गायत्री हसबनीस

नवरात्रात सुरत, जैसलमेर आणि जयपूर या तिन्ही ठिकाणी मोजरीची फॅशन शुद्ध पारंपरिक आणि अस्सल देखणी आहे. मोजरी, चप्पल सुई-धाग्याने शिवल्या जातात आणि त्यावरचे नक्षीकाम तर वाखाण्याजोगेच असते. कोल्हापुरी चप्पल आणि राजपूत जुतेही वैविध्यपूर्ण असतात. नवरात्रीत तुमचा आऊ टफिट अगदी पारंपरिक असो वा सहजसाधा मॉडर्न असो, पारंपरिक चप्पलेची फॅशन चांगली सूट होते. आजकाल मुली प्रत्येक गोष्ट सूट होतेय की नाही हे पाहतात, पण चप्पल मात्र त्याला अपवाद आहे. ती कुठल्याही लुकला अनन्यसाधारण महत्त्व निर्माण करून देते. त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत चप्पलेची फॅ शन विसरून कसं चालेल? यंदाच्या सीझनला चप्पलच्या अंतरंगात शिरून नवं काही शोधू या..

  • देसी लुक म्हणजे पारंपरिक कपडे, चप्पल आणि बरंच काही, परंतु अगदी ग्रासरुटला गेलात तर चप्पलेचेही विविध प्रकार आहेत. कोल्हापुरी चप्पलेत कुरुंदवाडी, कोल्हापुरी कापशी, टिपू सुलतान, शाहू, मेहरबाँ, वेणीवाली इ. प्रकार मिरवण्यासारखे आहेत. सध्या कोल्हापुरी चप्पला ‘अजियो.कॉम’वर उपलब्ध झाल्या आहेत. त्यात प्युअर लेदर, राजस्थानी हातकाम, कोल्हापुरी लेदर या सेमी हिल, फ्लॅट्समध्ये उपलब्ध आहेत. या चपलांवरती ५५ ते ६५ टक्के सूट आहे. ८१०, १०७९, ७७९ रुपये या किमतीत तुम्हाला कोल्हापुरी चप्पल मिळेल. ६७५ रुपयांपर्यंत कोल्हापुरी हिल्स मिळतील.
  • लेदरमधील पर्याय यंदा मेन्सवेअर आणि वुमन्सवेअरमध्ये दिसतील. मेन्सवेअरमध्ये लेदरच्या राजपूत स्टाइल स्लिपर आहेत. ज्या ७९९, ५८५, ७२०, ५५९ रुपयांपर्यंत मिळतील. यात ब्राऊ न लेदर, यल्लो लेदर ट्रेण्डमध्ये आहेत. अ‍ॅमेझॉनवर गेलात तर कोल्हापुरी स्लिपर व महाराजा चप्पल मिळेल.
  • कापशी चप्पल ३,३०० रुपयांपर्यंत मिळेल, यात कच्चं कापड आणि हॅण्ड डाय आहे. डाबू प्रिंटच्या चपला, स्लिपर आणि शूजही उपलब्ध आहेत. १६००, १५००, १५८९, १५९९ रुपयांपर्यंत हे शूज मिळतील. त्यावर चेक्स, मिरर वर्कही आहे. सोनेरी व काळ्या रंगांतही तुम्हाला कापशी चप्पल मिळेल. लेसिंगमध्ये, सिंगल तळीमध्ये, घुंगरूमध्ये, बटूकमध्ये, ब्रेडेडमध्ये आणि वेणीमध्ये तुम्हाला ‘खास कापशी’ चप्पल मिळेल.
  • ऑथेंटिक स्टाइलवर यंदा भर आहे. त्यामुळे हाताने केलेली कलाकुसर म्हणजे हॅण्डक्राफ्टिंगच्या चपला बाजारात मिळतील. मूळ लेदर, चामडीपासूनच्या चपला सध्या ऑनलाइनवर आहेत. नायलॉनने विणलेल्या चपला घेण्यावर जास्त भर ठेवा. हॅण्डक्राफ्टेड चपलांमध्ये ११४३, १३३९, १२७०, ५९३, १६९४, ५५०, ६३५ रुपये या दरात ऑथेंटिक, हाताने बनवलेल्या पारंपरिक चपला मिळतील.
  • वूमन्सवेअरसाठी बटूक, राजस्थानी, कोल्हापुरी, व्ही शेप, कोल्हापुरी लेदर, शाहू कोल्हापुरी, गोटा चप्पल ट्रेण्डमध्ये आहेत. १७०० रुपयांच्या पुढे याच्या किमती आहेत.
  • पेशवाई स्टाइल जूट्टी चप्पलही तुम्हाला ९९९ रुपयांत मिळेल. वूवन जुट्टीही उपलब्ध आहे, ६०० रुपयांपर्यंत त्याची किंमत असेल.
  • मोजरीमध्ये जूटच्या चपला आहेत. मौर्यन स्टाइल चप्पल मिळेल. लेडीजवेअरमध्ये मल्टिकलर मोजरी आहेत. त्यात शिमर आणि पारंपरिक राजस्थानी एम्ब्रॉयडरी पाहायला मिळेल. वेलवेट, सिल्कच्या जूट्टी चप्पल, मोजरी तुम्हाला मोरपंखी, फ्लोरल डिझाइनमध्ये मिळतील. ३१९, ३९९, ४९९, ४८९ रुपयांपर्यंत जुट्टी व मोजरी मिळतील.

त्यामुळे नवरात्रीच्या निमित्ताने या अशा ट्रेण्डी चप्पल खरेदीला भलताच वाव आहे. अगदी हलकीफुलकी पण तरीही अस्सल पारंपरिक चप्पलांची खरेदी या सीझनला करायलाच हवी.

viva@expressindia.com

Story img Loader