कोणतेही सणवार असोत. नैवेद्याच्या पानात मधोमध असलेली गोडाची जागा ही नेहमीच भरलेली हवी. नवरात्रात बऱ्याच कुटुंबांमध्ये पारंपरिक गोड पदार्थाची रेलचेल असते. नवरात्राच्या शेवटच्या दिवशी येणाऱ्या दसऱ्याच्या सणाला अनेक घरी श्रीखंड-पुरी, बासुंदी, खीर असेच पदार्थ खाल्ले आणि खिलवले जातात. आनंदाला नाही तोटा म्हणत येणाऱ्या या सणासाठी थोडंसं आगळंवेगळं आणि तरुण मनांना आवडेल अशा ‘गोडधोड’ रेसिपीज शेफ कुणाल कपूर आणि अजय चोप्रा यांच्याकडून खास व्हिवाच्या वाचकांसाठी..

पपई कबाब विथ अननस सालसा

पपई कबाब साहित्य : जाडसर किसलेली कच्ची पपई २  कप, जाडसर किसलेला कच्चा बटाटा  १ कप, बदामाचे काप अर्धा कप, मीठ पाव टीस्पून, हिंग १४ टीस्पून, लाल मिरची पावडर  १ टी स्पून, हळद अर्धा टी स्पून, ओवा अर्धा टी स्पून, धणे कुटलेले २ टी स्पून, आलं बारीक चिरलेले २ टी स्पून, चिरलेली हिरवी मिरची २ टेबल स्पून, बेसन २ टेबलस्पून, कोथिंबीर चिरलेली २ टेबल स्पून, तेल २ टेबल स्पून.

अननस सालसा साहित्य : बारीक चिरलेला अननस  १ कप, बारीक चिरलेला कांदा पाव कप, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या १ टेबलस्पून, बारीक चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून, लिंबाचा रस ३ टेबलस्पून, मीठ अर्धा टी स्पून, मिरेपूड पाव टी स्पून.

कृती : पपई आणि बटाटय़ाला मीठ लावून पाच मिनिटं बाजूला ठेवा. पाच मिनिटांनी पपई आणि बटाटा पिळा त्यातील पाणी काढून टाका व पेपर टॉवेलवर पाच मिनिटं ठेवा. एका मोठय़ा बाऊलमध्ये पपई-बटाटय़ात तेल सोडून इतर सर्व घटक मिसळून घ्या. सर्व घटक मिसळल्या नंतर त्या पिठाचे पॅटिस बनवा. एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या आणि तेलात पॅटिस तांबूस रंगाचा होईपर्यंत तळा. अननस सालसा साहित्य एकजीव करून गरमागरम पपई कबाबांबरोबर सव्‍‌र्ह करा.

बदाम ग्रील्ड बर्फी

साहित्य : खवा (पिंडी)- ५०० ग्रॅम, शुगर फ्री – ४० ग्रॅम, बदाम भाजून आणि दळून – १ कप

कृती : खवा किसून घ्या आणि बाजूला ठेवा. मंद आचेवर गॅस ठेवून एका भांडय़ात सर्वप्रथम खवा घाला, त्यानंतर त्यात ४० ग्रॅम शुगर फ्री घालून शिजवा. आचेवरून काढून ठेवून त्यांत भाजलेले व दळलेले बदाम घाला. लगेचच सवर्ि्हग डिशमध्ये वाढा. उरलेले शुगर फ्री त्यावर पसरवून घाला. ही डिश ओव्हनमध्ये २०० अंश सेल्सिअस तापमानाला फक्त वरून भाजली जाईल अशी ठेवा. शुगर फ्रीचे कॅरेमल होईपर्यंत ठेवा. नंतर काढून लगेच वाढा झटपट बदाम ग्रील्ड बर्फी.

बदाम सोया मिल्क

साहित्य : बदामाचे काप – १०० ग्रॅम, सोया मिल्क – ७५० मिली, मध- १५० ग्रॅम, बदाम संपूर्ण – ३५० ग्रॅम, केळी – २०० ग्रॅम.

कृती : मिक्सरच्या जारमध्ये सोललेले बदाम, सोया मिल्क, मध आणि केळी घालून एकजीव करून घ्या. ग्लासमध्ये ओतून त्यावर भाजलेल्या बदामाचे काप घालून सजवा व सव्‍‌र्ह करा बदाम सोया मिल्क.

टीप : मिल्क अधिक स्वादिष्ट करण्यासाठी त्यात बेरी फ्लेवर घाला.

कोजागरीचे दूध

साहित्य : ४ लिटर म्हशीचं दूध, १ वाटी साखर, १ टीस्पून जायफळ पूड, १५ ते १६ काजू, ८ ते १० बदाम, पाव वाटी चारोळी.

कृती : सर्वप्रथम ४ लिटर दूध आटवून घेणे. तसेच काजू – बदामाची मिक्सरमध्ये जाडसर भरड पूड तयार करणे. आटवलेल्या दुधात साखर, जायफळ पूड, काजू – बदामाची भरड पूड घाला. आणि दुध नीट हलवून घ्या. सगळ्यात शेवटी चारोळी घाला आणि मंद आचेवर दूध पुन्हा ५ मिनिटं उकळत ठेवा. व दुध सव्‍‌र्ह करा.

अंजीर बदाम मुरंबा

साहित्य : अंजीर (सुकवलेले अंजीर) ५०० ग्रॅम, ऑरगॅनिक मध ३ टेबलस्पून, बदामफूल १ नग, खसखस १ टेबल स्पून, मिरे (भरडलेले) १२ नग, दालचिनी १ छोटा तुकडा, बदाम भाजलेले आणि सोललेले दीड कप.

कृती : अंजीर धुवून घ्या आणि ५०० मिली पाण्यात एक तासासाठी भिजत घाला. मध्ये मध्ये अंजीर ढवळत राहा. एक तासांनी पाणी काढून न टाकता अंजीर मंद आचेवर उकळायला ठेवा. साहित्यात नमूद केलेले सर्व मसाले घालून मिश्रण एकजीव होईपर्यंत उकळत ठेवा. त्यानंतर चमच्याच्या मागील बाजूने अंजीर दाबून नीट ढवळा. शेवटी त्यात मध आणि बदाम घालून घट्ट होईस्तोवर शिजवा. गॅस बंद करून मुरंबा संपूर्ण गार करा. एका जारमध्ये मुरंबा काढा व फ्रीजमध्ये ठेवा.

Story img Loader