साधारण साडेपाच वर्षांपूर्वी म्हणजे ६ ऑक्टोबर २०१० ला एक मोबाइल अॅप्लिकेशन लाँच झालं. फोर्ब्स तसंच अॅप स्टोअर मेट्रिक्सच्या माहितीनुसार जगभरात दर दिवशी साधारण ३०० ते ४०० अॅप्स लाँच होतात. हा डेटा दर वर्षी बदलत असतो. पण मुद्दा हा आहे की या भाऊगर्दीत लाँच झालेल्या ‘त्या’ अॅपने इतिहास रचला. त्या अॅपने तरुणाईला एवढी भुरळ घातली की फेसबुकच्या मार्क झकरबर्गला असुरक्षित वाटू लागलं आणि त्याने ते अॅप थेट विकतच घेऊन टाकलं. ते अॅप म्हणजे इन्स्टाग्राम. इन्स्टंट कॅमेरा आणि टेलिग्राम या शब्दांचा मिलाफ करून तयार झालेलं हे कॅची नाव तरुणाईच्या मुखी नांदू लागलं. नुकत्याच बदललेल्या चेहऱ्यामोहऱ्यामुळे इन्स्टाग्राम पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. पण मुळात इन्स्टाग्राम लोकप्रिय होण्यामागचं कारण काय? इतक्या सोशल नेटवर्किंग वेबसाइट्स असताना इन्स्टाग्रामचं वेगळेपण ते काय?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा