ती आर्थिक बाबींबद्दल बोलते, आर्थिक सल्ले देते आणि तरुणाईला प्रेरणा देते. तिचं नाव हाच तिचा ब्रँड आहे. आर्थिक साक्षरतेसाठी काम करणारी अनुष्का राठोड आज यंग आयकॉन बनली आहे.

भारताच्या आर्थिक विकासाच्या वेगात, अर्थव्यवस्थेला आकार देण्यात महिलांची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, आजही भारतीय समाजातील महिलांसाठी आर्थिक साक्षरता हे एक महत्त्वाचे आव्हान आहे. भारतातील अनेक स्त्रिया लक्ष घालून स्वत:चं आर्थिक व्यवस्थापन करत नाहीत, निर्णय घेण्यासाठी आणि सल्ल्यासाठी इतर कोणावर तरी कुटुंबातील सदस्यांवर अवलंबून असतात. वाढती आर्थिक गुंतागुंत लक्षात घेता, भारतातील महिलांना वित्तविषयक मूलभूत गोष्टी समजून घेणे आणि त्यांच्या आर्थिक सुस्थितीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Ulhas bapat modi cji meeting
PM Modi : “पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणं मोठी चूक”, घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी सांगितले नियम
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Loksatta editorial on Gau rakshak killed Brahmin boy Aryan Mishra in Faridabad
अग्रलेख: वाद आणि दहशत
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
loksatta editorial on tax on medical insurance premium issued in gst council meeting
अग्रलेख: आणखी एक माघार…?
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?

या सगळ्यात ‘ती’ वेगळी ठरते. ती आर्थिक बाबींबद्दल बोलते, आर्थिक सल्ले देते आणि तरुणाईला प्रेरणा देते. तिच्या इन्स्टाग्राम रील्समुळे ती थोडक्या काळात खूप प्रसिद्ध झाली. फायनान्ससारख्या विषयात काम करणाऱ्या तिने लॉकडाऊनमध्ये तरुणाईचं लक्ष वेधून घेतलं. तिचं नाव हाच तिचा ब्रँड आहे. ती आहे अनुष्का राठोड. आर्थिक साक्षरतेसाठी काम करणारी अनुष्का यंग आयकॉन बनली आहे.

सुरतमध्ये लहानाची मोठी झालेली अनुष्का राठोड कॉमर्स बॅकग्राऊंडची आहे. ती सीएफए लेव्हल २ ची कॅन्डिडेट आहे. लॉकडाऊनमध्ये तिने नोकरीच्या ऐवजी सोशल मीडियाचा वापर सुरू केला. ३० सेकंदाच्या रील्समधून ती आर्थिक साक्षरता अर्थात फायनान्शियल लिटरसीबद्दल बोलते. फायनॅन्शियल प्लॅनिंगबद्दल ती छोट्या छोट्या मुद्द्यांची मांडणी करत आणि इंटरेस्टिंग ग्राफिक्समधून माहिती देते. तरुणाईला रुचेल अशा पद्धतीने आर्थिक गोष्टी सांगण्याचं कौशल्य तिने आत्मसात केलेलं आहे. लहान लहान पण अवघड आणि महत्त्वाच्या बाबींची माहिती ती एकदम सोपी करून सांगते. अॅमेझॉन, क्रेड, अपग्रॅड यांसारख्या फायनान्स आणि एज्युकेशनमधल्या नामांकित कंपन्यांबरोबर तिचे टाय-अप आणि कोलॅबोरेशन्स आहेत. कन्टेन्ट क्रिएटर होण्याआधी ती एक इन्व्हेस्टमेंट बँकर होती. त्यामुळे या विषयातील अनुभवांच्या आधारे गुंतवणूक करताना आणि केल्यानंतरच्या काळात पेशन्स अर्थात संयम कसा ठेवायचा याबद्दल ती आवर्जून बोलते.

हेही वाचा >>> नावीन्यपूर्ण परंपरा

अनुष्का तिच्या कुटुंब आणि करिअरबद्दल सांगते, ‘एका मारवाडी व्यावसायिक कुटुंबात वाढलेली असल्याने, रोजच्या गप्पांमधला विषय हा आर्थिक गुंतवणूक या संदर्भातच असायचा. माझे काका आणि आजोबा नेहमी नवीन व्यावसायिक प्रकल्पांवर चर्चा करत असत. ते कसे वाढवणार आहेत, भांडवल म्हणजे काय, इत्यादी. त्यामुळे या सर्व संभाषणांनी मला पैशाची आणि पैशाच्या मूलभूत संकल्पनांची ओळख आपोआप होत गेली’. अर्थात व्यापारी असले म्हणजे फक्त फायदाच फायदा असतो, हा गैरसमजही तिने खोडून काढला. ‘आम्ही व्यापारी कुटुंबात वाढलो असल्याने उत्पन्न कधीच स्थिर नव्हतं. काही महिने चांगले असतील, परंतु काही महिने खूप अडचणीचे असू शकतात. अशा पद्धतीने मार्केट कायम खालीवर होत असतं. म्हणून आम्ही नेहमीच बजेटमध्ये जगायला शिकलो’, असं ती सांगते. आर्थिक साक्षरतेबद्दल घरातच मिळालेलं हे बाळकडू घेऊनच अनुष्काने फायनान्ससारख्या विषयाचा अभ्यास सुरू केला. तिने लवकरच पैशांच्या व्यवहारात लक्ष घालायला सुरुवात केली. आर्थिक व्यवहार समजून घेऊन त्याबद्दल अभ्यास करायला लागली. शिक्षणही कॉमर्समध्ये घेऊन तिने पुढे आर्थिक बाजूच निवडली.

अनुष्का तिच्याकडे त्या वेळी उपलब्ध असलेल्या करिअर ऑप्शनबद्दल बोलतानाच आर्थिक बाबींमध्ये एकूण महिलांचा सहभाग कसा असतो याबद्दलही आपलं निरीक्षण नोंदवते. ‘स्त्री म्हणून आपण स्वत:वर खूप शंका घेतो. आपण आपल्या कठोर परिश्रमाला आणि बुद्धिमत्तेला श्रेय देत नाही. त्यामुळे आपणच आपल्याला अजून कमकुवत बनवत जातो. माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवणं आणि वाढीसाठी अधिक जोखीम पत्करणं हे माझ्यासाठी सर्वात मोठं आव्हान होतं’, असा वैयक्तिक अनुभवही तिने सांगितला.

कन्टेन्ट क्रिएशन हे प्रोफेशन असू शकतं यावर अजूनही विश्वास नसलेल्या चार लोकांमध्ये आपल्या इन्फ्लुएन्सर करिअरला सपोर्ट करणं हे स्वत:च करत अनुष्काने आज तिची पर्सनॅलिटी घडवली आहे. तिच्या या प्रयत्नांची दखल घेत फोर्ब्सने तिला आपल्या ‘थर्टी अंडर थर्टी’च्या यादीत स्थान दिलं. भारतातील आर्थिक विषयांवर कन्टेन्ट बनवणारी पहिली महिला हा बहुमान तिला मिळाला आहे. रोजच्या निरीक्षणातून आणि आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या ज्ञानाचा अचूक उपयोग करून घेत एका वेगळ्या जोखमीच्या विषयात स्वत:चं स्थान घडवणाऱ्या अनुष्काची कथा तिच्यासारख्या अनेक तरुणींसाठी निश्चितच प्रेरणा देणारी आहे.