तेजश्री गायकवाड viva@expressindia.com

परदेशातील एखाद्या सुदूर गावातलं मूळ घेऊन जन्माला आलेला ब्रॅण्ड कोण्या एका भलत्याच देशाची ओळख व्हावा, अशी किमया काही नामांकित फॅशन ब्रॅण्ड्सच्या बाबतीत घडलेली आहे. त्यातली गंमत अशी की मूळ परदेशी छाप सोडून कित्येक वर्ष भारतीय फॅशन बाजारात आपले पाय रोवून उभे असणारे असे ब्रॅण्ड्स आताही भारतीय आहेत, यावर चटकन कोणाचा विश्वास बसत नाही. ‘अ‍ॅलन सोली’ हा अशा ब्रॅण्ड्सपैकी एक ज्याचं नाव ऐकलं की तो विदेशी ब्रॅण्ड असल्यासारखं वाटतं. अनेक ग्राहकांना अजूनही या ब्रॅण्डच्या नावामुळे तो  विदेशी आहे असंच वाटतं, परंतु ‘अ‍ॅलन सोली’ हा भारतीय ब्रॅण्ड आहे.

Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
savita malpekar marathi actress talks about groupism
“त्याने मराठी इंडस्ट्रीत सर्वात पहिली गटबाजी सुरू केली”, सविता मालपेकरांनी थेट सांगितलं नाव; म्हणाल्या, “मला काय देणंघेणं…”
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
Maharashtrachi Hasyajatra Fame Actress
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का?
premachi goshta yash pradhan exit from the serial
‘प्रेमाची गोष्ट’मधून लोकप्रिय अभिनेत्याची एक्झिट! आता हर्षवर्धनच्या भूमिकेत झळकणार ‘हा’ कलाकार, मालिकेत आहे मोठा ट्विस्ट
Eknath Shinde bag checking
CM Eknath Shinde : “बॅगेत फक्त कपडे, युरिन पॉट…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याही सामानांची तपासणी!

‘अ‍ॅलन सोली’सारख्या ब्रॅण्डची कूळकथा शोधत गेलं की त्यांची अमुक एक पद्धतीची ओळख का आणि कशी घडली असेल? यातल्या गमतीजमती उलगडत जातात. या ब्रॅण्डचे नाव, त्याचा लोगो याची मूळ संकल्पना परदेशी असली तरी भारतीय ब्रॅण्ड म्हणून वाटचाल करताना त्याच्या मूळ रूपाला धक्का न लावता बदल केले गेले. ‘विल्यम हॉलिन अ‍ॅण्ड कंपनी लिमिटेड’ या यूकेमधील नॉटिंगहॅम शहरातील कंपनीने १७४४ साली स्थापन केलेला ब्रॅण्ड ‘अ‍ॅलन सोली’. हा ब्रॅण्ड सुरुवातीपासूनच कायम तरुणाईला आकर्षित करणारा म्हणून ओळखला गेला. दोन िशगे असलेल्या काळविटाचा चेहरा हा या ब्रॅण्डचा प्रसिद्ध लोगो. कधी काळी क्लब, पबमधून पार्टी करत आयुष्य मौजेत घालवणाऱ्या तरुणांचा स्वॅग मिरवणारा म्हणून या ब्रॅण्डच्या लोगोसाठी काळविटाचा चेहरा रेखांकित करण्यात आला. अगदी सुरुवातीच्या काळात केवळ तरुणांच्या फॉर्मल वेअरसाठी प्रसिद्ध असलेल्या या ब्रॅण्डला इतरांना आपल्या ब्रॅण्डपर्यंत आणण्यासाठी कलेक्शनमध्ये अनेक बदल करावे लागले.

‘अ‍ॅलन सोली’ हा कपडय़ांचा ब्रॅण्ड आता ‘आदित्य बिर्ला ग्रुप’अंतर्गत येतो. नव्वदच्या दशकात विल्यम हॉलिन कंपनीचा हा ब्रॅण्ड ‘मदुरा गारमेंट्स’ने विकत घेतला. ‘मदुरा गारमेंट्स’ हा मदुरा कोट्सचा एक भाग होता आणि धाग्यांचा मोठा उत्पादकही होता. २००१ मध्ये आदित्य बिर्ला ग्रुपने हा ब्रॅण्ड घेतला, तेव्हा त्याच्या मूळ लोगोपासून अनेक गोष्टींमध्ये बदल करण्यात आले. अगदी सुरुवातीच्या काळात कंपनी आणि नॉटिंगहॅम शहराचे नाव मिरवणारा एक साधा लोगो होता. त्याला तरुणाईशी जोडताना लोगोपासून कलेक्शनपर्यंत अनेक बदल आदित्य बिर्ला ग्रुपने केले. भारतीयांच्या फॉर्मल कपडय़ांच्या स्टाईलला या ब्रॅण्डने वेगळीच टेस्ट दिली. भारतीय बाजारपेठेत सेमी फॉर्मल कपडे आणण्याचं श्रेय काही अंशी ‘अ‍ॅलन सोली’ या ब्रॅण्डला जातं. ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी फॉर्मल लूक ठेवून आपण फॅशन करू शकतो हे या ब्रॅण्डने दाखवून दिलं. गेल्या काही वर्षांत या ब्रॅण्डने झपाटय़ाने प्रगती केली आहे, भारतातील सर्वात वेगवान पद्धतीने आपला व्यवसाय वाढवणाऱ्या ब्रॅण्डपैकी हा एक बनला आहे.

