सर्वसामान्य कुटुंबातून आलेली, मराठी माध्यमात शिकलेली मुलगी ‘मिस इंडिया’, ‘मिस अर्थ’पर्यंत कशी पोचली याची कहाणी गेल्या मंगळवारी यशस्वी मॉडेल अमृता पत्कीबरोबर झालेल्या ‘व्हिवा लाऊंज’मध्ये उलगडली. दादरमध्ये रंगलेल्या या गप्पांच्या मैफलीत अरुंधती जोशी आणि रोहन टिल्लू यांनी अमृताला बोलतं केलं. स्त्रीकडे बघण्याची मानसिकता बदलली पाहिजे असं सांगत अमृताने फॅशन आणि मॉडेलिंगबाबतच्या सर्व प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. मॉडेलिंगबाबतचे गैरसमज पुसून टाकणारे हे अमृताचे बोल त्या क्षेत्राकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देऊन गेले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रॅम्पवरचं पहिलं पाऊल
शाळेतली-कॉलेजमधली अमृता आणि आजची अमृता यांत खूप फरक आहे. म्हणजे कॉलेजमध्ये मी अगदी गावंढळ होते असं नाही, पण मी ‘अनग्रूम्ड’ होते. हळूहळू मी बदलले. मी मुंबईच्या साठय़े कॉलेजला होते. एका सर्वसामान्य मुलीसारखी सलवार-कमीज, एक वेणी, पाठीवर सॅक अशीच मी कॉलेजला जायचे. पण जाणीवपूर्वक स्वत:त बदल करत गेले. या क्षेत्राची आवड असल्यानं कॉलेजचे फॅशन शो बारकाईने पाहिला. कॉलेजमधल्याच एका इव्हेंटदरम्यान एका फॅशन कोरिओग्राफरने मला नागपूरमधल्या एका सौंदर्य स्पर्धेसाठी विचारणा केली. त्या वेळी मी फारच गोंधळलेली होते. बिकिनी वगैरे घालण्याची माझी अजिबात िहमत नव्हती. स्टेजवर उभं राहून धीटपणे मराठी बोलण्याचाही आत्मविश्वास नव्हता. इंग्रजीत प्रश्नांची उत्तरं देणं तर दूरची गोष्ट. पण त्यांनी या स्पर्धेआधी काही दिवसांचं ट्रेनिंग दिलं आणि त्या जोरावर नागपूरच्या स्पर्धेत मी रॅम्पवर चालायचा पहिला अनुभव घेतला. त्यानंतर मग ‘मिस मुंबई’ मग ‘मिस इंडिया’, ‘मिस अर्थ’.. आय हॅवण्ट मिस्ड एनिथिंग!
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात
‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ असं काहीसं माझ्याबरोबर झालं होतं. लहानपणापासूनच आरशात पाहून नटण्या-मुरडण्याची हौस असल्याने माझं पाऊल मनोरंजन क्षेत्राकडे वळणार हे नक्की होतं. लहानपणी मी खेळण्यांऐवजी उंच टाचेचे शूज, छान ड्रेसेस, नेल पॉलिश यांची मागणी करायचे. पण तेव्हा नक्की काय करायचंय हे ठाऊक नव्हतं. जसजशी मोठी होत गेले तशी गाणं, डान्स, अभिनय शिकत होते. हळूहळू मला हवा असलेला मार्ग मिळत गेला. इच्छा तिथे मार्ग म्हणतात तसं माझं झालं. करिअरला योग्य दिशा मिळाली.
मॉडेलिंगमधील रॅट रेस
या क्षेत्रात एक प्रकारची रॅट रेस सतत चालू असते. खूप स्पर्धा आहे. या स्पर्धेत स्वत:ला टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला सतत तुमच्यात सुधारणा करण्याची आणि स्वत:ला सिद्ध करण्याची गरज असते. तुमचा पाय ओढणारे अनेक असतात. असे प्रयत्न माझ्यासोबतही झाले. पण मी न खचता आलेल्या प्रसंगाला तोंड देत माझं काम करतं राहिले. उलट त्यामुळे माझ्यातली स्वत:ला सिद्ध करण्याची ईर्षां वाढली.
