नृत्य हा जगभरातल्या नृत्यप्रेमींच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय.. सूर, ताल नि लय यांची सम साधत सकारात्मक ऊर्जेनं नृत्य करणं हे अनेकांच्या आनंदाचं निधान असतं. हा आनंद ऑफिशिअली सेलिब्रेट करायचा तो २९ एप्रिलला नृत्य दिवस म्हणून! नृत्यकलेला सीमांचं बंधन कधीच नव्हतं नि नसेल.. त्यामुळं पाश्चात्त्य डान्स फॉर्म आणि भारतीय शास्त्रीय नृत्याची समृद्ध परंपरा आजच्या पिढीपर्यंत सहजगत्या पोहोचत आहेत. गुरू परंपरेबद्दल कृतज्ञता नि आदर आजही राखला जातोय. आता नृत्य करिअर म्हणून सहजगत्या स्वीकारलं जातंय.
शो बेस्ट करायचा या भावनेमुळं मेहनतीनं केलेल्या तालमी, परफॉर्मन्सच्या वेळी वाटणारी धडधड, त्यामुळं मिळालेली ऊर्जा, सहभावना नि विश्वास, एकुणातच होणारा व्यक्तिमत्त्व विकास नि परफॉर्मन्सनंतरचा अवर्णनीय आनंद.. हे सारं काही शब्दांत चपखलपणं बसवता येणारच नाही. त्यासाठी माध्यम हवं तेही नृत्याचंच नि नृत्य कितीही शिकलं तरी थोडंच आहे, कारण ती आहे एक सर्जनकला.. सतत फुलणारी.. बहरणारी..
आपापल्या डान्स फॉर्मविषयीची मतं काही जणांनी ‘व्हिवा’शी शेअर केल्येत.
क्लासिकलचा बेस हवा म्हणून डॉ. संध्या पुरेचा यांच्याकडं आठ र्वष मी भरतनाटय़म शिकल्येय. गेले काही महिने जॅझ नि हिप-हॉप शिकत्येय. काही मराठी वाहिन्यांवरील डान्स शोजमध्ये मी सहभागी झाले होते. माझ्या भरतनाटय़मच्या परफॉर्मन्सचं संध्याताईंनी कौतुक केलं होतं. ई.टी. व्हीवरील ‘नूपुर’ या डान्स शोमधली मी सगळ्यात लहान स्पर्धक होते. त्या ‘शो’तील माझा परफॉर्मन्स दीपाली विचारे यांना छान वाटला होता. डान्स करायला मला खूप आवडतो. गाणं सुरू झाल्यावर आपोआपच ताल धरला जातो. ग्रुप डान्समध्ये स्वत:चा डान्स करता करताच आपल्या सहकाऱ्यांनाही सांभाळायचं असतं. काही चूक झाली तरी प्रेक्षकांना कळू द्यायची नसते. खरं तर परफॉर्मन्सच्या आधी थोडीशी भीती वाटते, पण मग धीर चेपून फक्त ताल से ताल मिला एवढंच फीिलग उरतं..
डान्स शिकण्याची प्रोसेस कधीच पूर्ण होत नाही. त्यात सतत नवीन गोष्टी अॅड होत असतात. साल्सा डान्सचं मी ६ महिने ट्रेिनग घेतलं असून गेली ५ र्वष साल्सा शिकतोय नि शिकवतोय. साल्सा हे सोशल डािन्सग आहे. साल्सा डान्स करताना आपण माणसं कनेक्ट करू शकतो. त्यामुळं तो अधिक आवडतो. साल्सामध्ये आपल्या पार्टनरबद्दल पूर्ण विश्वास, बाँडिंग नि कनेक्शन असणं गरजेचं आहे. मी ‘साल्सा फॉर कॉज’ असं म्हणत सातत्यानं वर्कशॉप्स घेतोय. यातील सहभागींच्या फीची रक्कम ‘स्पर्श : अ हीिलग टच’ या ‘एनजीओ’ला दिली जाते. या वर्कशॉप्समधल्या लोकांच्या चेहऱ्यांवर साल्सा शिकल्याचा आनंद नि सोशल कॉजसाठी फीची रक्कम देण्यातला आनंद हा माझ्यासाठी कायमच अवर्णनीय राहिलाय.
नृत्याचा पाया चांगला होण्यासाठी मी पहिलीपासून कथक शिकत्येय. अलीकडंच मी अलंकार झाले आहे. मला डान्समध्येच करिअर करायचंय. नृत्य ही एक नेव्हर एिण्डग प्रोसेस आहे. कितीही शिकलं तरी त्यात आपण परिपूर्ण झालोय, असं म्हणता येणार नाही. अनेक स्टेज परफॉर्मन्सेस नि स्पर्धातल्या सहभागामुळं माझ्या गाठीशी चांगला अनुभव जमा झालाय. माझीही एक स्टाइल डेव्हलप झाल्येय. आई-बाबा नि गुरू लताताई बाकाळकर यांच्या मार्गदर्शनामुळं मी इथवर पोहोचू शकल्येय. पाचवीत आशाताई जोगळेकर यांच्या बालकलाकार संमेलनातल्या माझ्या परफॉर्मन्सचं आशाताईंनी खूप कौतुक केल्यावर खूप आनंद झाला होता. ‘टीवाय’मध्ये युथ फेस्टिव्हलला मी पोदार कॉलेजला रिप्रेझेंट केलं होतं. तेव्हा मेनका पुरस्कार मिळाला होता. परीक्षकांसह अनेक दिग्गजांनी माझं कौतुक केलं होतं. डान्स म्हणजे माझ्यासाठी लाइफ. डान्स एके डान्स.
