‘त्याचा’ आत्मविश्वास नि विचारांतील सुस्पष्टता ‘त्याच्या’ बोलण्यातून जाणवते. फायनान्समधल्या आकडय़ांशी खेळताना ‘तो’ फायनान्शिअल प्लॅिनगचाही विचार करतो. त्यानं तबलावादन नि क्रीडाप्रकारांत नपुण्य मिळवलंय. इव्हेंट मॅनेजमेंट हे त्याचं पॅशन आहे. हा आहे साहिल जानोरीकर. त्यानं पुण्याच्या एमआयटी कॉलेजमधून टी.वाय.बी.कॉम. केलंय. तिथूनच फायनान्समध्ये एमबीए केलंय नि आता तो इंटरनॅशनल बिझनेसमध्ये एमबीए करतोय. पहिल्यापासून त्याला फायनान्समध्ये रस असून मार्केटिंगपेक्षा फायनान्सचं काम त्याला जास्त आवडतं. त्यामुळे फायनान्स सिलेक्ट केलं. त्याखेरीज पुण्यातल्या ‘अॅम्बिशन सोल्युशन लìनग इन्स्टिटय़ूट’मधून तो ‘सर्टफिाइड फायनान्शिअल प्लॅनर’चा वर्षभराचा कोर्स करतोय. ‘सीएफपी’मध्ये विविध फायनान्शिअल प्लॅिनगच्या गोष्टी शिकायला मिळत असल्यानं त्यानं तेही करायचं ठरवलं. सध्या ओळखीच्यांना तो त्याच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारावर मदत करतोय. प्रसंगी शैक्षणिक सल्लाही देतो. त्याची आई भेंडीबाजार घराण्याची गायिका आहे. तर वडील एअरफोर्समधून निवृत्त झाल्यावर एका कंपनीत संचालक आहेत. आपलं शिक्षण असो किंवा स्वत:च्या पायवर उभं राहणं असो, त्यानं घरच्यांशी विचारविनमय करून आपले निर्णय घेतल्येत. त्याच्या सगळ्या अॅक्टिव्हिटींच्या धावपळीत त्याचे आईबाबा सतत त्याच्या पाठीशी असतात.
पदवीनंतर एमबीए फायनान्समध्ये करायचा निर्णय त्यानं आधीपासूनच विचारपूर्वक घेतला होता. कारण मार्केटिंग किंवा फिरण्याच्या जॉबपेक्षा त्याला फायनान्शिअल बाबींमध्ये अधिक रस आहे. फायनान्शिअल गोष्टी स्ट्राँग असतील तर बिझनेस कसा चालतो, ते जाणून घ्यायला त्याला आवडतंय. ‘मार्केटिंग हे संवादकौशल्यानं करता येतं. पण फायनान्स हे क्षेत्र असं आहे की, मार्केटिंगच्या लोकांना फायनान्स येत नाही, पण फायनान्सचे लोक मार्केटिंग करू शकतात,’ असं त्याला वाटत असल्यानं त्यानं फायनान्सची निवड केली.
इव्हेंट मॅनेजमेंट ही साहिलची पॅशन आहे. तो सांगतो की, ‘माझे आजोबा पंडित त्र्यंबकराव जानोरीकर हे भेंडीबाजार घराण्याचे कलाकार. त्यांच्या वेळोवेळी होणाऱ्या मफिलीचं होणारं आयोजन मी लहानपणापासून बघत होतो. त्यामुळे मला कार्यक्रमांचं आयोजन करण्यात रुची निर्माण झाली. पुढं एमआयटीमध्ये अनेक प्रकारच्या इव्हेंट्समध्ये मी सहभागी झालो होतो. केवळ सहभाग नाही, तर लीड घेऊन त्यात उतरलो होतो. अशा प्रकारे ही इव्हेंट मॅनेजमेंटची आवड मूळ धरू लागली. एमबीएला असतानाही फेअरवेल पार्टी, दांडिया वगरेंचं आम्ही आयोजन केलं. एमबीए करत असतानाच मी ‘इन्जिनिया इव्हेंट्स अँण्ड प्रॉडक्शन्स‘ ही कंपनी आदित्य पाचपोर या मित्रासोबत काढली. ‘इन्जिनिया’ या शब्दाचा अर्थ आहे क्रिएटिव्ह माइंड. लोकांपर्यंत पोचून त्यांना त्यांच्या गरजेनुसार सíव्हस देणं हे आमची व्हिजन आहे. ‘युवर सक्सेस इज अवर मिशन’ हे आमचं मिशन आहे. त्या आधारे आम्ही क्लाएंटना यश मिळवून देतो. तो इव्हेंट त्यांच्या लक्षात राहील असा प्रयत्न करतो. आम्ही एन्टरटेन्मेंट, ब्रँड प्रमोशन आणि कॉर्पोरेट इव्हेंट मॅनेजमेंट या सíव्हसेस देतो. ‘एन्टरटेन्मेंट’मध्ये लाइव्ह स्टेज शो, शॉर्ट फिल्म, फॅशन शो, सेलेब्रेटी मॅनेजमेंट थीम पार्टी इत्यादी, ‘ब्रँड प्रमोशन’मध्ये प्रॉडक्ट लॉन्च्िंाग, रोड शोज, सेल्स प्रमोशन्स इत्यादी नि ‘कॉर्पोरेट इव्हेंट’मध्ये कॉर्पोरेट टूर्स, सेमिनार्स, उद्घाटन समारंभ इत्यादी आयोजित करतो. आम्ही ‘बिफोर ब्लूमिंग’ या शॉर्ट फिल्मचंही प्रॉडक्शन केलंय. टीनएजर्स मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या संदर्भातल्या या लघुपटात अनेकदा अत्याचार करणारे मोकाट सुटतात नि त्या मुलींना समाज स्वीकारतो की नाही, यावरचं भाष्य होतं. लघुपट स्पध्रेसाठीही हा लघुपट पाठवलाय.’