फिटनेस हा आयुष्याचा भाग
पहिल्या रॅम्प वॉकच्या वेळेची मी आणि आत्ताची मी यात मोठा फरक आहे. माझं वजन तेव्हा जास्त होतं. त्यात मला खाण्याची प्रचंड आवड आहे. अगदी आपल्या वडापावपासून ते पिझ्झा, बर्गपर्यंत सगळेच पदार्थ मी अगदी चापून खायचे. अजूनही खाते. पण मी आता तितकाच व्यायाम करून त्या कॅलरीज बर्नसुद्धा करते. किक बॉक्सिंग, झुंबा करून खाल्लेलं सगळं बर्न करते. लहानपणापासूनच तशी मी मध्यम बांध्याची होते, पण आत्तासारखी बारीक नव्हते. ‘मिस इंडिया’ बनण्याआधी माझं वजन सुमारे ६८ किलो होतं. नंतर मेहनतीने योग्य डाएटिंग आणि व्यायामाच्या मदतीने मी ८-१० किलो वजन कमी केलं.
‘मिस इंडिया’नं आयुष्य बदललं
मिस इंडिया स्पर्धेत मी उतरले, तेव्हा मेहनत करण्याची तयारी आणि आत्मविश्वास याशिवाय माझ्याकडे काही नव्हतं. मिस इंडियाचं ४० दिवसांचं ट्रेनिंग खूप खडतर होतं. सकाळी ५ ते रात्री १२पर्यंत डाएट, रॅम्प वॉक ट्रेनिंग, जिमिंग, ग्रूमिंग सेशन्समध्ये आम्ही गुरफटलेलो असायचो. श्वास घ्यायची फुरसतसुद्धा नसे. तिथलं वातावरण सर्वस्वी वेगळं. कधी कधी तर अगदी नव्र्हस ब्रेक डाऊन व्हायची पाळी आली होती. मी फोन करून आईजवळ रडायचे. आपला निर्णय चुकला तर नाही ना? असे प्रश्न पिच्छा पुरवत. पण अशा वेळी मेहनतीवरचा विश्वास आणि घरच्यांचा पाठिंबा यामुळे मी त्या स्पर्धेतून यश मिळवलं.
इंग्रजीबद्दलचा न्यूनगंड
‘मिस इंडिया’पेक्षा माझा ‘मिस अर्थ’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतला अनुभव चांगला होता. सहज होता. आपल्याकडची एक खटकणारी गोष्ट म्हणजे लोक प्रत्येक बाबतीत पटकन मत बनवतात. जजमेंटल असतात. एखाद्या मुलीला इंग्रजी येत नसेल तर तिला कमी लेखलं जातं. आपल्या मराठी मुलींकडे टॅलेंट असतं, त्या दिसायला चांगल्या असतात, त्यांच्यात कला असते पण इंग्रजी येत नसलं तर एक कॉम्प्लेक्स असतो. मिस इंडिया स्पर्धेच्या वेळेला मला स्वतला हे जाणवलं. मराठी माध्यमात शिकल्यामुळे माझाही आत्मविश्वास थोडा कमी होता. मी मेहनतीनं इंग्रजीवर प्रभुत्व मिळवलं हा भाग वेगळा. पण हीच गोष्ट मला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अजिबात जाणवली नाही. कारण ‘मिस अर्थ’ स्पर्धेदरम्यान मी चायनीज, थाई आणि फ्रेंच मुलींना भेटले, त्यांना अजिबात इंग्रजी येतं नव्हतं, पण त्यांना प्रचंड आत्मविश्वास होता. खरं तर भारतीय संस्कृती आंतरराष्ट्रीय पातळीवर फार नावाजलेली आहे. आपली फॅशन – साडय़ा वगैरे प्रसिद्ध आहेत. त्याचं परकीयांना कौतुक आहे. त्यामुळे इंटरनॅशनल असाईनमेंट करताना मला जास्त मजा येते.
