– रश्मी, मुंबई
अनारकलीची फॅशन सध्या खूपच लोकप्रिय झाली आहे. लग्नासारख्या समारंभात घालण्यासाठी अनारकली हा उत्तम पर्याय आहे. पण तू ज्याप्रमाणे वर्णन केलंयस त्यावरून वाटतंय की तू बरीच सडपातळ आहेस. अनारकलीचा फॉल अशा प्रकारे असतो की, व्यक्ती त्यात आहे त्याहून बारीक दिसते. तुला अनारकली घालायचाच असेल तर जाड कापडाचा पर्याय निवड. म्हणजे वेल्वेट, कोटा, ब्रोकेड वगैरे कापडांचा अनारकली घे. जॉर्जेट किंवा शिफॉनसारखा कपडा घेणे टाळ. त्याने तू आणखी बारीक दिसशील. लेअर्ड किंवा टीअर्ड अनारकली.. म्हणजे थोडय़ा झालरीसारखा पॅटर्न असलेला अनारकली तुझ्यावर छान दिसेल. अनारकलीचा घेर जास्त असेल असे बघ. अनारकलीला कळ्या जेवढय़ा जास्त तेवढय़ा चांगल्या. त्यामुळे ड्रेस आणखी फुगीर दिसतो. गळ्याशी भरगच्च काम असलेला आणि वेलवेट बेस असलेला सूट तुला चांगला दिसेल. तुझे दंड आणि हातही खूप सडपातळ असतील तर पूर्ण लांबीच्या चुण्यावाल्या बाह्य़ा अनारकलीला असाव्यात. अशाच स्टाइलचा घागरा किंवा लेहंगासुद्धा तुला सूट होईल.
फॅशन पॅशन : अनारकलीची फॅशन
प्रश्न - मी २१ वर्षांची असून बरीच सडपातळ दिसते. माझं वजन ४२ किलो आणि उंच ५.२ फूट आहे. पुढच्या महिन्यात माझ्या बहिणीचे लग्न आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-11-2013 at 01:06 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anarkali fashion