मितेश जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सहजसुंदर अभिनय, उत्तम संवादफेक यामुळे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’मधली अरुंधती ही व्यक्तिरेखा खूप लोकप्रिय आहे. ही लोकप्रिय अरुंधती साकारणाऱ्या अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरला गोड खायला व खिलवायला प्रचंड आवडतं. रोजच्या स्वयंपाकघराचं तिचं शास्त्र सांगताना ओटय़ापलीकडचं जगही स्त्रियांनी अनुभवायला हवं असा विचार ती मांडते.. 

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर ही मूळची पुण्याची आहे. कलाकारांना फिटनेसचं भान ठेवावंच लागतं, त्याअनुषंगाने अनेक जण दिवसाची सुरुवात ताज्या फळांचा रस पिऊन करतात. मधुराणीलाही सफरचंद, गाजर, डािळब, बीट अशा वेगवेगळय़ा भाज्यांचे व फळांचे रस प्यायला आवडतं. कधी कधी त्याऐवजी दुधात भिजवलेला राजगिरा लाडू, नाचणीची खीर, नाचणीचं सत्त्व खायला काय हरकत आहे असं म्हणणाऱ्या मधुराणीचा भर हा लिक्विड ब्रेकफास्टवर असतो. चित्रीकरण स्थळी पोहोचल्यावर ती प्रोटीन शेक पिते. जेवणाच्या आधी लागलेली क्षणिक भूक फळ किंवा ताकावर भागवून दुपारच्या जेवणात ती भाजी भाकरी आणि सोबत लज्जत वाढवायला मुगाचं वरण घेते. दुपारी एनर्जी वाढवायला चहा किंवा कॉफी प्यायला तिला आवडतं. तर रात्रीच्या जेवणात वेगवेगळय़ा पिठांची थालीपिठं, टोफू खाऊन ती ‘नो कार्ब्स डाएट’ फॉलो करते.      

 ‘आम्ही सलग १२ ते १३ तास काम करत असतो. त्यामुळे आळस झटकून एनर्जी टिकवून ठेवण्याकडे सगळय़ांचाच प्रयत्न असतो. मी माझं वैयक्तिक डाएट तयार केलं आहे. आहाराबाबतच्या उलटसुलट मतांमुळे आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो. आपण या वादात न पडता आपल्या आवडीचा आहार आरोग्यपूर्ण आहे की नाही हे तपासून त्यात योग्य बदल करून घ्यायला हवेत. मला स्वत:ला नाचणी खायला हलकी वाटते, त्यामुळे माझ्या आहारात तिचं प्रमाण जास्त आहे’ असं ती म्हणते. सेटवरच्या खवय्येगिरीत गोड खाण्याचं प्रमाण अधिक असतं, असं तिने सांगितलं. ‘आम्रखंड, श्रीखंड, आमरस असे पदार्थ मागवून मी खाते आणि सेटवर सगळय़ांना खायला घालते. आइस्क्रीम माझा विकपॉइंट आहे. सेटवर अभिनेत्री अर्चना पाटकर माझ्यासाठी खास मासे करून आणतात. माझी स्वयंपाकीण चिकन उत्तम बनवते. तिच्या हातच्या चिकनचे चाहते सेटवर आहेत. मला खेकडे खायलाही आवडत असल्याने अधूनमधून क्रॅब पार्टीही सेटवर होते. अभिनेत्री ईला भाटे यांच्या हातचे पदार्थ खाताना मला माझ्या आईच्या हातच्या पदार्थाची आठवण येते. लाल भोपळय़ाचं भरीत, तोंडलीची भाजी, बटाटय़ाची भाजी ईला ताई उत्तम बनवतात. माझ्या डब्यात सुरणाचे काप, घोसाळय़ाचे काप, पालकाची दह्यातली कोशिंबीर असे वेगवेगळे पदार्थ असतात’ अशा सेटवरच्या खाऊच्या आठवणी सांगताना ती रमते.