मॉडेलिंगबाबत समज- गैरसमज
माध्यमांमधून मॉडेलिंग क्षेत्राचं चुकीचं चित्र रेखाटलं जातं. चित्रपटांमधून दाखवल्या जाणाऱ्या गोष्टींपैकी फक्त तीन ते चार टक्के गोष्टीच खऱ्या असतात. बाकी मॉडेलिंगचं क्षेत्र तसं क्लीन आहे. चित्रपटात मसालेदार काही दाखवलं नाही, तर चित्रपटाची तिकिटं विकली जातील का? त्यामुळे कदाचित ‘सो कॉल्ड’ वाईट गोष्टी फोकस होतात. खरं तर असं क्षेत्र चांगलं किंवा वाईट नसतंच. सतत ग्लॅमरमध्ये असल्यामुळे या क्षेत्रातील काही गोष्टी ठळकपणे समोर येतात एवढंच. चांगली-वाईट माणसं तर सगळ्याच क्षेत्रांत असतात. तुम्ही स्वत:चा सन्मान कसा ठेवता, हे शेवटी तुमच्यावर असतं. हिच्याबरोबर नको ते वागलो तर ही कानाखाली मारायला कमी करणार नाही, अशी तुमची प्रतिमा असेल तर केवळ तुमच्या कामामध्ये इंटरेस्ट असलेली लोकंच तुम्हाला अॅप्रोच होतात. यश मिळवण्यासाठी तुम्ही किती उतावीळ झालेले आहात, स्वत:च्या टॅलेंटवर तुमचा किती विश्वास आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.
मॉडेलिंगचा अभ्यासक्रम हवा
आपल्याकडे दुर्दैवाने मॉडेलिंगकडे स्वतंत्र करिअर म्हणून पाहिलं जात नाही. हे खरं तर खूप छान करिअर आहे. विचार करा.. नटण्या-मुरडण्याची हौस पूर्ण करण्यासाठी, चांगले कपडे घालायला मिळावेत म्हणून मुली किती पैसे खर्च करतात, पण आम्ही इथे हेच काम करतो आणि त्यातून पैसेही कमवतो. तुम्हाला सुंदर दिसण्यासाठी पैसे मिळतात,असं दुसरं करिअरच नाही. परदेशात मॉडेलिंगला स्वतंत्र करिअरचा दर्जा आहे. लॅटिन अमेरिकन देशांमध्येसुद्धा मॉडेलिंग शिकवणाऱ्या संस्था आहेत. आपल्याकडेही अशा संस्थांची गरज आहे. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणींना योग्य वयात, योग्य मार्गदर्शन मिळू शकेल आणि त्यांचा स्ट्रगलचा वेळ वाचेल.
सौंदर्याची व्याख्या व्यक्तिनिष्ठ
कित्येकदा मोठमोठय़ा सौंदर्य स्पर्धामधील विजेत्यांबाबत नंतर वाद होतात. परीक्षकांवर दुटप्पीपणाचा आरोप होतो. प्रायोजकांचा हस्तक्षेप असल्याबद्दल बोललं जातं. पण माझा ‘मिस अर्थ’चा अनुभव तसा नाही. सौंदर्यस्पर्धेचं परीक्षण प्रातिनिधिक मंडळ करत असलं तरी एखाद्या व्यक्तीसाठी एक स्त्री सुंदर असेल तर दुसऱ्याला दुसरीच एखादी उजवी वाटेल. सौंदर्य स्पर्धेचे एखाद्या वर्षीचे परीक्षक बदलले तर त्याच स्पर्धकांमधून कदाचित विजेत्या बदलूही शकतील. कारण मुळातच सौंदर्याची व्याख्या व्यक्तिनिष्ठ आहे. त्यामुळे मला वाटतं, सौंदर्यस्पर्धेत उतरणाऱ्या सगळ्याच सुंदर असतात. काही जणी त्याबरोबर भाग्यवानही असतात.
