भारतात जेव्हा एमपीथ्री दाखल होऊन संगणकांमध्ये संगीतसाठय़ाची सोय झाली तेव्हा पहिल्यांदा संगीत संग्रहकांजवळ ‘इझी लिसनिंग’ परदेशी गाण्यांचे आणि फक्त वाद्यसंगीताचे मोठे आदान-प्रदान होऊ लागले. यात सेक्सोफोन वाजविणाऱ्या केनी-जीच्या बहुतांश साऱ्या अल्बम्सचा क्रमांक वरचा असे. तो पर्यंत महागडय़ा शौकिन बार्स आणि उंची हॉटेलांमध्ये वाजविल्या जाणाऱ्या केनी-जीच्या धुनांचा घरातील संगीतामध्ये शिरकाव झाला नव्हता. वेगवेगळ्या मूड्समध्ये वाजणाऱ्या आणि मन:शांती देणाऱ्या या सेक्सोफोनच्या सुरावटींना ऐकण्याची सोय एमपीथ्रीने करून दिली आणि भारतीय श्रोत्यांना नव-अभिजात संगीत ऐकण्याची पर्वणी लाभली. अभिजात संगीतात मुरलेले कान बाख आणि मोझार्ट यांच्या धूनप्रदेशातून बाहेर पडले नव्हते. पण केनी जी आणि पियानोवादक यानी या दोघांच्या संगीताने दोन हजारच्या दशकात वाद्यसंगीताला महत्त्व आणून दिले. या अमेरिकी कलाकारांनी वाद्यसंगीताला जागतिक पटलावर नेऊन ठेवले. जगातील कित्येक उत्तम संगीतकारांना एकाच व्यासपीठावरून आणून यानी या कलाकाराने कित्येक कॉन्सर्ट गाजविले. या दोघांइतकीच जगप्रसिद्ध झाली ती थायी वंशाची ब्रिटिश व्हायोलिनवादक व्हेनसा मायी ही कलाकार. तिच्या सगळ्या धून नृत्यसंगीत म्हणून पण चालू शकतात. अभिजात आणि लोकप्रिय संगीताचे अनोखे मिश्रण करून या कलावंतिणीने बरीच काळ आपले नाव वाद्यसंगीतात चर्चेत ठेवले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याच काळात ब्रायन फिनेगन या युरोपातील बासरीवादकाने निव्वळ अद्भुत वादनशैलीने जागतिक लोकप्रियता मिळविली होती. ब्रायन फिनेगन हा यानी, केनी-जी यांच्यासारखा एमटीव्ही आणि व्ही चॅनलच्या मांडवाखालून न गेल्याने आपल्या देशातील सूक्ष्मसंगीत शौकिनांच्याही यादीत सापडण्याची शक्यता कमी आहे. अलीकडच्या काळात फिनेगनच्या तरुणपणापासूनचे अनेक कन्सर्ट यूटय़ूबवर उपलब्ध असल्याने त्याच्या वादनातील हुकूमत लक्षात येऊ शकते. त्याचे सारे ताजे व्हिडीओज अलगुजेप्रमाणे छोटय़ा उभ्या बासरीला वाजवितानाचे आहेत. पण या छोटुकल्या वादनातून तो जी स्वरबहार उडवतो, तो अविस्मरणीय अनुभव आहे. त्या सगळ्याच गाण्यांची एमपीथ्री व्हर्जन्स सहज उपलब्ध आहेत. फ्लूक या बॅण्डसह त्याने १९९५ पासून दशकभर केलेल्या वाद्यमुशाफिरीचा ऐवज कानांसह साऱ्या शरीरभरात चेतना पसरवणारा आहे. २००५ पासून या कलाकाराने कान नावाच्या बॅण्डसह कर्णमधुर संगीत देण्याचा धडाका लावला. त्यातील सारी गाणी यूटय़ूबसह ऐकून पाहणे हादेखील सुंदर अनुभव आहे. या गाण्यांची नोटेशन्स खास अभ्यासली, तर त्यातील बहुतांश गाणी अशुद्ध स्वरांमध्ये बांधलेली म्हणजे वाजविण्यास सर्वात अवघड असल्याचे लक्षात येईल. ही स्वरगाणी कान का सुखावतात, याची कारणे त्यावर घेतलेल्या अशक्य मेहनतीमध्ये आहे. बिओगा (किंवा बेओगा) या विचित्र नावाचा आयरिश बॅण्ड त्यांच्या लक्षवेधी धूनसाठी शोधून ऐकावा असा आहे. आर्यलडच्या भूमीतून सर्वाधिक मुख्य प्रवाहातील पॉप-रॉकस्टार तयार झाले असले, तरी हा बॅण्ड कोर्स भावंडांइतकाही आपल्याकडे परिचित नाही. गंमत म्हणजे या बॅण्डचे संगीत २०१० साली ग्रॅमी पुरस्कारासाठी मानांकित झाले होते. मात्र पुरस्कार न मिळाल्याने मुख्य प्रवाहात येण्यापासूनही मुकले. यूटय़ूब आल्यानंतर मात्र हा बॅण्ड आणि त्यांचे संगीत जराही लपून राहिले नाही. फिडल, पियानो आणि ऑर्केडियन जातकुळीतील लहान वाद्य यांच्या बळावर त्यांनी वाजविलेली प्रत्येक धून ऐकावी. कोणत्याही मन:स्थितीत हे वाद्यसंगीत शरीरात अखंड ऊर्जा निर्माण करते.

कालूम स्टीवर्ट या आणखी एका आयरिश वादकाला ऐकणे अनिवार्य आहे. बॅगपाइप उत्तम वाजवणारा हा कलाकार अनेक कलावंतांसोबत पारंपरिक आयरिश संगीतासोबत फ्यूजन वाजविताना आढळतो. हा वादक इतका तरुण आहे की पुढील दहा वर्षांमध्ये मुख्य प्रवाहात येऊन जगभरात पोहोचण्यास त्याला कुणीही अडवू शकणार नाही. या वादकाने जुन्या आणि नव्या धुनांसह यूटय़ूबवर प्रचंड मोठा श्रोतावर्ग तयार केला असून त्याच्या स्वरगाण्यांच्या एमपीथ्रीही उपलब्ध आहेत. स्कॉटिश आणि आयरिश संगीत गेल्या काही वर्षांमध्ये यूटय़ूबच्या माध्यमामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे. चांगले ऐकायला शोधणाऱ्यांना या देशात संगीताची चालविली जाणारी गंभीर परंपरा त्यामुळे उमजत आहे. पब स्थानिक बार्समध्ये पारंपरिक वाद्यांसह वाजविले जाणाऱ्या कानाकर्षक संगीताचा खजिनाच या भागात दडलेला आहे. वर उल्लेख केलेल्या आणि यादीत असलेल्या सगळ्या कलाकारांचे वाद्यसंगीत एकदा तरी अनुभवून पाहा.

म्युझिक बॉक्स

Beoga: Eochaid

FullSet – “The Glen Road to Carrick”

Talisk – Echo

Beoga: Aurora

Calum Stewart – Lasses of Stewarton

Flook – Asturian Way

Kan – Fly

viva@expressindia.com