वेदवती चिपळूणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सुशांत सिंग राजपूत, आदित्य रॉय कपूर, रेमो डिसूझा या बॉलीवूड सेलेब्रिटींच्या फिटनेस आणि बॉडी बिल्डिंगकडे कायमच सगळ्याच फॅन्सचं लक्ष लागून राहिलेलं असतं. त्यांनी नवीन काही करायला सुरुवात केली आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर झळकले की लगेच त्यांचे फॅन्स त्यांना फॉलो करायला सुरुवात करतात. ‘एम.एस.धोनी’ या चित्रपटासाठी सुशांत सिंग राजपूतने आणि ‘एबीसीडी २’साठी श्रद्धा कपूरने घेतलेलं फिटनेस ट्रेनिंग या दोन्हीचं फॅन्सनी चांगलंच कौतुक केलं होतं. त्यांच्या या बदलामागचा करविता, अर्थात तब्बल १५ वर्षांचा फिटनेस ट्रेनिंगचा अनुभव असलेला, प्रवीण नायर! त्याचं हे स्वप्न त्याने पत्नी महक नायरच्या सोबतीने पूर्ण केलं आहे.

शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनीयर असणारा प्रवीण नायर आपल्या प्रवासाबद्दल म्हणतो, ‘एका साध्या सामान्य कुटुंबात केरळमध्ये माझा जन्म झाला. शाळा, कॉलेज वगैरे तिथलंच. मात्र स्पोर्ट्स आणि अ‍ॅथलेटिक्स याबद्दल माझं कुटुंब माझ्या लहानपणापासूनच जागरूक होतं. मला क्रीडास्पर्धा, खेळ यांसाठी कायम प्रोत्साहनच दिलं गेलं. कधीच कोणाचा माझ्या खेळण्याला विरोध आणि फक्त अभ्यासाला महत्त्व वगैरे अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे आपोआपच माझ्याभोवती तसं वातावरण निर्माण झालेलं होतं. मात्र केरळमध्ये असताना जिमला जाणं वगैरे एवढं वेड नव्हतं, कारण त्याची तशी सवयच नव्हती. मी इंजिनीयरिंग केलं खरं, मात्र खेळणं, व्यायाम करणं या गोष्टी कायमच मला अधिक आकर्षित करत होत्या. त्यामुळे जे आपल्याला मनापासून आवडतंय तेच आयुष्यभर करावं असा स्वाभाविक निर्णय मी घेतला’.

इंजिनीयर झालेल्या प्रवीणने इंजिनीयरिंगकडे न वळता वेगळ्याच वाटेने जायचं ठरवलं. तेव्हा त्याच्या या निर्णयाचा घरच्यांनी आदर केला. त्याबद्दल बोलताना प्रवीणने सांगितलं, ‘घरच्यांना माझी खेळाची आणि व्यायामाची आवड माहिती होती. माझ्या निर्णयाला त्यांनी विरोध केला नाही. मात्र त्यांना काही शंका होत्या. फिटनेस ट्रेनिंगमध्ये मी जेवढा वेळ देणार, जेवढे कष्ट घेणार, जेवढे पैसे गुंतवणार तेवढय़ा प्रमाणात त्याचे रिटर्न्‍स मिळतील का, याची त्यांना खात्री नव्हती. आयुष्यभर हेच करणार तर त्यातून सगळ्या गरजा भागवण्याइतकं उत्पन्न मिळू शकतं का असा प्रश्न त्यांच्या मनात होता’. इंजिनीयरिंगसारखं फिटनेस ट्रेनिंगच्या मानाने, स्टेबल आणि खात्रीशीर प्रोफेशन सोडून या वाटेला जायचा माझा निर्णय चुकत तर नाही ना, हीसुद्धा शंका त्यांच्या मनात होती. मी ट्रेनर म्हणून काम करायला सुरुवात केली. साधारणत: दोन वर्षांतल्या माझ्या कामाने त्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवून दिली आणि आपल्या मुलाचा निर्णय चुकला नाही याची त्यांना खात्री पटली, असं प्रवीण म्हणतो.

फिटनेसमध्ये त्याचं खरोखर मन रमायला लागलं. एकएक करत त्याने यशाची शिखरं सर करायला सुरुवात केली. एका जिममध्ये ट्रेनर म्हणून असतानाच त्याची त्याच्या पत्नीशी भेट झाली. दोघांनी मिळून स्वत:चं ट्रेनिंग सेंटर सुरू केलं. आपलं ट्रेनिंग सेंटर कसं असावं याबद्दल त्याच्या काही कल्पना होत्या आणि त्याबद्दल प्रवीण म्हणाला, ‘माझं ट्रेनिंग सेंटर असं असलं पाहिजे जी फक्त जिम नसेल. फिटनेस म्हणजे केवळ जिम किंवा व्यायाम नव्हे, तर फिटनेस ही एक लाईफस्टाइल आहे. त्यामुळे त्याबद्दल संपूर्ण काळजी घेणारं असं माझं फिटनेस सेंटर असलं पाहिजे. तिथे सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देता आलं पाहिजे. फिटनेससाठी आवश्यक न्यूट्रिशनबद्दल मार्गदर्शन करता आलं पाहिजे. ही जागा अशी असली पाहिजे, जिथे येऊ न लोकांना आपल्या बॉडीचा कॉम्प्लेक्स येता कामा नये; उलट स्वत:बद्दल छान वाटलं पाहिजे, पॉझिटिव्ह वाटलं पाहिजे. आपण फिट राहू शकतो याबद्दल खात्री वाटली पाहिजे आणि फिटनेसची गरजही समजली पाहिजे. त्यासाठीची लाईफस्टाइल अंगवळणी पडली पाहिजे. या सगळ्यासाठी कायमचं गाईडन्स सेंटर या दृष्टीने फिटनेस सेंटरची उभारणी करण्यात आली आहे’.