रॅम्पमागची धांदल
मॉडेलिंग विश्वात आत्मविश्वासाला पर्याय नाही. रॅम्पवर एखाद्या मॉडेलने घातलेला ड्रेस एखाद्या आत्मविश्वास नसलेल्या मुलीने घातला तर फरक लगेच लक्षात येईल. फॅशन शोदरम्यान तुम्हाला आम्ही फक्त रॅम्पवर चालताना दिसतो. पण शोच्या वेळी दोन ते तीन मिनिटांच्या अवधीत कपडे, अॅक्सेसरीज, शूज बदलण्याची केवढी धडपड चालते ते कुणालाच माहिती नसतं. बॅकस्टेजला विस्कटलेले केस सारखे करणारा एक, कपडे बदलायला मदत करणारे हेल्पर, मेक-अप टचअप हे सगळं एका वेळी सुरू असतं. पुढच्या काही सेकंदांत रॅम्पवर आल्यावर मात्र हा गोंधळ आम्ही चेहऱ्यावर न दाखवता आमचा वॉक पूर्ण करतो. चेहरा वेगळा असतो, एक्स्प्रेशन वेगळं असतं. फॅशन वीकच्या वेळी दिवसाला तीन शो असतात. त्या वेळी हेअर स्प्रे, मेक-अपनं स्किन, केस बरेच डॅमेज होतात. हे सगळं सांभाळण्यासाठी वर्कआऊट, मानसिक आणि शारीरिक संतुलन सांभाळण्यासाठी मेहनत करावी लागते.
मॉडेलिंग आणि अॅक्टिंग
परदेशात मॉडेलिंग आणि अॅक्टिंग ही वेगळी क्षेत्रं आहेत. मॉडेल्सना मॉडेल म्हणून वेगळी प्रसिद्धी आहे, करिअर आहे. आपल्याकडे मात्र मॉडेल म्हणून तेवढी प्रसिद्धी मिळत नाही. त्यामुळे मॉडेलिंगच्या नंतरची स्टेप अॅक्टिंगच असणार असं थोडंसं गृहीत धरलं जातं. मॉडेलिंग करत असताना तुम्ही स्वत: असता, अभिनय करताना त्या व्यक्तिरेखेच्या भूमिकेत शिरावं लागतं. ही दोन वेगळी कामं आहेत, वेगळी क्षेत्रं आहेत. मी ‘हाईड अॅण्ड सीक’ हा हिंदी सिनेमा करताना किंवा ‘सत्य सावित्री आणि सत्यवान’ हा मराठी चित्रपट करताना हे वेगळ्या भूमिकेत शिरणं अनुभवलं. हे दोन्ही चित्रपट करण्याचा अनुभव चांगला होता, वेगळा होता.
यश आणि डिप्रेशन
प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती वयाच्या कोणत्यातरी टप्प्यावर हातात काम नाही अशा परिस्थितीला सामोरा जातोच. मॉडेलिंग क्षेत्रातसुद्धा हातात काम नाही,आता काय? असा प्रश्न अनेकदा सतावतो. या वेळी मानसिकदृष्टय़ा खचणं, डिप्रेशनमध्ये जाणं हे साहजिकच असतं. अशा वेळी तुम्ही मनाने खंबीर असणं गरजेचं आहे. सत्य पचवण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे. याचबरोबर, अशा काळासाठी काही ‘बॅकअप प्लॅन’ तुमच्याकडे हवाच. मॉडेलिंगच्या क्षेत्रातील अनेक अशाश्वत गोष्टींपैकी एक म्हणजे शासकीय नोकऱ्यांसारखं इथे पेन्शन मिळत नाही. पण तुमच्या करिअरच्या काळातच तुम्ही शासकीय नोकरीपेक्षा दसपट पैसे कमावतात. पण याच वेळी तुम्हाला बचतीची सवय लागणंही गरजेचं आहे. योग्य सेव्हिंग केल्यास तुम्हाला उतारवयात चिंता करायची गरज भासत नाही.
फॅशन मॉडेलिंग आणि वयोमर्यादा
मॉडेलिंगच्या करिअरमध्ये वयाची मर्यादा असते असा गैरसमज आहे, पण फक्त फॅशन मॉडेलिंगला वयोमर्यादा असते. कित्येक वयस्कर महिला तुम्हाला टीव्हीवर किंवा पोस्टरवर मॉडेलिंग करताना दिसतील. लग्न झाल्यावर, मुलं झाल्यावरही अनेक मॉडेल्स आपली फिगर मेन्टेन करून मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर करत आहेत. एक थोडी स्थूल मुलगी एकदा मला तिच्या मॉडेलिंगच्या इंटरेस्टबद्दल सांगत होती. आजकाल जाड लोकांचे खास ब्रॅण्ड्स आले आहेत. त्यांना अशा जाड मुलीच मॉडेल म्हणून लागतात. त्यामुळे मॉडेलिंगसाठी सडपातळ असणं गरजेचे आहे, हा समजही धुऊन निघाला आहे.
