गायत्री हसबनीस
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नवरात्रीला आठ दिवस उरले आहेत. तुमच्या कप्प्यात आता ट्रॅडिशनल लेहेंगा, घागरा चोळी, स्कर्ट असेलच पण मनात यंदा काहीतरी नवरात्रीला वेगळा लुक ठेवू या, अशी मनोमन कुठेतरी इच्छा नक्कीच असेलच. नेहमीप्रमाणे बंदी, झुमके, बांगडय़ा तर आहेतच त्याशिवाय काहीतरी हटके स्वरूपात यंदा बाजारात उपलब्ध झालेल्या बऱ्याच ज्वेलरी प्रकारांचा आपण विचार करू शकतो. स्ट्रीट शॉपिंग करायला गेलात तर बऱ्यापैकी इमिटेशनची ज्वेलरी नवरात्रीत मिळेल, परंतु ऑनलाइन साइट्सवर गेलात तर नवरात्रीत काही वेगळ्या धाटणीचे दागिने आले आहेत. जे सहजगत्या तुमच्या ट्रॅडिशनल पेहेरावावर उठून दिसतील, नवरात्रीत तुम्हाला हवं तसं सजता येईल. या दागिन्यांवर ७२% सूट असून दागिन्यांचे सेटही ऑनलाइन उपलब्ध आहेत.
* चोकर
यंदा चोकरला खूप मागणी असेल. नवरात्रीत मुली मॉडर्न किंवा इंडो वेस्टर्न लुकही ठेवतात त्यामुळे त्यांना गळ्यातल्या लोंबत्या नेकलेस पीसप्रमाणे चोकरही आवडतात. यंदा मेटॅलिक, सिल्व्हर, ऑक्सिडेशन, मिररवर्क आणि चित्रकारी केलेले असे चोकर उपलब्ध आहेत. रामलीला स्टाइल, कापडाच्या तुकडय़ांपासून जोडलेल्या दागिन्यांची स्टाइल व कॉइन शेप, स्टोन शेपच्या स्टाइलचे दागिने यंदा चोकरच्या रूपात मिळतील. चोकरची किंमत रिझनेबल आहे. ३५६, ३४७, ४९९, ३४९ रुपयांमध्ये चोकर उपलब्ध आहेत.
* पैंजण
पैंजणाची फॅ शनही नवरात्रीत मिरवण्यासारखी आहे. राजस्थानी पैंजणावर यंदा भर आहे. गोल्ड, मोती, मणी, डायमंडमध्ये तुम्हाला विविधता मिळेल. यंदा फेस्टिवल सीझनला बाजारात आफ्रिकन, ट्रायबल फॅशन उतरली आहे. त्यामुळे पैंजणमध्ये बीडेड, कापडी तसेच हाताने तयार केलेले वूवन पैंजणही मिळतील. ट्रॅडिशनल टॉप, कुर्ती आणि जीन्स या आऊ टफीटवर वूवन, बीडेड पैंजण उठावदार दिसेल कारण त्यात मल्टिकलर आहेत व काळ्या रंगावर जास्त मॅच होण्यासारखे हे पैंजण आहेत. ‘इटसी’, ‘क्राफ्ट्सविला’, ‘फ्लिपकार्ट’, ‘अॅमेझॉन’वर असे पैंजण उपलब्ध आहेत. ३९९ रुपयांपासून ५५९, ६६६, १,१६५ रुपयांपर्यंत त्यांची रेंज आहे. सिल्व्हर, ऑक्सिडाईज पैंजण ८०० रुपयांपासून सुरू आहेत. गोल्डन पैंजणही तुम्हाला ५०० रुपयांच्या आसपास मिळेल.
* ब्रेसलेट
कंगन, ब्रेसलेट, बँगल यात नवरात्रीत खूप विविध डिझाइन मिळतील. गुजराती व अहमदाबादी स्टाइल व थोडय़ाशा फॅन्सी बँगल यंदा मिळतील. सिल्कची आऊ टिंग असलेल्या विविध मण्यांपासून आकर्षक डिझाइनने तयार केलेल्या अशा काही बँगल, ब्रेसलेट बाजारात मिळतील. ७८९, ७९९, ८५५, १,९८०, १,९३८ रुपयांपर्यंत विविध ब्लॅक क्रिस्टल, यूफोरिक, स्टर्लिग सिल्व्हर, रोडियममध्ये मिळतील. ‘अॅमेझॉन’, ‘स्नॅपडील’, ‘इंडियामार्ट’वर अशा बँगल्स नक्की मिळतील.
* इयररिंग्स
टास्सेल असलेले झुमके, हूप्स तसेच बुटके गोटा वर्क असलेले कानातले यंदा ट्रेंडमध्ये आहेत. राजस्थानी पद्धतीचे कानातले यंदा पाहायला मिळतील. २९९ रुपयांपासून हे कानातले मिळतील. जयपुरी स्टाइलचे पण इंडो वेस्टर्न पद्धतीचे हे कानातले आहेत. गोटा इयररिंग्स ३३२, ३५० रुपयांवर आहेत.
* नेकपीस
दुर्गा नेकलेस यंदा ट्रेंडमध्ये आहे. दुर्गा नेकलेसच्या पेन्डेंटमध्ये यंदा विविधता आहे. ३९९, ४९९, ५९९ रुपये अशा काहीशा त्यांच्या किमती आहेत. त्यावर सुटेबल इयररिंग्सही तुम्हाला मिळतील. गोल्ड, सिल्व्हर, ऑक्सिडेशन, जर्मन सिल्व्हर, ट्रायबल थ्रेड, ब्रास, मेटल यात वेगळेपणा आहे. यंदा ‘चित्रकारी’वर भर आहे म्हणून ‘अॅमेझॉन’वर चित्रा नेकलेसही उपलब्ध आहेत. सरस्वती, टेम्पल देवी या नेकलेससह कोल्हापुरी स्टाइल गोल्डन तसेच जर्मन सिल्व्हरमध्ये दोऱ्यांपासून बनवलेले नेकपीस ३९९ रुपयांपासून मिळतील.
बाजारात फोरहेड ज्वेलरी अजून उतरली नाहीये. पण सेमी मॉडर्न, ऑक्सिडाईज, गोटा बिंदी, फोरहेड ज्वेलरी बाजारात आहेत. या ज्वेलरीची ५०० ते ६०० रुपयांपासून सुरुवात आहे. कमी किमतीच्या ज्वेलरीपासून लग्नात किंवा गरबा खेळण्यासाठी कॅज्युअल, वेअरेबेल अशी ज्वेलरी यंदा फॅशन वेबसाइटवर मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झालीये. नवरात्रीत पूर्ण ट्रॅडिशनल होण्यापेक्षा थोडं क्वर्किनेसही आणण्यावर भर आहे.
viva@expressindia.com