला. वेगवेगळय़ा भाज्या, कोशिंबिरी, उसळी, डाळी यांचा हल्लाबोल माझ्यावर व्हायचा. आई-बाबांना लोक गमतीने चिडवायचे की तुम्ही याला खायला घालता की सगळं तुम्हीच खाता? कारण माझे आई-बाबा दिसायला खात्यापित्या घरचे वाटत होते. आणि मी त्याच्या पूर्ण विरुद्ध! शाळेत असताना रामायणाच्या निमित्ताने मला बाहेर जायची व बाहेरचं खायची सवय लागली. त्यानंतर माझी हळूहळू तब्येत सुधारायला लागली. यावर आई नेहमी गमतीने म्हणते, जोपर्यंत याला घरचं खायला घालत होते तोपर्यंत हा अशक्त होता. जेव्हा याला वडापाव खायला दिला तेव्हा याची तब्येत सुधारली’. माझ्या शाळेतली दिनचर्याही ठरलेली असायची. मला आई दोन डबे द्यायची. बाबा बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कामाला होते. त्यामुळे शाळेत सोडायला आणि न्यायला बाबाच यायचे. दुपारी साडेचार वाजता शाळा सुटल्यावर भूक लागलेली असायची. गिरगावात स. का. पाटील उद्यानात कुटुंबसखी नावाची महिला गृहउद्योग संस्था होती. त्यांच्याकडे गरमगरम पोहे, उपमा, बटाटावडा खायला आम्ही पितापुत्र जायचो. जर कुटुंबसखीत स्कूटर वळली नाही, तर बाबा चहा ब्रेड द्यायचे, अशा आठवणी त्याने सांगितल्या.
‘श्रीकृष्णा’ मालिकेच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने स्वप्निल बडोद्याला गेला व तिथे त्याला गुजराती खाद्यसंस्कृतीची ओळख झाली. ‘गुजराती जेवण हे गोडसर असतं. गुजराती आणि महाराष्ट्रीय जेवण बऱ्यापैकी सारखं आहे. आपल्याकडची वरणफळं किंवा चकोल्या गुजरातमध्ये दाल ढोकळी नावाने ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील करंजीला गुजरातमध्ये ‘घुगरा’ म्हणतात. नाव वेगळं, पण पाककृती सारखीच आहे. गुजराती मंडळी पाककृतींच्या बाबतीत मला ओपन माइंडेड वाटतात. त्यांना मनापासून वाटतं की आपल्या पाककृती इतर प्रांतीय लोकांनासुद्धा कळाव्यात. बडोदा शहरातील बाकरवडी जगप्रसिद्ध आहे. बाकरवडी महाराष्ट्राची की गुजरातची यावर खूप चर्चा होतात. मला अशी माहिती मिळाली होती की वडोदऱ्यामध्ये ‘जगदीश फरसाण’ नावाचं प्रसिद्ध दुकान आहे. १९७० मध्ये पुण्यातील रघुनाथराव चितळे तिथे गेले होते. त्यांनी ‘जगदीश फरसाण’वाल्यांकडे बाकरवडीची चव घेतली. त्यांना ती खूप आवडली. मग त्यांनी ती बाकरवडी महाराष्ट्रातही प्रसिद्ध केली. चितळय़ांची बाकरवडी आपल्याकडे महत्त्वाची.. या दोन्हींची चव थोडी वेगळी आहे. पुण्यात मिळणारी बाकरवडी जरा तिखट तर गुजराती लोकांची आवड लक्षात घेऊन ‘जगदीश फरसाण’ची बाकरवडी ही थोडी गोडसर असते’ असं तो सांगतो.
आईच्या हातचे उकडीचे मोदक जगात भारी..असं म्हणणारा स्वप्निल आईच्या हातच्या खाद्यपदार्थाचं चवीने वर्णन करतो. ‘माझी आई उत्तम सुगरण असल्याने तिच्या हातचे सगळेच पदार्थ आवडतात. त्यातही तिने बनवलेलं उपवासाचं थालीपीठ, पुरणपोळी, साबुदाणा खिचडी, पंचामृत आणि उकडीचे मोदक हा माझ्यासाठी हळवा कोपरा आहे. आईच्या हातच्या उकडीच्या मोदकांचे चाहते भरपूर आहेत. त्यामुळे आईला किमान ५० ते १०० उकडीचे मोदक एकावेळी बनवावेच लागतात. नैवेद्याचे मोदक वेगळे आणि मित्रमैत्रिणींना वाटायला वेगळे, असा खटाटोप आईला कायम करावा लागतो. हिरवंगार केळीचं पान, त्यावर छान डावं-उजवं करून वाढलेला नैवेद्य आणि जोडीला आईच्या हातचे सुबक, पांढरेशुभ्र, रेखीव मोदक पाहताना मिळणारा आनंद वेगळाच असतो. त्यात अनामिक सात्त्विक भाव असतो’ असं तो नमूद करतो.