फॅशन शो आणि मालफंक्शन
वॉर्डरोब मालफंक्शन ही दुर्दैवी घटनाच असते. कुठलीही मुलगी केवळ प्रसिद्धीसाठी स्वत:ची अशी मानहानी करून घेणार नाही. त्यामुळे ते मुद्दाम करतात वगैरे यात तथ्य नाही. शोच्यादरम्यान, बॅकस्टेजला प्रचंड गोंधळ होत असतात. कधी तरी एखादे बटन लावायचे राहते किंवा नीट लागत नाही, त्यामुळे असे प्रकार घडतात.
स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला
ती मॉडेल आहे आणि तिने तोकडे कपडे घातले आहेत म्हणजे ती ‘अॅव्हेलेबल’ आहे, असा समज करून घेऊ नये. पुरुषांनी स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या देशात वेगळा आहे. तो बदलला पाहिजे. कदाचित याचमुळे परदेशात मुली बिकिनीसारखे कपडे जितक्या सहजतेने मिरवतात, तशी सहजता भारतीय मुलींमध्ये दिसतं नाही. खरं तर, मुलीने बिकिनी घातलेली असो, साडी नेसलेली असो, बुरखा असो किंवा ती मायामी बीचसारख्या ठिकाणी नग्न असो, तुमच्या नजरेतील एक स्त्री म्हणून असलेला तिचा मान कमी होता कामा नये. फॅशन शो बघताना तुम्ही मॉडेलने घातलेले कपडे बघण्यासाठी जात आहात. त्यामुळे कपडेच बघा. आपली मुलगी कमी कपडय़ात तिकडे वावरणार आणि दहा पुरुष तिच्याकडे पाहणार याच कारणासाठी भारतीय किंवा मराठी पालक आपल्या मुलींना मॉडेलिंगच्या क्षेत्रात पाठवायला राजी होत नसावेत. कदाचित हाच दृष्टीकोन चांगल्या मुलींना मॉडेलिंगपासून दूर ठेवतो.
फॅशन म्हणजे काय?
फॅशन म्हणजे एखादा असा लोकप्रिय ट्रेंड जो वारंवार मार्केटमध्ये येत राहतो. अर्थात फॅशन ही एकमेव बाब आहे, जी दिवसेदिवस काळानुसार अधिकच सुधारतं जाते. काही काळापर्यंत भारतीय फॅशन आणि इंटरनॅशनल फॅशन यांच्यात फरक होता, पण आता हा फरक पण कमी होत चालला आहे. गेल्या ३-४ वर्षांत भारतीय फॅशन जगतात खुप बदल झाले आहेत. भारतातल्या डिझाइनर्सनी परदेशात जाऊन आपली कलेक्शन्स सादर केली आहेत. आपल्याकडील साडया, घागरा चोली यांची परदेशात प्रचंड मागणी आहे. आणि आपण एकही पीन न वापरता, गाऊनपेक्षा ही सुंदररित्या साडी कशी नेसतो याचे त्यांना आकर्षण आहे.
कपडे कॅरी करण्याबाबत
तुम्हाला तुमच्या बॉडी स्ट्रक्चरबद्दल आत्मविश्वास असला, तरच तुम्ही कपडे छान कॅरी करू शकता. आम्ही मॉडेल आहोत म्हणून आम्हाला विशिष्ट मेजरमेंटमध्ये राहावं लागतं. परंतु तुम्ही विद्या बालनसारख्या अभिनेत्रीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. तिच्याकडे ‘परफेक्ट बॉडी’ नसूनही ती ज्या पद्धतीने कपडे कॅरी करते ते कौतुकास्पद आहे.
