गायत्री हसबनीस
मेन्सवेअर फॅशनचे ट्रेण्ड्सही झपाटय़ाने बदलत चालले असल्याचे दिसून येते आहे. त्यात सेलेब्रेटी कलाकारांनीही मेन्सवेअर फॅशनमध्ये पारंपरिक प्रकार आणि नवीन डिझाइन्ससह कम्फर्टला जास्त प्राधान्य दिले असल्याचे गणेशोत्सवात ठिकठिकाणी वावरलेल्या कलाकारांच्या फॅशनवरून दिसून आले. त्यामुळे हेच पारंपरिक डिझाइन्समधले नवे वेगळेपण घेऊन आलेली मेन्सवेअर फॅ शन यावर्षी सणासुदीसह सगळीकडे मिरवली जाणार आहे.
पूर्वी फक्त रॅम्पवरूनच मेन्सवेअर फॅशन आकर्षकपणे दिसायची, मात्र तेच आपल्याला कधी काळी सणासुदीला किंवा पार्टीला तरी घालून मिरवता येईल की नाही, ही शंका होती. आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खादी जॅकेटही फेस्टिव्ह सीझनपासून सगळीकडेच फॅशन म्हणून मिरवले जात असल्याने मेन्सवेअर फॅशनचे ट्रेण्ड्सही झपाटय़ाने बदलत चालले असल्याचे दिसून येते आहे. त्यात सेलेब्रिटी कलाकारांनीही मेन्सवेअर फॅशनमध्ये पारंपरिक प्रकार आणि नवीन डिझाइन्ससह कम्फर्टला जास्त प्राधान्य दिले असल्याचे गणेशोत्सवात ठिकठिकाणी वावरलेल्या कलाकारांच्या फॅशनवरून दिसून आले. त्यामुळे हेच पारंपरिक डिझाइन्समधले नवे वेगळेपण घेऊन आलेली मेन्सवेअर फॅ शन यावर्षी सणासुदीसह सगळीकडे मिरवली जाणार आहे.
मेन्सवेअरमध्ये बऱ्याच सेलेबेट्रींनी कम्फर्टेबल लुक पसंत केला आहे. अभिनेता नील नितीन मुकेशचा निळा चिकनकारी कुर्ता असेल किंवा अभिनेता करन ठक्करचा बुटा एम्ब्रॉयडरीचा कुर्ता अगदी अभिनेता सुनील शेट्टीनेही पांढऱ्या रंगाच्या खादी कॉटन शर्टला पसंती दिली होती. तर किंग शाहरूख खाननेही पांढऱ्या रंगांची कॉटन सिल्क धोती व कुर्ता परिधान करून श्रीगणेशाचं दर्शन घेतलं. यंदा सेलेब्रेटींमध्येही बनारसी, चिकनकारी, कॉटन, सिल्क फेस्टिवल सीझनमध्ये ट्रेण्डी होते. हाच ट्रेण्ड खरं म्हणजे लॅक्मे फॅ शन वीकमधूनही समोर आला होता आणि तोच सेलेबेट्रींनी फॉलो केल्याचं दिसून आलं.
मागच्या वर्षी फेस्टिव्ह सीझनमध्ये एसेमिट्रिकल ब्लेझर, लूझ कुर्ता, धोती, सिल्क पॅण्ट्स ट्रेण्डमध्ये होते. वेडिंग सीझनसाठी फ्लोरल प्रिंट, केप्स, सेमी डिझायनर कोट, ट्राऊझर्स ट्रेण्डमध्ये दिसले होते. या वेळी मेन्सवेअरमध्ये काही विशेष फॅब्रिक्स ट्रेण्डमध्ये आहेत. ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये या वर्षी कॉटन, सिल्क, वूल, ऑरेगंजा हे फॅ ब्रिक्सवापरले आहेत तसेच प्रिंटमध्ये अॅनिमल प्रिंट, फेदर प्रिंट, टाय अॅण्ड डाय, ब्लॉक प्रिंट यांचा वापर करण्यात आलेला दिसून आला आहे. शेरवानी, किमोनो शर्ट, कुर्ता रोब, डिझायनर शर्ट, ब्लेझर अशा विविध स्टाइलच्या कपडय़ांना पसंती मिळते आहे.
