मितेश जोशी

सिने-नाटय़ तथा मालिकासृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकमनांच्या मनात आपलं हक्काचं स्थान पक्कं करणारी यशस्वी अभिनेत्री म्हणजे अनिता दाते केळकर. मूळची नाशिकची असल्याने अनिताला नाशिकच्या हिरव्यागार भाज्यांचा आणि मिसळीचा सार्थ अभिमान वाटतो.

Oreo pancake recipe easy cake recipe at home
Oreo Pancake Recipe: काहीतरी गोड खायचंय? मग लगेच बनवा ‘ओरिओ पॅनकेक’, याची रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…
diet of small babies, Health Special, Health tips,
Health Special: लहान बाळांचा आहार कसा असावा?
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Cucumber raita recipe
बुंदी रायता नेहमीच खाता, यावेळी ट्राय करा काकडी रायता; पटकन वाचा साहित्य आणि कृती
siddhu mussewala fans commented on borthers video
Video : सिद्धू मूसेवालाच्या आठ महिन्यांच्या भावाचं झालं अन्नप्राशन; व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले, “त्याला प्रत्येक…”

अनिताच खाणं खूप सात्त्विक आहे. खूप झणझणीत, तिखट खायला तिला आवडत नाही. कमी साखर आणि कमी तेल जेवणात वापरण्याचा तिचा नियम आहे. अनिताच्या दिवसाची सुरुवात कडक कॉफीने होते. दिवसभर काही ना काही तरी गरम प्यायला हवं, असा तिचा आग्रह असतो. नुसतं पाणी पिण्यापेक्षा त्यात लिंबू पिळून किंवा चिमूटभर कॉफी पेरून प्यायला तिला आवडतं. सकाळी नाश्त्याला थोडंसं काही तरी खायचं असतं म्हणून कुठल्याही प्रकारची फॅन्सी खाणी (ओट्स, पिनट बटर वगैरे) खायला तिला आवडत नाहीत, असं ती सांगते. रात्रीच्या शिळय़ा भाताला किंवा पोळय़ांना फोडणी देऊन त्याचा फोडणी भात-फोडणीची पोळी खायला तिला भयंकर आवडतं. अनिता प्रोटीनसाठी रोज दोन अंडी खाते. सकाळी ११ च्या सुमारास क्वचित सेटवर भूक लागली तर चहा आणि बिस्कीट खाऊन ती भूक भागवते. दुपारच्या जेवणात ती सेटवरच्या जेवणातला एखाददुसरा पदार्थ व घरून डब्यात नेलेल्या पदार्थावरच तृप्त असते. भात, भाज्या आणि कोशिंबिरी आपल्याला अधिक प्रिय आहेत, असं ती सांगते. मूळची नाशिकची असल्याने तिने लहानपणापासूनच खूप ताज्या आणि हिरव्यागार भाज्या बघितल्या आहेत. पालेभाज्यांवर तर तिचा विशेष जीव आहे. डाळ मेथी, डाळ पालक, फोपळय़ाची भाजी, तांदळजाची भाजी, लाल-हिरव्या माठाची भाजी खायला व खिलवायला अनिताला आवडतं. भाज्यांमध्येही भाजीची चव राखायला तिला आवडतं. उगाचच मसाले, तेल, खोबरं पेरायला तिला आवडत नाही. या भाज्यांच्या जोडीला, ऋतुमानानुसार आहारात भाकरीचा समावेश करून घेण्यावरही ती भर देते. नागलीची भाकरी पावसाळय़ात, उन्हाळय़ात ज्वारीची भाकरी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी हिवाळय़ात खाणं हे ती कटाक्षाने पाळते.

लहानपणी शाळेत असताना आई डब्यात कुरडईची भाजी द्यायची याविषयीची आठवण सांगताना अनिता म्हणाली, ‘शाळेत असताना डब्यात काय आणलं आहे याची मित्रांच्या चमूत क्रेझ अधिक असायची. आमच्या लहानपणी मॅगी वगैरे नव्हती. तेव्हा कुरडईची भाजी माझ्यासाठी मॅगी होती आणि आजही आहे. जी कुरडई आपण तळतो त्याची भाजी अप्रतिम होते. माझी आई ती भाजी आजही सुंदर बनवते. सहा ते सात कुरडया दोन तास पाण्यात भिजत घालून नंतर त्यातील पाणी पूर्ण काढून, कढईत मध्यम आचेवर तापवलेल्या तेलात कडीपत्ता, जिरं, मोहरीची फोडणी देऊन त्यात आलं-लसूण पेस्ट, कांदा, हळद, तिखट घालून ते छान परतून त्यात भिजवलेली कुरडई आणि मीठ घातलं की आमची कुरडईची भाजीवजा मॅगी तयार. ही भाजी म्हणजे माझ्या दृष्टीने अस्सल मराठमोळी गावरान मॅगीच! शाळा सुटल्यावर भेळ आणि दाबेली मी आवर्जून खायचे. उन्हाळय़ाच्या सुट्टीत बागेत खेळायला गेल्यावर हमखास भेळ खाऊन घरी परतायचे. त्यामुळे भेळीभोवती आठवणींचा विळखा आहे. घरातून पैसे मागायचे तर भेळीसाठी मागायचे. शाळेत असताना इतकं भेळीवर प्रेम होतं,’ 