‘अ‍ॅलन सोली’ने अत्यंत स्पर्धात्मक रेडीमेड कपडय़ांच्या मार्केटमध्ये अल्पावधीतच आपले स्थान बनवले. सुरुवातीला ‘अ‍ॅलन सोली’ने ‘फ्रायडे ड्रेसिंग’ ही हिट कल्पना बाजारात आणली. रंगीत शर्ट आणि खाकी रंगाची ट्राऊझर हे कलेक्शन त्यांनी लाँच केलं जे अल्पावधीतच हिट झालं. ‘माय वल्र्ड, माय वे’ ही त्यांची टॅगलाइन आजही सुपरहिट आहे. सुरुवातीला फक्त मेन्स वेअरवर काम करणाऱ्या या ब्रॅण्डने २००२ मध्ये फॉर्मल वूमेन्स वेअरच्या मार्केटमध्ये एन्ट्री घेतली. महिलांसाठी फॉर्मल वेअर बनणारा पहिला भारतीय ब्रॅण्ड म्हणून आपली ओळख निर्माण केली. २०१३ मध्ये अजून ब्रॅण्डचा विस्तार करत त्यांनी किड्स वेअरही सुरू केलं. ‘अ‍ॅलन सोली ज्युनियर’ या नावाच्या कलेक्शनअंतर्गत त्यांनी लहान मुला-मुलींसाठी कपडे बाजारात आणले. फॉर्मल वेअरपुरतंच मर्यादित न राहता कंपनीने ‘सोली जीन्स’ ही कंपनी २०१४ मध्ये लाँच केली. पुरुषांच्या कपडय़ांव्यतिरिक्त, ‘अ‍ॅलन सोली’ हा ब्रॅण्ड त्यांच्या वेस्टर्न वेअरसाठीही तितकाच प्रसिद्ध आहे. आजच्या कॉर्पोरेट विश्वात काम करणाऱ्या तरुणाईमध्ये त्यांचे हे कपडे लोकप्रिय आहेत.

अल्पावधीतच ‘अ‍ॅलन सोली’ने भारतातील एक आघाडीचा फॅशन ब्रॅण्ड म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. याचं मोठं कारण म्हणजे त्यांचं उत्कृष्ट मार्केटिंग आणि प्रमोशनल स्ट्रॅटेजी. आजच्या तरुणाईला कसं टार्गेट करायचं आणि आपल्या ब्रॅण्डची ओळख कशी करून द्यायची हे त्यांना बरोबर उमगलं. ‘अ‍ॅलन सोली’ने पिंट्र मीडियासह आपलं डिजिटल मीडियामध्येही वेगळं स्थान निर्माण केलं. हा ब्रॅण्ड अगदी प्रत्येक सोशल मीडियावर आहे. त्यांच्या या अकाऊंटवर त्यांचे हजारो फॉलोअर्स आहेत. हा ब्रॅण्ड प्रसिद्ध असण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यांचं अनोखं वितरण मॉडेल. ‘अ‍ॅलन सोली’ची उत्पादने तुम्हाला मोठमोठय़ा मॉलमध्येही दिसतील आणि रिटेल स्टोअरमध्येही दिसतील. संपूर्ण भारतात त्यांचे २०७ स्टोअर्स आहेत आणि ही संख्या अजूनही वाढते आहे. एक ब्रॅण्ड म्हणून त्याचं मूळ परदेशी रूपडं, स्टोअरसाठी खास रंगवली जाणारी विटांसारखी रचना असलेली लाल रंगाची भिंत आणि त्या भिंतीवर लावण्यात येणारा काळविटाचा मुखवटा ही रचना देशभरातील कुठल्याही ‘अ‍ॅलन सोली’च्या स्टोअरमध्ये जपली जाते. ब्रॅण्डचा मूळ विदेशी आब कायम राखत भारतीयांची मानसिकता आणि आवडीनुसार कलेक्शन्स विकसित करण्याचा त्यांचा यशस्वी फंडा आज या ब्रॅण्डला टॉप ब्रॅण्ड म्हणून लोकप्रियता मिळवून देण्यात कमालीचा यशस्वी ठरला आहे.