मधुराणी आणि तिची मुलगी स्वराली यांचीही खाण्या-खिलवण्याची आपली एक गंमत आहे. ‘स्वरालीला माझ्या हातची चिंचगुळाची आमटी प्रचंड आवडते. सध्या मी चित्रीकरणामुळे मुंबईत तर ती पुण्यात तिचं शालेय शिक्षण पूर्ण करते आहे. मला फार वैविध्यपूर्ण स्वयंपाक येत नाही हे तिला माहिती असल्याने तिच्या माझ्याकडून माफक अपेक्षा असतात. पुण्यात असले की तिला डब्यात छोले, बटाटय़ाची रस्साभाजी ते पार भातात कालवून चिंचगुळाची आमटी अशा फर्माईशी पूर्ण करून देते. ती आता दहा वर्षांची आहे, त्यामुळे ओटय़ाजवळ उभी राहून काही ना काही बनवते. मी फार चहाप्रेमी नाही, पण तिच्या हातचा चहा प्यायला खूप आवडतो. तिने डिझाइन केलेली एक मॅगीची रेसिपीही मला खूप आवडते. आम्ही दोघी एकमेकींना वेळ देण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवतो’ हे सांगताना मायलेकींना एकत्र आणण्यात खाणं कसं दुवा बनलं आहे याविषयीही तिने सविस्तर माहिती दिली. ‘स्वरालीसुद्धा आजकाल यूटय़ूबच्या रेसिपी बघून पदार्थ बनवू लागली आहे. ती पदार्थ बनवते तेव्हा मी तिची मदतनीस म्हणून काम करते. माझ्या या साध्या कृतीमुळे तिचाही स्वयंपाकघरात वावर राहतो. उन्हाळय़ाच्या सुट्टीत ऑस्ट्रेलियाला फिरायला जाण्याआधी मी तिला तिथे फिरण्याचे पॉइंट शोधून ठेव असं सांगितलं होतं, तेव्हाही तिने पहिले खाण्याचे ठेलेच शोधले. मी माझ्या आईबरोबर स्वयंपाकघरात कधी वावरले नाही किंवा तिच्या बाजूला उभी राहून काही बनवायलाही शिकले नाही. स्वरालीच्या बाबतीत तसं होऊ नये म्हणून मी माझ्या बाजूने पुरेपूर प्रयत्न करते’ असं तिने सांगितलं.

आईच्या हातचा आंब्याचा शिरा, गुलाबजाम, पुरणपोळय़ा आणि गुळाच्या पोळय़ा.. बाबांचं आवडतं चमचमीत खाणं, शाळेच्या डब्यात सात्त्विक पोळीभाजी असा आहार आवडीने खाल्ला जायचा हे सांगणाऱ्या मधुराणीने कॉलेजच्या दिवसांत बाहेरचं खाणंही तितकंच अनुभवलं. ‘आमच्या एस.पी. कॉलेजजवळ तिलक नावाचा आमचा अड्डा होता. तिथल्या समोशाची चव आजही जिभेवर रंगाळते. त्या वेळी पुण्यात पहिल्यांदा चायनीज हा प्रकार हातगाडय़ांवर मिळायला सुरुवात झाली होती. आयुष्यात पहिल्यांदाच अमेरिकन चॉप्सी मी युनिव्हर्सिटीजवळच्या ठेल्यावर कॉलेजमध्ये असताना खाल्ली होती. तेव्हा अजिनोमोटो वगैरेची काही अक्कल नव्हती. खिशाला परवडणारे पदार्थ खाल्ले जायचे’ असं तिने सांगितलं.   