मी चौथीपासून राधा मोहन यांच्याकडं भरतनाटय़म शिकत्येय. तेव्हा मत्रिणींना शिकताना पाहून मलाही शिकावंसं वाटलं होतं. सुरुवातीला शास्त्रीय नृत्याबद्दल ढेर साऱ्या सूचनांचा भडिमार झाला होता, पण त्यांना न घाबरता मी ते ट्राय केलं नि ते मला चांगलं जमलं. विविध स्पर्धा नि कार्यक्रमांच्या निमित्तानं केवळ देशातच नव्हे, तर मॉरिशसमध्येही मला परफॉर्म करायला मिळालंय. सातवीत असताना गुरूंसोबत महिषासुरमर्दनिी बॅलेत मत्रिणीसोबत परफॉर्म करायची संधी मिळाली होती. फक्त दोन दिवसांत या नृत्याची तालीम आम्ही केली. देवीसोबत अर्थात गुरूंसोबतच्या युद्धात आम्हाला राक्षस सेनापतींचं लढणं नि मरणं व्यवस्थितपणं पेलता आलं होतं. त्याबद्दल आमचं खूप कौतुक झालं होतं. सध्या वेगवेगळ्या गाण्यांवर भरतनाटय़म कसं परफॉर्म करता येईल, याबद्दलचा विचार करून ते प्रयोग करून पाहात्येय. आसपासच्या लहान मुलांना भरतनाटय़म शिकवायचा विचार चाललाय. मी डान्समध्ये करिअर करणार नसले तरी तो शिकणं नि शिकवणं सुरूच राहणारेय.
मी श्यामल अय्यंगार यांच्याकडं भरतनाटय़म शिकल्येय. त्यानंतर शामक दावर नि फुलवा खामकर डान्स अॅकॅडमीत हिपहॉप नि कॉन्टेम्पररी डान्स शिकल्येय. सुरुवातीला माझ्या बाबांनी डान्स शिकायला परवानगी दिली नव्हती. मला तर वेस्टर्न डान्सची आवड होती. मग आईच्या पािठब्यामुळं भरतनाटय़मचा क्लास जॉइन केला. माझ्या अरंगनेत्रमच्या वेळी बाबांना डान्स ही एक चांगली कला असल्याचं जाणवल्यानं त्यांनी तो शिकायला परवानगी दिली. दोन्ही डान्स फॉर्ममध्ये मी खूप परफॉर्म केलंय. शामकच्या शोमध्ये मर्बी सरांनी माझ्या स्माइलबद्दल कॉम्प्लिमेंट देत, तुझ्या डान्समुळं खूप एनर्जी मिळते, असं सांगितलं होतं. डान्स ही माझ्यासाठी पॅशन नि नेसेसिटी आहे. डान्समुळं माझ्या तब्येतीत खूप फरक पडला. माझ्या नकारात्मक भावना बदलल्या नि आयुष्याचा छान अर्थ उमगला.
शाळेत असताना मी चार र्वष प्रभा मराठे यांच्याकडं कथक शिकले, ते क्लासिकलचा बेस हवा म्हणून. त्या सुमारास विविध माध्यमांतून वेस्टर्न डान्सच्या स्टाइल्स फेमस व्हायला लागल्या होत्या. त्यात मला अधिक रस वाटल्यानं जीआरएम्स अॅकॅडमीत मी बॉलीवूड, हिपहॉप, कॉन्टेम्पररी इत्यादी डान्स शिकले. १० र्वष या डान्स फॉर्ममध्ये असून दहावीनंतर मी इनस्ट्रक्टर झाल्येय. खूप सारे वर्कशॉप्स नि कॉम्पीटिशिन्स अटेंड केल्यात. लहानपणापासून डान्स आवडतो म्हणून तो मी शिकू लागले. आता डान्स ही एक कला म्हणून शिकण्याची मजा काही औरच आहे. गेल्या वर्षीपासून इंद्रायणी कुलकर्णी यांच्याकडं मी कथक रिजॉइन केलंय. त्यांनी माझं कौतुक केलंय. ज्येष्ठ गीतकार मेहबूब यांनी एका परफॉर्मन्सनंतर बॅकस्टेजला येऊन कौतुक करत तू माधुरीसारखा डान्स करतेस.. अशी महत्त्वपूर्ण दाद दिली होती. आणखी काय सांगू.. डान्स इज माय एक्स्प्रेशन.