स्वप्निलची बायको लीना ही पेशाने डेंटिस्ट असून ती मूळची संभाजीनगरची आहे. त्यामुळे तिची जेवण बनवण्याची एक वेगळी पद्धत आहे. लीना घरी आल्यापासून आमच्या घरी काँटिनेंटल पदार्थ बनायला लागले, असं तो सांगतो. ‘लीना मुलांसाठी एक शिस्तप्रिय आई आहे. ती त्यांच्यासाठी बाहेरून एकही पदार्थ मागवत नाही. जे काही हवं ते मी स्वत: बनवेन हा तिचा हट्ट असतो. त्यामुळे ती ब्रेडपासून चायनीज, इटालियन, पंजाबी आदी सगळे पदार्थ घरी उत्तम बनवते. मुलांनी पिझ्झाचा हट्ट केला तर ती तिच्या क्लृप्त्या वापरून त्यांच्या पुढय़ात हेल्दी पिझ्झा पेश करते. तिच्या हातचे पोहे, पनीर बटर मसाला, स्प्रिंग रोल, पास्ता आणि पावभाजी हे पदार्थ मला खूप आवडतात. हॉटेलमध्ये मिळणारे सर्व पदार्थ ती स्वत: उत्तम बनवते’ असं स्वप्निलने सांगितलं.
गेल्या ३५ वर्षांत शूटिंगच्या निमित्ताने वेगवेगळय़ा ठिकाणी, वेगवेगळय़ा मित्रांबरोबर त्याने खवय्येगिरी केली आहे. खवय्येगिरीत मित्रांची मोठी साथ मिळाली आहे, असं तो म्हणतो. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’च्या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान घडलेला एक किस्सा त्याने सांगितला. ‘या मालिकेत सगळे नावाजलेले कलाकार होते. आम्ही सगळे जण पंगत लावल्यासारखे एकत्र जेवायला बसायचो. लंचब्रेक म्हणजे आमच्यासाठी एक उत्सव असायचा. एके दिवशी आम्ही मालिकेतील तरुण तुर्क सेटच्या जवळच असणाऱ्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो. जाताना आम्हाला दिग्दर्शक सतीश राजवाडे याने तंबी दिली होती की तासाभरात परत या. तुम्ही शूटिंगला आला आहात याचं भान ठेवा. आम्ही काही तेवढय़ा वेळात परत येणार नाही याची जाणीव मी मोहन जोशींना दिली. त्यांनी तुम्ही बिनधास्त जा.. असा सल्ला दिल्यानंतर आम्ही पसार झालो. मोहन काका मुद्दाम त्यांच्या सीनला रिटेक करत होते. आम्ही येईपर्यंत त्यांनी सीन संपू दिला नाही. आम्ही आल्यावर सगळे जण रेडी झालो आणि पुढचा टेक त्यांनी लगेच ओके केला. एका टेकमध्ये काम उरकणारे मोहन जोशी आज फक्त आमच्यासाठी सीन ताणत आहेत हे सतीशच्या नंतर लक्षात आलं पण तो त्यांना काही बोलू शकला नाही. आमच्यावर प्रचंड चिडला. आमच्या खाबूगिरीसाठी मोहन काकांनी आमची बाजू सांभाळून घेतली’ अशी आठवण त्याने सांगितली.
स्वप्निल प्रचंड फुडी असल्याने त्याच्या खवय्येगिरीचे अचाट किस्से आहेत. एकदा त्याला दिल्लीला करिन्समध्ये जाऊन बटर चिकन खाण्याची तलफ आली. तेव्हा तो कॉलेजमध्ये शिकत होता. त्याने अत्यंत साधा सोपा बेत केला. चर्नीरोडवरून ट्रेन पकडून तो चर्चगेटला गेला व मित्रांना भेटला. मित्रांना भेटल्यावर दिल्लीला जाऊन बटर चिकन खायचा बेत ठरला. चर्चगेटवरून ट्रेन पकडून मित्रांचं त्रिकूट मुंबई विमानतळावर आणि मग विमानाने थेट दिल्लीत पोहोचलं. तिथे उतरल्यावर रिक्षाने जामा मस्जिदपाशी गेले. करिन्समध्ये भरपेट बटर चिकन खाऊन परत दिल्ली विमानतळावर आले. फ्लाइट पकडून पुन्हा मुंबईत.. विलेपार्ले स्टेशनला येऊन चर्नीरोडसाठी ट्रेन पकडली आणि रात्री कॉलेजमधून घरी यावं अशा आवेशात सगळे जण आपापल्या घरी गेले. अतिशयोक्ती वाटावा असा हा प्रसंग त्याच्या खाण्याच्या बाबतीत असलेल्या रसिकतेची जाणीव करून देण्यासाठी पुरेसा आहे.
स्वप्निलच्या मते लज्जतदार, स्वादिष्ट जेवण हा एक परिपूर्ण अनुभव असतो. नाक, डोळे, जिव्हा यांना तृप्त करत त्याचा आस्वाद जेव्हा शरीरभर पसरत मनभर विस्तारतो तो आनंद शब्दातीत! म्हणूनच प्रत्येकाच्या हातची चव ही वेगळी असते. खाद्यपदार्थाची चव तुमच्या भावनांना जागं करते. त्यामुळे वेगवेगळय़ा ठिकाणी जाऊन वेगवेगळय़ा डिश सतत ट्राय करत राहा. ती चव तुम्हाला कुठल्या तरी आठवणींच्या हिंदूोळय़ावर घेऊन जाईल किंवा ती चव तुम्हाला काही तरी नवं शिकवून जाईल, असा सल्लाही त्याने दिला.