उत्तम फळात गणल्या जाणाऱ्या सफरचंदाचे मूळ स्थान युरोप व आशियातील थंड पहाडी प्रदेश आहे. सफरचंदाचे झाड आकाराने लहान व रेशमासारखे मुलायम असते. त्याची पाने अंडाकार, टोकदार, दोन-तीन इंच लांब व कात्र्या-कात्र्याची असतात. याचे फळ नरम गोल व संत्र्याएवढे असून वरून चपटे असते. त्याची फुले लाल असतात. सफरचंदामध्ये अनेक जाती आहेत. त्यात गोन्हउन डेलीशस, प्रिन्स आल्बर्ट, चार्ल्स रोल्स, न्यूटन वन्डर, ब्रेमले सिडिलग, लेक्सन सुपूर्व ब्लेनहीम ऑरेज, ऑरेंज पिपिन, रेड सोल्जर व अमेरिकन मधर या दहा मुख्य जाती विशेष प्रसिद्ध आहेत. सफरचंदाचे टिकणारे पदार्थ म्हणजे त्यापासून लोणचे, मुरंबा, चटणी व सरबत बनवले जाते.
भारतात काश्मीर व कुलूच्या परिसरात व हिमालयाच्या कित्येक भागांत उत्तम प्रतीची सफरचंद होतात. पहाडी प्रदेशातही यांची लागवड केली जाते. कंदाहार व जपानसारख्या दूरच्या देशांतून आपल्या देशात पेटय़ा भरून सफरचंद विकायला येतात. सफरचंद लवकर खराब होत नसल्यामुळे ती दूरदूरच्या प्रदेशांत पाठवता येतात.
काश्मिरी सफरचंद स्वस्त असतात. सफरचंदाचा स्वाद आबंट-गोड असतो. अशा चवीचे सफरचंद उत्तम प्रतीचे समजले जाते. कारण आंबटगोड स्वाद असणारे सफरचंद पित्त-वायूचा प्रकोप शांत करतो, व आतडय़ांना मजबूत करते. सफचंदामध्ये ग्लुकोज, काबरेहायड्रेट, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, इथर, मॅलिक अॅसिड, लिसिथिन, खनिज वगरे क्षार असतात. त्यात जीवनसत्त्व बी-१ आणि सी असते. सफरचंदामध्ये टार्टरिक अॅॅसिड असल्याने ते एखाद्या तासात पचते आणि खाल्लले दुसरे अन्नही ते लवकर पचवते. सफरचंदाच्या गरापेक्षा त्याच्या सालीत जीवनसत्त्व सी जास्त प्रमाणात असते. दुसऱ्या फळांपेक्षा सफरचंदात फॉस्फरसचे प्रमाण सर्वात अधिक असते. सफरचंदामध्ये लोहाचे प्रमाणही अधिक असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा