सायली सोमण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काही महिन्यांपूर्वी आपण फॅशन इंडस्ट्रीमधील काही मुख्य कारकीर्दीची क्षेत्रे आणि त्यातील आपल्याला माहीत नसलेल्या काही मूळ संकल्पनांविषयी सविस्तर बोललो होतो. तोच लेख वाचून मला अनेक सकारात्मक प्रतिक्रिया इमेल्स, मेसेजेस आणि दूरध्वनीच्या माध्यमातून आल्या. त्यातील काही वाचकांच्या बोलण्यामधून असे जाणवले की त्यांना या फॅशन क्षेत्राबद्दल किंवा येथे रोजच्या रोज वापरल्या जाणाऱ्या काही मूळ संकल्पनांविषयी थोडकी माहिती आहे. त्याबद्दल त्यांना अजून सविस्तर माहिती वाचायला आवडेल. म्हणूनच आजचा लेख खास फॅशन इंडस्ट्रीत प्रचलित असलेल्या काही संकल्पनांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या त्या रसिकांसाठी आहे.

फॅशनक्षेत्रात शिक्षण घेत असल्यापासून किंवा प्रत्यक्ष या इंडस्ट्रीत काम करायला लागल्यापासून मला आपल्या नेहमीच्या ओळखीच्या व्यक्तींमध्ये सातत्याने आढळणारी गोष्ट म्हणजे त्यांना आपण नेमके काय करतो याबद्दल उत्सुकता तर असतेच, पण त्याबरोबरच कुठल्या कामाला किंवा गोष्टीला काय म्हणतात; त्याचा आवाका किती, हे प्रश्न त्यांना सातत्याने पडतात. उदाहरणार्थ, माझं फॅशन डिझायनिंगचं शिक्षण नुकतंच पूर्ण होत होतं आणि बऱ्याच ओळखीत किंवा नात्यात असलेले लोक कायम मला हे विचारायचे की आता शिक्षण संपलं म्हणजे तू बुटिक सुरू करणार का? किंवा कधी खरेदीला जायचं म्हटलं की माझ्या आईच्या तोंडून हमखास निघणारं वाक्य म्हणजे कुठल्या ब्रँडेड लेबलचे कपडे विकत घ्यायचेत?..  अशा अनेक गोष्टी आहेत. मुळात प्रत्येक फॅशन डिझायनिंगचा विद्यार्थी स्वत:चं बुटिक सुरू करू शकत नाही. त्याचबरोबर ‘ब्रँडेड लेबल’चे कपडे मिळत नाहीत तर ‘ब्रँडेड कपडे’ आणि एका अमुक ‘लेबलचे कपडे’ या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. तर आज माझा प्रयत्न हा या अशाच काही गैरसमज किंवा शंकांचं निरसन करण्याचा आहे.

सर्वात पहिले आपण कपडे खरेदी करण्यासाठी किंवा ते बनवून घेण्यासाठी ज्या विविध प्रकारच्या दुकानांमध्ये म्हणजेच बुटिक, लेबल, ब्रँड यांसारख्या विविध अजून जागा आहेत. त्या नेमक्या काय आहेत, कुठल्या प्रकारच्या दुकानात कुठले कपडे मिळतात, त्यांना नेमके काय म्हटले जाते, या सगळ्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

ओट कुटुर  (Haute Couture)

ही एक फ्रेंच टर्म आहे ज्याचा अर्थ अतिशय एक्स्क्लुझिव्ह डिझायनर गार्मेट्स असा होतो. अशा प्रकारचे गार्मेट्स बनवताना डिझायनर अतिशय चोखंदळ आणि बारकाईने लक्ष देत तो पेहराव बनवत असतो. या प्रकारच्या कपडय़ांमध्ये एकाच डिझाइनचे कपडे पुन्हा बनवले जात नाहीत. त्यामुळेच त्यांना एकमेव डिझाइन कपडय़ाचा मान मिळतो. अशा पेहरावांमध्ये मुळातच खूप पॅटर्न्‍स किंवा एम्ब्रॉयडरीचा वापर केलेला असल्यामुळे ते रोजच्या वापरासाठी कोणी सहज घेत नाहीत. एखाद्या विशिष्ट समारंभासाठी किंवा कार्यक्रमासाठीच हे असे ठरावीक पद्धतीने डिझाइन केलेले किंवा बनवून घेतलेले कपडे परिधान केले जातात. अनेकदा कुठल्याही मोठय़ा पुरस्कार सोहळ्यात चित्रपट क्षेत्रातील तारेतारका जेव्हा भारीतले गाऊन्स किंवा ड्रेसेस घालतात तेव्हा ते एक्स्क्लूझिव्हच असतात.

अवान गार्ड (Avant)

ही संकल्पना एका फ्रेंच शब्दावरून बेतलेली आहे. ज्याचा अर्थ प्रायोगिक, नावीन्यपूर्ण फॅशनेबलकपडे असा घेतला जातो. या पेहरावाचा वापर एका विशिष्ट फॅ शनशोच्या कलेक्शन पुरतं किंवा एका नाटकातील नाहीतर चित्रपटातील एका पात्राच्या कॉस्च्युमपुरता मर्यादित असतो. रोजच्या वापरात सहज कोणी हे कपडे परिधान करत नाही.

तर हे होते फॅशन इंडस्ट्रीतील असे काही मोजके शब्द किंवा संकल्पना ज्या आपल्या कानावर कित्येकदा येतात. आपण ते सातत्याने बघतो, अनुभवतोही मात्र त्यातला नेमकेपणा सहजासहजी सगळ्यांना लक्षात येत नाही. आपला आजचा हा लेख वाचल्यानंतर मला पूर्ण खात्री आहे की पुढच्या वेळेस खरेदीला जाताना तुमच्या बऱ्याचशा शंका दूर झालेल्या असतील आणि तुम्ही तुमचे गरजेनुसार, इच्छेनुसार लेबल्सची किंवा ब्रँडेड कपडय़ांची, अ‍ॅक्सेसरीजची माहिती मिळवून अधिक चौकसपणे खरेदी करू शकाल!

ब्रँड आणि लेबल

या दोन शब्दांमध्ये जवळजवळ सगळ्यांचाच गोंधळ होतो. मी फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेत असताना माझाही असाच गोंधळ उडायचा. जेव्हा मी हळूहळू या दोन्हींची माहिती काढत गेले, अभ्यास केला तेव्हा मला या दोन्ही प्रकारांमधला नेमका फरक समजायला लागला. ‘लेबल’ म्हणायचे झाले तर या प्रकारातील कपडे किंवा अ‍ॅक्सेसरीज हे नवोदित, प्रॉमिसिंग डिझायनर्सनी डिझाइन केलेले असतात जे अत्यंत स्टायलिश आणि थोडे महागडे तर असतातच, पण एका मर्यादित संख्येत बनलेले असतात. डिझायनर अनिता डोंगरे यांचे अठऊ किंवा ‘ग्लोबल देसी’ हे किंवा चांदीपासून बनवलेल्या डिझायनर ज्वेलरी स्टोअर्स म्हणजे ‘आद्य’ किंवा ‘मोहा’ हे मागील काही वर्षांत अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय झालेले लेबल्स आहेत. एका लेबल आणि ब्रँडमध्ये फरक हा आहे की एक विशिष्ट ब्रँडचे कपडे किमतीने लेबल कापडय़ांसारखेच जवळपास असू शकतात पण हे कपडे विविध मापं (साईझेस) आणि रंगांचा वापर करून मोठय़ा प्रमाणावर बनवले जातात. शिवाय, एका लेबलपेक्षा कपडय़ांच्या व्यवसायात ब्रँड हे जास्त अनुभवी आणि लोकांच्या माहितीतले कित्येकदा जगभर पसरलेले असतात. उदाहरणार्थ, लिवाईस, पेपे, फॅ ब इंडिया हे कपडय़ांचे खूप जुने आणि लोकप्रिय ब्रँड्स आहेत.

रिटेल स्टोर/मल्टिब्रॅण्डेड स्टोर/ मॉल

हे एक मोठय़ा प्रमाणावरचे तीन किंवा जास्त मजल्यांचे दुकान असू शकते जिथे फक्त कपडे, अ‍ॅक्सेसरीज या संबंधित गोष्टी सर्व ब्रँडमधील आणि सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष आणि लहान मुलांसाठी उपलब्ध तर असतातच. मात्र त्याचबरोबरीने आपल्या दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या इतर घरघुती सामान, फर्निचर इत्यादी अनेक गोष्टी पण पाहायला मिळतात. उदाहरण द्यायचं झालंच तर बिग बजार, रिलायन्स मॉल ही या रिटेल स्टोअरची उदाहरणेच आहेत. पण जर कपडय़ांचं रिटेल स्टोर बघायला गेलो तर पँटलून्स, सेंट्रल, लाइफस्टाइल आणि मॅक्स ही फक्त कपडय़ांची रिटेल स्टोअर्सही तुम्हाला पहायला मिळतील.

बुटिक

बुटिक म्हणजे रोजच्या वापरातले किंवा कुठल्या समारंभात परिधान करण्यासाठी लागणारे विशेष पद्धतीचे डिझायनर कपडे आणि अ‍ॅक्सेसरीज मिळवून देणारे एक छोटय़ाप्रमाणावरचे दुकान म्हणता येईल. बुटिक्स साधारणपणे आपल्याला मोठय़ा रिटेल मॉल्समध्ये किंवा शॉपिंग/ कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये दिसतात.