सध्या प्रवीण ‘क्रॉसफिट ट्रेनर लेव्हल २’चा सर्टिफिकेट होल्डर आहे. ‘अमेरिकन काऊन्सिल ऑफ स्पोर्ट्स अँड मेडिसिन’ यांनी आंतरराष्ट्रीय लेव्हलवर मान्यता दिलेला प्रवीण ऑलिम्पिकसाठी वेट लिफ्टिंगचं ट्रेनिंग द्यायलाही प्रमाणित आहे. बॉडी ट्रान्सफॉर्मेशन ही त्याची खासियत आहे. अनेक बॉलीवूड सेलेब्रिटींचा फिटनेस फंडा म्हणजे प्रवीण नायर. त्याच्या इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे वागणं म्हणजे फिटनेसपर्यंत पोहोचणं हे जणू समीकरणच! स्वत:च्या फिटनेस सेंटर्सपासून ते सेलेब्रिटींच्या गळ्यातला ताईत बनण्यापर्यंतचा प्रवास बघताना प्रवीण म्हणतो, ‘मला माझ्या निर्णयाचा कधीच पश्चात्ताप नव्हता. अगदी सुरुवातीला जेव्हा मी स्वत:च शिकत होतो तेव्हाही मला निर्णय चुकला का अशी शंकाही कधी आली नाही. इंजिनीयर होऊ न मी पुढे काही करूच शकलो नसतो. माझ्यासाठी फिटनेस, जिम, व्यायाम, अ‍ॅथलेटिक्स हेच सर्वस्व होतं आणि मला तेच येत होतं. मी आत्ता जे करतोय तेवढं चांगलं करियर मी दुसऱ्या कोणत्याच क्षेत्रात घडवू शकलो नसतो. इतक्या सेलेब्रिटींनी माझ्याकडून ट्रेनिंग घेतलं आहे आणि अजूनही ते मी त्यांना ट्रेन करतो आहे. आता तर मी थेट नसलो तरी अप्रत्यक्षपणे ‘सोनी बीबीसी अर्थ’च्या ‘हेल्दी बिंज’ या शोसाठीही काम करतो आहे. अशा वेगवेगळ्या संधी माझ्याकडे कायमच येत राहिल्याने मागे वळून बघताना मला कधीच ‘दुसरं काही केलं असतं तर..’ हा प्रश्नच पडत नाही, असं तो सांगतो. माझ्या या प्रोफेशनमध्येसुद्धा आर्थिकदृष्टय़ा मी अगदी व्यवस्थित स्थिर आहे आणि पाय घट्ट रोवून उभा आहे. त्यामुळे मी फिटनेसमध्ये काही केलं नसतं तर मी कशातच काही इतकं चांगलं केलं नसतं, असं त्याने सांगितलं. एकदा मार्ग स्वीकारल्यानंतर त्याची घालमेल कधीच झाली नाही. त्याच्यासाठी या क्षेत्रात येण्याचा क्षणच निर्णायक होता, असं त्याने स्पष्ट केलं.

एक निर्णय आणि स्वत:चं आयुष्य एका वेगळ्याच वळणाने घेऊ न जाणारा मार्ग! त्या निर्णायक क्षणी आपण शिक्षण घेतलेलं क्षेत्र आणि आपण निवडतोय ते क्षेत्र यातला फरक त्याच्या समोर होता. मात्र भविष्यात आपल्याला मिळू शकणारे रिझल्ट्स, स्थैर्य अशा कोणत्याही गोष्टींचा विचार न करता, घरच्यांच्या पाठिंब्याने त्याने आपल्या आवडत्या क्षेत्रात पाऊ ल ठेवलं, तोच क्षण आपल्यासाठी महत्त्वाचा होता, असं तो म्हणतो. एकदा तो मार्ग स्वीकारल्यावर मात्र स्वत:वर विश्वास ठेवून, शब्दश: अंगमेहनत करत त्याने सगळ्यांच्या सगळ्या शंकांचं समाधानकारक निरसन केलं. फिटनेसच्या क्षेत्रात स्वत:ला फिट ठेवणं ही मूलभूत गरजही त्याने सांभाळली. त्याच्या मते तुम्हाला ज्या क्षेत्रात पुढे जावंसं वाटतंय ते एकदा निश्चित केलं की त्यात पूर्ण ध्येयाने झपाटून उतरलं पाहिजे. मग तुमचा निर्णय तुम्हाला कधीही त्रासदायक ठरणार नाही. फिटनेसला लाईफस्टाइल म्हणून बघणारा प्रवीण ३६५ दिवस स्वत:च्या फिटनेससाठी मेहनत घेत असतो. इतरांच्या फिटनेससाठी नवनवीन गोष्टी तो अजूनही शिकत असतो. इतरांना शरीराने खंबीर बनवणारा प्रवीण स्वत: ताठ कण्याने उभा राहिला आहे आणि अनेकांसाठी प्रेरणा ठरतो आहे.

ज्या क्षेत्रात पुढे जावंसं वाटतंय ते एकदा निश्चित केलं की त्यात पूर्ण ध्येयाने झपाटून उतरलं पाहिजे. मग तुमचा निर्णय तुम्हाला कधीही त्रासदायक ठरणार नाही.

– प्रवीण नायर

viva@expressindia.com