एका सर्वसामान्य मराठी मध्यमवर्गीय घरातली मुलगी, कुठलीही फिल्मी किंवा ग्लॅमर विश्वाची पाश्र्वभूमी नसताना फॅशन विश्वात शिरकाव करते, तिथल्या सर्वस्वी अनोळखी वातावरणात नेटानं काम करते, सर्वोच्च मानाचा किताब मिळवते आणि चांगलीच स्थिरावते.. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी कथा अमृता पत्की नावाच्या मुलीच्या खऱ्या आयुष्याची कथा आहे. तीच उलगडणार आहे या महिन्याच्या व्हिवा लाउंजमधून!
मॉडेलिंगची आवड असणाऱ्या अनेक मुली असतात. पण या मोहमयी दुनियेतला शिरकाव सोपा नाही हेच ऐकून असतात. फॅशन विश्वाबद्दल अनेक समज-गैरसमज असल्याने सहसा सामान्य घरातली मुलगी इथे यायला धजावत नाही. माध्यमांनीही फॅशन विश्वाची अशीच प्रतिमा तयार केली आहे. पण या सगळ्याला छेद देत अमृता इथे स्थिरावली. ‘मिस इंडिया’ स्पर्धेत यश मिळवल्यानंतर २००६ साली ‘मिस अर्थ’ या आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेतही तिने ‘मिस अर्थ एअर’ हा किताब मिळवला आणि तिच्या मॉडेलिंगच्या करिअरची वाट सुकर झाली. अमृता आज देशातील टॉप मॉडेल्सपैकी एक गणली जाते. मोठमोठय़ा डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक करण्याबरोबरच ती इंटरनॅशनल म्युझिक कॉन्सर्टचं सूत्रसंचालन करते. मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी काय करायचं ? रॅम्पच्या लखलखाटामागे कसं वातावरण असतं ? हे सगळं अमृताच्या तोंडून जाणून घ्यायची संधी व्हिवा लाउंजच्या माध्यमातून मिळणार आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका सावरकर सभागृह आणि महाराष्ट्र वॉच कंपनी, नक्षत्र मॉल, दादर या दोन ठिकाणी उपलब्ध आहेत.
कधी : मंगळवार, २९ एप्रिल
कुठे : सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प)
वेळ : दुपारी ३.३०
कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका आजपासून उपलब्ध.
व्हिवा लाउंजमध्ये अमृता पत्की रॅम्पमागचं विश्व उलगडणार
एका सर्वसामान्य मराठी मध्यमवर्गीय घरातली मुलगी, कुठलीही फिल्मी किंवा ग्लॅमर विश्वाची पाश्र्वभूमी नसताना फॅशन विश्वात शिरकाव करते, तिथल्या सर्वस्वी अनोळखी वातावरणात नेटानं काम करते...
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-04-2014 at 07:33 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta patki in viva lounge