नाशिकमध्ये पदवी शिक्षण घेत असताना कॉलेजच्या समोरचा समोसा चाट खाणं मस्ट होतं, असं ती सांगते. ‘त्या काळी आतापेक्षा खर्चही कमी असायचा. पॉकेटमनी ही संकल्पना तेव्हा अस्तित्वातच नव्हती. दहा रुपयांत प्रवास भाडं सुटून खाऊन पिऊन व्यवस्थित दिवस निघायचा. त्यातूनही थोडेफार पैसे वाचवून ते साठवून समोसा चाट खाण्यात आनंद मिळायचा,’ असं ती म्हणते. कॉलेजमध्ये असताना थोडंफार कमवायला लागल्यावर नाशिकमधल्या सर्व ठिकाणच्या व सर्व पद्धतीच्या मिसळ खायला अनिताने सुरुवात केली. मिसळ खाबूगिरीविषयी व तिच्यावरच्या ओथंबून वाहणाऱ्या प्रेमाविषयी अनिता म्हणाली, ‘मिसळीचे मिसळपण तिच्या उन्मुक्त भिन्न स्वादामध्ये आहे. दर रविवारी आम्हा मित्रांचा चमू हा हमखास मिसळ खायला जायचा. दोघा-तिघांमध्ये मिळून एक मिसळ खाण्यात व जास्तीची एक्स्ट्रा र्ती फुकट मागवण्यात एक वेगळीच मजा होती. कधी चुकूनमाकून कोणी सोबत नसलं तरीही मी एकटी जाऊन मिसळ खायचे. आम्ही तेव्हा अंबिकाची, ओमटीची आणि कमलाविजयची मिसळ आवर्जून खायचो, कारण या मिसळी आमच्या रेंजमधल्या होत्या. कमलाविजयची मिसळ खायला तेव्हा सेलिब्रिटी गर्दी करायचे. माझ्या शाळेच्या रस्त्यावर ती मिसळ मिळायची. त्यामुळे सकाळी शाळेत जाताना त्या उकडलेल्या बटाटय़ांचा वास, कांद्याचा वास नाकात साठवून मी शाळेत जायचे. त्यानंतर कॉलेजला गेल्यावर माझी मी एकटी मिसळ खायला जाऊ लागले,’ असं सांगणारी अनिता नाशिककरांचं मिसळप्रेम कसं अवर्णनीय आहे याविषयीही भरभरून बोलते. ‘दर्दी खवय्य्यांच्या मिसळ चवीचे चोचले पुरवण्यात माझं नाशिक शहर कायम अग्रेसर आहे. नाशिकला येणाऱ्या कोणत्याही पर्यटकाची वा प्रवाशाची नाश्त्यासाठी पहिली पसंती मिसळीलाच असते. उत्तर-दक्षिणेकडील नाश्त्याच्या पदार्थानी महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत केलेला शिरकाव रोखण्याची ताकद असलेली मिसळ न चाखलेला माणूस महाराष्ट्रात आढळणार नाही हे खरे असले तरी अजूनही पंचतारांकित खाद्यपरंपरेने मात्र मिसळीला दोन हात दूरच ठेवले आहे,’ याबद्दल खंत व्यक्त करताना ही प्रतिष्ठा मिसळीला लवकर मिळावी, अशी इच्छा तिने व्यक्त केली.