फॅशन शोची लगबग
फॅशन शोची माहिती आम्हाला सुमारे २-४ महिने अगोदर कळते. त्या वेळीच आमचे कायदेशीर करार होतात आणि मग आमची फिटिंग सेशन्स होतात आणि शेवटी रॅम्पवॉक. यादरम्यान आम्हाला शारीररिक आणि मानसिकदृष्टय़ा तंदुरुस्त असणं गरजेचं आहे. एका शोनिमित्त एका मॉडेलने करार झाला म्हणून बेफिकिरीत तिच्या फिटनेसकडे दुर्लक्ष केलं. त्याचा परिणाम म्हणजे शोच्या वेळी तिचं वजन जास्त होते. त्यामुळे शोच्या काही दिवस आधीच तिचा करार रद्द करण्यात आला होता. आता हे प्रकार सर्रास होत आहेत, कारण आता लोकं व्यावसायिकदृष्टय़ा विचार करू लागले आहेत. त्यांचे प्रॉडक्ट विकलं जाणं हे त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. मग त्यात ते तुमचा विचार करत नाहीत.
सुपर मॉडेलची संकल्पना
सुपर मॉडेलची साधी सोप्पी व्याख्या म्हणजे ज्या मॉडेलला इंटरनॅशनल रॅम्पवर चालण्याची संधी मिळते किंवा इंटरनॅशनल ब्रॅण्डसाठी काम करण्याची संधी मिळते, तिला ‘सुपर मॉडेल’ म्हटलं जातं. पूर्वी या गोष्टींचं खूप अप्रूप असायचं पण आता जग खूप छोटं झालं आहे आणि भारतीय फॅशन इंडस्ट्री मोठी झाली आहे. त्यामुळे आता बऱ्याच मुली फॉरेन असाइनमेंट करतात. याचं कोणालाच नवल वाटत नाही. मॉडेलिंग खूप प्रोफेशनल झालंय. आजकाल सुपर मॉडेल, टॉप मॉडेल आणि मॉडेल अशी तुलना होत नाही. सुपर मॉडेल ही संकल्पना आता मागे पडत चालली आहे.
तुमच्या मनाचं ऐका
मॉडेलिंगमध्ये येऊ इच्छिणाऱ्या ‘न्यू कमर्स’ना एकच गोष्ट सांगावीशी वाटते. प्रत्येकाला एक इनर व्हॉईस असतो. आपण स्वतशी संवाद साधत असतो. आपलं मन काय सांगतंय ते ऐका. कुठलीही गोष्ट पॅशनेटली, तुम्हाला करायची आहे म्हणून करता तेव्हा तुम्ही नक्कीच जीव ओतून काम करता आणि ते करताना मानसिक समाधानही मिळतं. खरोखरच मॉडेलिंग करायचं आहे का, हे आपल्या मनाला विचारा. स्पर्धेत टिकून राहण्याची मानसिक तयारी आणि आत्मविश्वास आहे का, मेहनत करण्याची तयारी आहे का, हे विचारा आणि याचं उत्तर आतून हो येत असेल तर जस्ट डाईव्ह!
टेलर आणि डिझायनर यातला फरक
स्टेजवर खरे अमिताभ बच्चन येणं आणि अमिताभ बच्चनसारखा दिसणारा माणूस येणं यात जितका फरक आहे, तितकाच फरक टेलरमेड कपडे आणि डिझाइनर कपडे यांमध्ये असतो. मी कित्येक देशांमध्ये प्रसिद्ध ब्रँडच्या कपडय़ांच्या नकला पाहिल्या आहेत. त्यात आणि ब्रँडेड कपडय़ांमध्ये बिलकूल फरक नसतो. कित्येकदा या नकला खऱ्या डिझाइन्सपेक्षा चांगल्या असतात. अर्थात हे करणं बेकायदेशीर आहे, पण कित्येकदा ब्रँडेड गोष्टी केवळ मोठय़ा ब्रँडच्या नावाने बाजारात खपतात हे सत्य आहे. ब्रँड हे कदाचित इल्युजन असेल भास असेल.
मॉडेलिंगच्या क्षेत्रात आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. तुम्हाला तुमच्या बॉडी स्ट्रक्चरबद्दल आत्मविश्वास असला, तरच तुम्ही कपडे छान कॅरी करू शकता.
पुरुषांनी स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या देशात वेगळा आहे. तो बदलला पाहिजे. कदाचित याचमुळे परदेशात मुली बिकिनीसारखे कपडे जितक्या सहजतेने मिरवतात, तशी सहजता भारतीय मुलींमध्ये दिसत नाही.
छाया : प्रदीप कोचरेकर