प्युअर व्हेजच्या पथावर चालणाऱ्या फूडी आत्म्याला जेव्हा कट्टर नॉनव्हेजिटेरियन फूडी आत्मा, ‘तू नॉनव्हेज खातोस का?’ असा प्रश्न विचारतो तेव्हा तो व्हेजिटेरियन आत्मा त्याला ‘छे छे! मी फक्त अंडं खातो’ असं उत्तर देतो. अंड शाकाहारी की मांसाहारी हा जरी वादाचा मुद्दा असला तरी आज असंख्य शाकाहारी तरुणाई प्रोटिन्ससाठी अंडय़ाकडे वळलेली दिसते. यातूनच आता ‘एगिटेरियन’ (म्हणजे प्युर एग लव्हर) हा नवा पंथ उदयास आला आहे. या पंथातील लोक चिकन, मटण, मासे आदी मांसाहारी पदार्थ न खाता केवळ अंडेच चवीने खातात. अशाच कट्टर एगिटेरियन पंथीयांसाठी सेलिब्रिटी शेफ अमृता रायचंद यांनी अंडय़ाच्या झटपट व चमचमीत पाककृती येत्या नाताळ सणाच्या निमित्ताने दिल्या आहेत..
बेक्ड ओटमील
साहित्य : १ कप ओटचे पीठ, ग्रीसिंगसाठी बटर, ८ अंडी, ८ चमचे साखर, ४ चमचे व्हॅनिला इसेन्स, १ लहान चमचा बेकिंग पावडर, १ कप चिरलेला सुकामेवा, ४ चमचे वाळवलेल्या ब्लूबेरी, २ लहान सफरचंद, वरून सजवण्यासाठी (टॉपिंगसाठी) क्रीम चीज
कृती : ओव्हन १८० डिग्री सेल्सिअसपर्यंत गरम करा. ओव्हनप्रूफ बेकिंगच्या भांडय़ाला बटरचे ग्रीसिंग करा. एका भांडय़ात दोन अंडी फोडून मिक्स करा. त्यात २ चमचे साखर, एक लहान चमचा व्हॅनिला इसेन्स, चार चमचे ओटचे पीठ (ओटमील) टाकून चांगले एकजीव करा. तयार मिश्रणात पाव चमचा बेकिंग पावडर, अर्धा कप सुकामेवा, एक चमचा वाळलेल्या ब्लूबेरी, चिरलेली दोन सफरचंदे टाकून मिश्रण एकजीव करा. हे ओटचे मिश्रण बटरने वंगण दिलेल्या ओव्हनप्रूफ बेकिंगच्या भांडय़ात टाका. हे भांडे अगोदरपासून गरम केलेल्या ओव्हनमध्ये ठेवा आणि ७-८ मिनिटांसाठी प्रीहीटेड ओव्हनमध्ये बेक करा. क्रीम चीजने सजवा आणि सव्र्ह करा बेक्ड ओटमील.
ओट्स विथ सॉफ्ट एग
साहित्य : दूध २ कप, पाणी २ कप, साखर १ चमचा, ओट्स १ कप, मीठ अर्धा चमचा, अंडी २, मध एक लहान चमचा, चिरलेले बदाम १ चमचा, मनुका, काळ्या मनुका, टूटी फ्रूटी
कृती : एका पॅनमध्ये दूध, पाणी, साखर, ओट्स आणि मीठ घालून पाच मिनिटे शिजवावे. त्यानंतर एक उकडून कापलेले अंडे, मध, चिरलेले बदाम, मनुका, काळ्या मनुका, टूटी फ्रूटी घालून मिश्रण एकजीव करा. सवर्ि्हग बाऊलमध्ये तयार ओट्स घेऊन गरमागरम सव्र्ह करा ओट्स विथ सॉफ्ट एग.
ब्रेड अंडे पुडिंग
साहित्य : ब्रेड स्लाइस ९, अंडी ३, कोमट दूध ३ कप, पिठीसाखर ३ चमचे, क्रीम २ चमचे, बटर २ चमचे, व्हॅनिला इसेन्स १ लहान चमचा, कस्टर्ड पावडर १ चमचा
कृती : ब्रेडच्या कडा कापा आणि ब्रेडचा चुरा करून एका बाऊलमध्ये एकत्र करा. ब्रेडच्या चुऱ्यात कोमट दूध, पिठीसाखर, क्रीम, बटर, व्हॅनिला इसेन्स कस्टर्ड पावडर घालून एकजीव करा. अंडय़ाचे बलक (पिवळा भाग) पांढऱ्या भागापासून वेगळा करा आणि पिवळा बलक तयार मिश्रणात घाला. सगळ्यात शेवटी सुकामेवा बारीक कापून मिक्स करा. एक बेकिंग डिश घ्या, बटरने त्याला ग्रीस करा. बेकिंग डिशमध्ये तयार मिश्रण घेऊन १८० डिग्री सेल्सिअसवर ओव्हनमध्ये डिश २० मिनिटे ठेवा.
एग हॉटडॉग
साहित्य : हॉटडॉग बन्स ४, अंडी ४, एक बारीक चिरलेली लाल सिमला मिरची, एक बारीक चिरलेली हिरवी सिमला मिरची, एक बारीक चिरलेला कांदा, १ चमचा चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, चवीनुसार काळी मिरी पावडर, ४ चमचे + पाव कप ऑलिव्ह ऑइल मेयोनीज
कृती : ओव्हन १८० डिग्री सेल्सियसपर्यंत गरम करा. प्रत्येक हॉटडॉग बन मधून कापा. एका बाऊ लमध्ये फोडलेलं अंडं, हिरव्या आणि लाल सिमला मिरच्या, कांदा, कोथिंबीर, मीठ आणि काळी मिरी पूड घालून मिश्रण एकजीव करा. त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑइल मेयोनीज घालून ते मिश्रण प्रत्येक हॉटडॉगमध्ये भरून ते बेकिंग ट्रेवर ठेवा. बेकिंग ट्रेला प्री हीटओव्हनमध्ये १५ ते २० मिनिटांपर्यंत बेक करा.
स्टफ फ्रेंच टोस्ट
साहित्य : ब्रेड ४, केळे १, १ कप दूध, अंडे १, मध १ चमचा, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स, मीठ, चवीनुसार चॉकलेट स्प्रेड, शेंगदाण्याचं बटर, रेग्युलर बटर.
कृती : एक मोठय़ा बाऊलमध्ये दूध घालावे, त्यात अंडी, मध, व्हॅनिला इसेन्स घाला आणि ते मिश्रण थोडा वेळ एकजीव करा. एका बाजूला ब्रेडचे काठ कापून टाका. पीनट बटर आणि चॉकलेट स्प्रेड ब्रेड स्लाइड्सवर पसरवा आणि केळ्याच्या स्लाइस आत टाकून सॅन्डविच बनवा. तव्यावर बटर गरम करा. सँडविच दुधाच्या आणि अंडय़ाचा मिश्रणात बुडवा आणि बटरमध्ये ते मिश्रण सोनेरी तपकिरी होईपर्यंत फ्राय करा. सॅन्डविच कापून त्यावर वरून चॉकलेट टाकून सव्र्ह करा स्टफ फ्रेंच टोस्ट.
संकलन : मितेश जोशी
viva@expressindia.com