लहानपणी नाशिकला सणावाराच्या निमित्ताने मिळणाऱ्या खाद्यपदार्थावर ताव मारायला मी आवर्जून जायचे, असं ती सांगते. ‘आमच्या नाशिकमध्ये बुधा हलवाईकडे मिळणारी गुळाची जिलेबी जगात भारी आहे. ही जिलेबी आता नाशिकमध्ये अनेक ठिकाणी मिळते, पण तेव्हा त्याच्याकडे जाऊन लाकडी बाकडय़ावर बसून गुळाची जिलेबी खायला मी आवर्जून जायचे. त्याचबरोबर महाशिवरात्रीला बटाटय़ाची जिलेबी मिळायची. तीही फस्त करायला मी जायचे. सायनताऱ्याचा साबुदाणा वडा उपवासाच्या दिवशी जाऊन खायचाच हे पक्कं होतं. नाशिक शहराच्या मधोमध गोदावरी नदी वाहते. ज्याला आम्ही गंगा म्हणतो. त्या गंगेवर जाऊन भेळभत्ता खायला लहानपणी आईबाबा घेऊन जायचे. गंगा हाच आमचा मॉल आणि तिथे लागणाऱ्या खाण्याच्या गाडय़ा हाच आमचा फूड कोर्ट बरं का! लहानपणी धुळवडीच्या दिवशी जत्रा भरायची. नाशिक, डहाणू, पालघर भागांत या दिवशी बोहाडा असतो. म्हणजे घरातले वीरदेव मोठय़ा प्रमाणात एकत्र येऊन नाचवले जातात. त्या गंगेच्या किनारी बसून भेळभत्ता खात ती जत्रा पाहणं, वीराचं नाचणं डोळय़ात साठवणं अशा असंख्य आठवणी आहेत ज्या नदीशी जोडल्या गेल्या आहेत. रोज बघतो ती नदी आणि त्या दिवशी बघतो ती नदी यात फरक असायचा. कोंडाजी, मकाजी, माधवजी यांचे चिवडे तेव्हा गंगेवर हातगाडीवर मिळायचे ते खायला आम्ही जायचो. कालिका मातेच्या नवरात्रोत्सवासाठी खाऊचे ठेले लागायचे तिथे जाऊन खाबूगिरी करायचो. आता स्वत:कडे पैसे आल्यावर हे खाणंपिणं केव्हाही, कुठेही सहज मिळू लागलं आहे; पण लहानपणी तेव्हा ते विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट वेळेपुरतंच मर्यादित होतं. त्यामुळे त्याची किंमत व ओढ अधिक होती,’ असं तिने सांगितलं. 

पुण्यात ललित कला केंद्रात मास्टर करत असतानाची खाबूगिरी अनिताच्या खाण्याविषयीच्या संकल्पनांची चौकट मोडणारी होती. दर रविवारी कँटीनला सुट्टी असायची. तेव्हा माझ्या आयुष्यात चायनीज आलं, असं सांगणाऱ्या अनिताने त्याआधी मनापासून चायनीज खाल्लंच नव्हतं. ‘ललित कलाकेंद्रात असताना घरापासून लांब असल्यामुळे खाण्याची चॉइस होती. मला सतत एक चव जिभेवर टिकवायची नव्हती. त्यामुळे मी वेगवेगळय़ा ठिकाणांहून डबे मागवून खायचे. त्यामुळे मला संपूर्ण महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती कळली. एकच भाजी वेगवेगळय़ा पद्धतीने कशी बनवतात याचं ज्ञान आयतं खाऊन का होईना झालं. दर रविवारी संध्याकाळी डब्याला सुट्टी असल्यामुळे आम्ही बाहेर खायला जायचो. तेव्हा माझ्या आयुष्यात चायनीज आलं. माझं खाणं कमी असल्यामुळे आणि पैसे वाचायचे असल्यामुळे वन बाय टू चायनीज खायचो. ट्रिपल शेजवान राइस, अमेरिकन चॉप्सीसारखे पदार्थ मला आवडायचे नाहीत, तरीसुद्धा मित्रांच्या आग्रहास्तव व नाइलाजाने खायचे. पंजाबी पदार्थही मला खायला आवडत नाहीत. रोटी, नानचे लचके मी आधी खूप तोडलेत. आता ते मला आवडत नाही,’ असं ती म्हणाली.

अनिताचं खाण्याबरोबरच भांडय़ांवर अधिक प्रेम आहे. ‘नाशिकमधल्या भांडी बाजारातली आकर्षक भांडी लहानपणी बघत असताना माझ्या संसारात मला सगळी मराठमोळी तसेच फॅन्सी भांडी हवीत, हे माझं स्वप्न होतं. माझ्या घरी वेगवेगळय़ा प्रकारचे चमचे, डाव, कढया, क्रोकरी सेट आहेत. भाजी ढवळायला भातवाडी वापरलेली मला आवडत नाही. चमचा म्हटल्यावर डाव दिलेलाही मला खपत नाही. ज्या कार्यासाठी त्या भांडय़ाला घडवलं आहे त्याच कार्यासाठी मला त्याचा वापर करायला आवडतो. मला विळीवर भाजी चिरायला आवडतं. दगडी भांडय़ात वरण शिजवायला आवडतं.लग्न झालेल्या प्रत्येक गृहिणीचं मन स्वयंपाकघरातल्या भांडय़ांमध्ये असतं तेच माझंही आहे,’ असं ती त्याच प्रेमाने सांगते. 

अनिताच्या दृष्टीने खाणं म्हणजे एकत्र बसून आनंद घेत केलेली प्रक्रिया आहे. थोडं खावं, सात्त्विक, पौष्टिक खावं. ते कायम फॅन्सीच असावं असा हट्ट माझा नाही. पोटभरीसाठी खावं. सोबतीने केलेली ही प्रक्रिया मला अधिक आनंद देते, असं ती आग्रहाने सांगते.

viva@expressindia.com