मधुराणीने स्वयंपाकघरात नांदणारे बल्लवाचार्य जवळून पाहिले आहेत. ‘माझे सासरे उत्तम स्वयंपाक बनवायचे, कारण माझ्या सासूबाई खूप लवकर गेल्या. तूप कढवण्यापासून ते अगदी मिरच्या आणून त्याचा घरगुती मसाला बनवणं, इतर स्वयंपाकघरातील अत्यंत बारीक गोष्ट ते आवडीने करत. तेव्हा आतासारखा यूटय़ूबचा जमाना नव्हता. सराव करून करून ते शिकले. मी खरं तर माझ्या सासऱ्यांकडून स्वयंपाक बनवायला शिकले. ते अत्यंत सुंदर इडल्या बनवायचे. पीठ तयार करण्यापासून ते इडलीपात्रात इडल्या लावण्यापर्यंत त्यांची स्वत:ची वेगळी पद्धत होती. त्यांच्या देखरेखीखाली स्वयंपाक आणि स्वयंपाकघरातील शिस्त दोन्ही शिकले’ असं ती म्हणते. अर्थात असं असलं तरी स्त्रीने निगुतीने स्वयंपाक करणं हे तिच्यावर लादलं जाता कामा नये, असं स्पष्ट मत ती व्यक्त करते. आपल्या आईचं उदाहरण तिला या दृष्टीने महत्त्वाचं वाटतं. ‘माझी आई उत्तम शास्त्रीय गायिका. तिने तिची पीएच.डी. ६५ व्या वर्षी पूर्ण केली. ती संगीत क्षेत्रात नाव कमावू शकली असती, पण तिचा बराचसा वेळ स्वयंपाकघरात जायचा. माझे वडील उद्योजक होते, ते दुपारी साडेतीनला जेवायला यायचे. त्यामुळे आमच्यासाठी वेगळा स्वयंपाक, दुपारी बाबांसाठी ताजा गरमागरम स्वयंपाक असा तिचा तामझाम असायचा. त्याऐवजी एकदाच सकाळी उठून काही चमचमीत पदार्थ स्वत: करणं, इतर कामांसाठी बाई लावणं हे करून ती वेळ वाचवू शकली असती. तिचं करिअर आणि परिणामी आयुष्य ती वेगळं घडवू शकली असती. मात्र सर्वगुणसंपन्न स्त्री म्हणून स्वयंपाकघरातच अति वावरणाऱ्या स्त्रियांना पाहून मला हे नक्कीच करायचं नाही हा माझा निश्चय पक्का झाला होता’ असं तिने सांगितलं.

मी रोज ओटय़ाजवळ नांदत नसले तरी वेळेला मागेही हटत नाही. कामानिमित्त मुंबईत असले तरी माझ्या घरच्यांचे पुण्यात अजिबात हाल होत नाहीत. आतापर्यंत मी दहा घरं बदलली, प्रत्येक ठिकाणी मला स्वयंपाकासाठी उत्तम मदत मिळत गेली. माझ्या कुटुंबीयांनी माझे विचार स्वीकारत माझे करिअर घडवण्यासाठी मदतच केली. एकमेकांच्या विचारांचा स्वीकार केल्यानेच नातं घट्ट होतं, असं ती म्हणते. स्वयंपाक कोणी करायचा, यावर वाद घालत बसण्यापेक्षा स्वयंपाकघर हा परस्परांमधलं नातं दृढ करणारा दुवा ठरू शकतो. आलेले पाहुणे, बाहेर गप्पा ठोकणारा पुरुष आणि आत राबणारी बाई, असं चित्र बऱ्याच घरांतून बदलत चाललं असलं तरी ते प्रमाण वाढणं आवश्यक आहे, असं ठाम मत ती व्यक्त करते. समोरच्याच्या मनात शिरण्याचा मार्ग पोटातूनच जातो म्हणतात. आता एखाद्या स्त्रीच्या मनात शिरण्यासाठी पुरुषांनीही सांभाळून घ्यायला हरकत नाही, असा वेगळा दृष्टिकोन मधुराणीने दिला.

viva@expressindia.com