दिवसातून तासभर तरी अभ्यास करणारच असं त्यानं मनाशी पक्क ठरवलंय. तेव्हा तो थिअरी, सम्स करणं, वाचन वगरे गोष्टी करतो. काही वेळा मात्र ते शक्य होत नाही. तो पंडित मकरंद पिळणकरांकडे तबला शिकलाय. त्याच्या ‘मेघ बँड’मध्ये इन्स्ट्रमेंटल क्लासिकल फ्यूजन वाजवलं जातं. ‘एफटीआयआय’मध्ये विद्यार्थ्यांच्या ट्रेिनगसाठी म्हणून त्याची तबल्याची रेकॉìडग्ज झाल्येत. अभ्यास नि या सगळ्या अॅक्टिव्हिटीजचं व्यवस्थित प्लॅिनग केलं, तर त्यात नक्कीच यश मिळेल, असं त्याला वाटतं. या सगळ्यात त्याच्या टीमची त्याला खूपच मदत होते. कॉलेजमध्ये असताना, ही कंपनी सुरू करण्याआधी त्यानं आयोजलेला दांडियाचा इव्हेंट यशस्वी ठरला होता. मुलांसाठीच्या टूरचंही यशस्वी आयोजन केलं होतं. तेव्हा त्याचं डायरेक्टरांसहित सगळ्यांनी कौतुक केलं होतं. तो आर्ट क्लबचा हेडही होता. कॉलेजनं त्याला कायम सपोर्ट केल्याचं तो सांगतो.
शाळेपासून पदवीपर्यंत तो सगळ्या प्रकारच्या क्रीडास्पर्धात सहभागी झाला होता. त्यानं स्पोर्ट्स हेड म्हणूनही काम केलंय. काही वेळा स्पर्धाच्या आयोजनांतही तो सहभागी झाला होता. हँडबॉल नि बास्केटबॉलची त्याला अधिक आवड आहे. त्यानं अॅथलेटिक्समध्ये १०० मीटर धावण्यात भाग घेतला होता. डेक्कन जिमखान्याकडून तो अॅथलेटिक्स खेळायचा. सध्या अभ्यास नि कंपनीच्या कामांमुळे त्याला खेळाला वेळ द्यायला जमत नाहीये. पण या अॅक्टिव्हिटीज करताना फिटनेसलाही तेवढंच महत्त्व द्यायला हवं, हे तो मान्य करतो. त्याचा मित्रसंग्रह मोठा असून या वेगवेगळ्या ग्रुपमधल्या मित्रांची साथ त्याला कायमच लाभल्येय.
एका नावाजलेल्या संस्थेसाठी १४ सप्टेंबरला ‘िहदी दिनाच्या’ निमित्तानं पुण्यातील १०० शाळांमध्ये िहदी विषयावरील निबंधस्पध्रेचं आयोजन त्यांनी केलं होतं. हे मोठय़ा स्तरावरच्या कामात प्रत्येक शाळेची परवानगी घेणं, ती ती शाळा इव्हेंट कधी घेणार याचं नियोजन करणं, सुपरव्हिजन वगरेंचं नियोजन करणं आदी कामं त्यांनी केली. या इव्हेंटमुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला. ते विविध कॉर्पोरेट कंपन्यांसाठी डान्स शो, फॅशन शोज, म्युझिकल शोज, रॉक बँड्स आदींचं नियोजन करतात. काही फॅशन शो त्यानं स्वत: कोरिओग्राफ केले होते. प्रसंगी मॉडेल म्हणून त्यानं शोमध्ये वॉकही केलाय.
साहिल म्हणतो की, ‘इव्हेंट मॅनेजमेंट करताना आपले कॉन्टॅक्ट्स, लोकसंग्रह वाढवायला हवा. कस्टमरची गरज पूर्ण करता यायला हवी. क्लाएंटविषयीचा अभ्यास पूर्ण करायला हवा. त्याची यथास्थित माहिती हवी. एकदा लोकसंग्रह वाढला की आपोआप आपले क्लाएंट्सही वाढतात. त्यांना सेवा पुरवताना त्यात झोकून देऊन काम करावं लागतं. कॉन्टॅक्ट्स वाढवणं हा माझा छंद आहे. आपण आपल्या सíव्हसची हाय लेव्हल कायमच मेन्टेन केली पाहिजे. क्लाएंटला खोटी आश्वासनं देऊ नका. क्लाएंटही विचारी असतोच. आपली सíव्हस ही एक कमिटमेंट असून ती शंभर टक्के पूर्ण करायला हवी. ‘परफेक्शन इज अवर मिशन’ या आमच्या ब्रीदवाक्यानुसार त्या दिशेनं आम्ही वाटचाल सुरू केल्येय. पुढं इव्हेंट मॅनेजमेंटसोबत फायनान्समध्ये काहीतरी बिझनेस सुरू करायचा विचार आहे.’ इतरांना यशस्वी करता करता आपणही यशस्वी व्हायचं, हे साहिलचं मिशन पूर्ण होणार, यात शंका नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा