मितेश रतिश जोशी

इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती हे त्यांच्या स्पष्ट विधानांमुळे सतत चर्चेत असतात. गेल्याच महिन्यात त्यांनी एक त्यांचा अनुभव सांगितला. ५० वर्षांपूर्वी बल्गेरिया (तेव्हाचे युगोस्लाव्हिया आणि आजचे सर्बिया) मधील निश नावाच्या एका सीमेवरील शहरात, ज्या ठिकाणी ते युरोपमध्ये हिचहाइक करत होते तेव्हा ते १२० तास उपाशी होते. त्यांनी सांगितलेल्या या अनुभवामध्ये हिचहाइक हा फारसा वापरला न जाणारा शब्द कानावर पडला आणि त्याच्या अर्थाची उत्सुकता लागली. अर्थ समजल्यावर त्यामागचं विशाल जग डोळ्यांसमोर आलं. आजच्या सफरनाम्यात नेमका त्याचाच उलगडा आहे.

stand up comedy in india
मनोरंजनाची तरुण परिभाषा
adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
Loksatta viva Bollywood faces of International brands Brands actress
विदेशी ब्रॅण्ड्सचे बॉलिवूड चेहरे
Romita Majumdar
फेनाम स्टोरी: टेलिंग हर ‘फॉक्स’टेल
diwali preparation at home
Diwali 2024 : आली माझ्या घरी ही दिवाळी!
corporate gifting gift trend on diwali occasion diwali gifts ideas for friends diwali gifts for family zws 70
भेटवस्तूंचा ट्रेण्ड
Loksatta viva safarnama health Tourism Sleep tourism trend
सफरनामा: झोपेसाठी पर्यटन!
loksatta viva article Blouse type Boat neck blouse Blouse type Saree Fashion
नव्याकोऱ्या चोळीचा साज
environment protection from debris
फेनम स्टोरी: भंगारातून पर्यावरण रक्षण

पर्यटन विश्वातील हिचहाइक ही पद्धत काही नवीन नाही. बऱ्याच वर्षांपासून हिचहाइक ट्रेण्डमध्ये आहे. हिचहाइक म्हणजे काय तर लिफ्ट घेऊन प्रवास करणे. या ट्रेण्डमध्ये लिफ्ट घेणाऱ्यापेक्षा लिफ्ट देणाऱ्याचा संकोच अनेक वेळा दिसून येतो. हिचहाइकिंग किती सुरक्षित आहे आणि किती नाही, हा बऱ्याच काळापासूनचा चर्चेतला विषय आहे. चित्रपटांमध्ये हा ट्रेण्ड सर्वाधिक वापरला गेला आहे. चित्रपटात नायक-नायिका हात दाखवून कार किंवा इतर वाहनचालकांकडे लिफ्ट मागताना दिसतात. हॉलीवूड – बॉलीवूडपटात दिसणाऱ्या या दृश्याप्रमाणे सामान्य जीवनातही लांबच्या मार्गावर खांद्यावर पिशव्या वा हातात सामान घेऊन लोक अशा प्रकारे लिफ्ट मागताना दिसतात. देशात किंवा परदेशात अनेक व्लॉगर्स आणि ब्लॉगर्स या पद्धतीने प्रवास करताना दिसतात. १९५० च्या दशकात अशाच एका हिचहाइकरची कथा लोकांसमोर आली. त्याने हिचहाइकिंगद्वारे सुमारे २५०० मैलांचा प्रवास पूर्ण केला होता, या व्यक्तीचे नाव होते पीट कोल्टेनाऊ.

शोमन राज कपूर यांनी ‘अराऊंड द वर्ल्ड इन ८ डॉलर्स’ची शिफारस त्यांच्या चित्रपटातील एका गाण्यात केली होती. अगदी ८ डॉलर्समध्ये नाही, पण अशा प्रकारे (लिफ्ट मागत) एकूण प्रवासाच्या बजेटमधील मोठा खर्च नक्कीच वाचतो. देश-विदेशात कुठेही तुम्हाला रस्त्यावर लिफ्ट मागणारे हिचहाइकर्स दिसतील, पण प्रवासाच्या या पद्धतीमुळे पैशांची बचत होते, त्यातला धोका कमी होतो का? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. त्यामुळे हिचहाइकर्स दिवसा त्यांचा प्रवास पूर्ण करतात आणि रात्री विश्रांतीसाठी जागा शोधतात. रात्रीचा प्रवास धोकादायक आणि थकवणारा दोन्ही असू शकतो. म्हणून जर तुम्हाला हिचहाइक करण्याची इच्छा असेल तर तुम्ही दिवसाउजेडी सफर करण्याचा पर्याय निवडायला हवा.

हेही वाचा >>> फेनम स्टोरी: अंगदचा प्राण

पुण्यातील रोहन सदडेकर या तरुणाने २०१८ मध्ये भारत फिरताना हिचहाइकचा अनुभव घेतला आहे. २०२२ मध्ये सलग दोन महिने त्याने दक्षिण भारतात हिचहाइक केले. त्याच्या या अनुभवाविषयी तो सांगतो, ‘हिचहाइकच्या माध्यमातून मी माझी सफर पूर्ण करू शकतो का? हे पाहण्यासाठी मी घरातून पाच हजार रुपये घेऊन दक्षिण भारताच्या भ्रमंतीला निघालो. मी स्वत:वर काही नियम घालून घेतले होते. रोज २०० किमीपर्यंतचा प्रवास करायचा. संध्याकाळी सातनंतर प्रवास करायचा नाही, यासारख्या नियमांच्या जोरावरच मी कर्नाटक, गोवा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ इत्यादी पाच राज्ये हिचहाइक करत फिरू शकलो’. हिचहाइकिंग या शब्दातच हाइकिंगचा उल्लेख आहे. या शब्दाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हिचहाइक म्हणजे केवळ लिफ्ट मागत फिरणं नव्हे, तर त्यात तुम्हाला चालावंही लागतं. जर लिफ्ट मिळाली नाही तर काही किलोमीटर चालून टप्पा पूर्ण करावा लागतो. चौकात लिफ्ट मिळाली नाही तर महामार्गापर्यंत चालत जाऊन लिफ्ट मागावी लागते, त्यामुळे हिचहाइकिंग म्हणजे चालणं व लिफ्ट मागत आपला प्रवास पूर्ण करणं हेही अभिप्रेत आहे, असं रोहन नमूद करतो.

प्रत्येक फिरस्तीचं त्याच्या प्रवासातील आठवणींशीही घट्ट नातं जोडलं जातं. असाच काहीसा अनुभव रोहनला आला. त्याविषयी सांगताना तो म्हणाला, ‘मुन्नारपासून आठ किमी लांब अनाचल या गावी असताना मला पुढे इडुकी या गावी जायचं होतं. जेव्हा तुम्ही परराज्यात पहिल्यांदाच फिरता, तेव्हा तुम्हाला तिथल्या लोकांच्या मानसिकतेचा, माणुसकीचा काहीच अंदाज नसतो. त्यामुळे अशा अनोळखी ठिकाणी हिचहाइक खूप सांभाळून करावं लागतं. अशीच खबरदारी घेत रस्त्यात कोणी लिफ्ट देईल का याची वाट बघत मी उभा होतो. तेवढ्यात एक गाडी आली आणि माझ्यापाशी येऊन थांबली. माझं काम झालं. मला लिफ्ट मिळाली. गाडीत कुटुंब होतं. गाडी चालवणाऱ्या मालकाशी माझ्या गप्पा सुरू झाल्या. त्याने आपुलकीने माझी चौकशी केली. दुपारचा एक वाजून गेला होता. त्याने मला हॉटेलमध्ये लंचसाठी आग्रह केला. मी नाही नाही म्हटलं तरीही त्याचा आग्रह काही थांबत नव्हता. अखेर तो म्हणाला, तुला हॉटेलमध्ये संकोच वाटत असेल तर माझ्या घरी जेवायला चल. त्याचा आग्रह पाहून शेवटी मी होकार दिला. त्याच्या घरी गेलो. अतिशय मोठं टुमदार घर, आजूबाजूला चहा, मिरी आदि पदार्थांची हिरवीगार शेती. हे पाहून माझं मन प्रसन्न झालं. जेवता जेवता आमच्या शेतीविषयी गप्पा सुरू झाल्या. त्यानंतर त्याने राहण्यासाठी आग्रह केला, पण मला वेळेत प्रवास पूर्ण करायचा होता. त्यामुळे मी थांबलो नाही, पण एकमेकांचे नंबर शेअर करत संपर्कात राहिलो’. खरं तर कोणत्याही प्रवासाहून परत आल्यावर आपण हळूहळू ती जागा, तिथली माणसं, परिसर विसरायला लागतो. मग केवळ आठवण म्हणून कुठेतरी रुतून राहातात त्या जागा नेणिवेत किंवा अनेकदा फोटोंच्या स्वरूपात… पण इथे उलटंच घडलं. एक वर्षानंतर मी पुन्हा त्याच्याकडे दोन आठवड्यांसाठी गेलो. त्याच्याच घरी राहिलो. त्याच्याकडून चहाच्या शेतीचे बारकावे जाणून घेतले. माझ्या या हिचहाइकिंगच्या प्रवासाने मला असं एक कुटुंब कायमचं जोडून दिलं, त्यामुळे काही आठवणी नात्यांची वीण अधिक घट्ट करून जातात, असं रोहन सांगतो.

सातारा जिल्ह्यातील कुसगावमधील अक्षय राजेश कुसगावकर या फिरस्तीने भारतातील बारा ज्योतिर्लिंग यात्रा हिचहाइकिंग करत पूर्ण केली आहे. २०२० मध्ये त्याने त्याच्या प्रवासाला सुरुवात केली. करोनामुळे त्याच्या फिरस्तीला काही काळासाठी अर्धविरामही लागला. टाळेबंदी संपली आणि नियम शिथिल झाल्यावर त्याने पुन्हा आपली सफर सुरू केली. या सफरनाम्यात त्याला अनेक अनुभव आले. ‘मी बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घ्यायचं ठरवल्याने साहजिकच हिचहाइकिंगच्या माध्यमातून मला संपूर्ण देश पालथा घालता आला. हिचहाइकिंग हे असं प्रवासाचं माध्यम आहे, ज्यात तुम्हाला प्रचंड संयम ठेवावा लागतो. श्रीशैल्यमच्या डोंगरात मला तब्बल दोन तास लिफ्ट मिळाली नव्हती, तेव्हा १५ किलोची बॅग पाठीवर घेऊन जमेल तितकी वाट मी चालत गेलो.

अखेर दोन तासांनी मला लिफ्ट मिळाली, पण भाषेचा अडथळा होताच. एकमेकांची भाषा कळत नसल्याने अखेर हातवारे करत संवाद साधून ती मोहीम फत्ते केली’ अशी आठवण अक्षयने सांगितली. एकदा गोव्याला असताना मोबाइलचा रिचार्ज करायला पैसे कमी पडत होते, तेव्हा मी कोणतीही लाज न बाळगता रेस्टॉरंटमध्ये भांडी घासून, रूम साफ करून पैसे कमावले होते. कारण तुम्ही शून्य म्हणून आला आहात आणि शून्य म्हणूनच जाणार आहात हे मला हिचहाइकिंगने शिकवलं, असंही तो सांगतो.

हिचहाईक करताना काळजी ही घ्यावीच लागते. अनोळखी व्यक्तीला लिफ्ट मागत प्रवास करायचा असल्याने काही गोष्टी कटाक्षाने पाळाव्याच लागतात. साधारणपणे कार, ट्रॉली किंवा ट्रकला हिचहाइकिंगसाठी प्राधान्य दिलं जातं. कुठल्याही वाहनाची निवड करताना चालकाचं वर्तन संशयास्पद वाटत असेल अथवा चालक वारंवार जबरदस्ती करत असेल किंवा वाहनात बसण्याचा आग्रह करत असेल तर त्या वाहनात चढू नका. बंद किंवा काळ्या काचा असलेलं वाहन निवडू नका. आजकाल गॅझेट्स खूप उपयुक्त आहेत, रोख रक्कम कमीत कमी ठेवा आणि मोबाइल नेहमी पूर्ण चार्ज करून ठेवा. दुसऱ्या राज्यात किंवा देशात हिचहाइकिंग करताना पोलिसांना कॉल करा, वाचवा वा मदतीसंदर्भात तेथील स्थानिक भाषेतील महत्त्वाचे शब्द पहिले जाणून घ्या. तुमची प्रवास योजना, कुटुंब किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही देणे टाळा. हिचहाइकिंग करताना नेहमी असे कपडे घाला जे तुम्हाला वाहनात चढताना, बाहेर पडताना, बसताना, धावताना आरामदायी ठरतील. महामार्गांवर वाहने जास्त वेगाने जातात आणि लोक सामान्यपणे त्यांची वाहने लिफ्टसाठी थांबवत नाहीत. त्यामुळे महामार्गाऐवजी बाजारपेठ किंवा शहराच्या मध्यभागी लिफ्ट मागणं अधिक सुरक्षित आणि चांगलं आहे.

पर्यटन विश्वातील हिचहाइकिंग हा ट्रेण्ड फार इंटरेस्टिंग आहे. इथे माणुसकीच्या भावनेनेच प्रवासासाठी मदत मिळते. कधी कधी काही अनुभवांमुळे या प्रवासातील उत्साह कमी-जास्त होत राहतो. मात्र तुमचं ध्येय पक्कं असेल तर थोडी सावधगिरी बाळगत तुम्ही हिचहाइकिंगच्या माध्यमातून प्रवासाचा आनंद अनुभवू शकता.

viva@expressindia.com