गेल्या वर्षीचा फ्लोरल प्रिंटचा ट्रेण्ड मागे पडला असून त्याची जागा बर्ड प्रिंटने घेतली आहे. तर यंदा चेक्स, सिमेट्रिक, एसिमेट्रिक, पोलका डॉटसुद्धा मेन्सवेअरमध्ये ट्रेण्ड इन आहेत हे विशेष. या वेळी कपडय़ांच्या डिझाइनबरोबरच सेलेब्रेटींचे लुकही साधे होते. त्याला अनुसरून वापरले गेलेले फॅब्रिक, एम्ब्रॉयडरी हे सर्वसाधारणपणे सगळ्यांना वापरता येतील असे असल्याने मेन्सवेअरची ही फॅ शन ऑनलाइन साइट्सवरही परवडतील अशा दरात उपलब्ध झाली आहे.
साधा लुक, पारंपरिक कापड याला प्राधान्य देणाऱ्या या वर्षीच्या मेन्सवेअर फॅशनमध्ये आलेला आणखी एक वेगळेपणा म्हणजे साधेपणालाही फिटनेसची जोड देण्यात आली आहे. तरुण पिढी फिटनेसबाबतीत जागरूक असल्याने त्यांच्या शरीरयष्टीला उठावदार दिसतील, असेच पॅटर्न्स, रंग, उंची, डिझाइन्स याचा पूर्ण विचार करून कपडे डिझाइन करण्यावर डिझायनर्सनी भर दिला आहे. या वेळी लॅक्मे
फॅशन वीकमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधले गेले होते ते पुनीत बलानाच्या मेन्सवेअर कलेक्शनकडे. अगदी आरामदायक तरीही उठावदार असे त्याचे कलेक्शन होते. त्याने गुलाबी-मरून, हिरवा-निळा असे परस्परविरोधी रंग वापरले. हे रंग वापरून जम्पसूट, धोती आणि धोतीखाली कॅनव्हास स्लिप-ऑन्स देत एक हटके लुक डिझाइन केला आहे. त्यातही त्याने हॅण्ड ब्लॉक प्रिंटला पसंती दिली. तर नकिता सिंग हिने अगदी साधा व फेस्टिवलला शोभेल असा लुक मेन्सवेअरसाठी देताना तिने मिलिटरी ग्रीन रंगाला पसंती दिलीये. मिलिटरी ग्रीन हा रंग सध्या सगळ्याच तरुणांचा आवडीचा रंग आहे त्यामुळे या रंगात कुर्त्यांवर जॅकेट आणि लुझ ट्राऊ झरची रचना तिने केली आहे. जॅकेटची स्टाइल ही बाईकर जॅकेटप्रमाणे असल्याने पारंपरिक पेहराव आणि सेमी मॉडर्न लुक अचूक साधला गेला आहे.
डिझायनर सौमोदीप दत्ताने मेन्सवेअर वेडिंग कलेक्शनमध्ये या वेळी एसिमेट्रिक कुर्ता आणि धोती असा लुक आणला आहे. शिवाय कुर्ता व चुडीदारचाही पर्याय उपलब्ध करताना वेगळे पॅटर्न्स आणि ‘ईकत’ स्टाइल एम्ब्रॉयडरी वापरली आहे. उर्वशी कौरचे मेन्सवेअर कलेक्शन यंदा युनिक ठरले. तिने कुर्ता, जॅकेट याची एकच रचना करत वेअरवेबल लुक डिझाइन केलाय. शिवाय, निव्वळ धोतीवर हा जॅकेट कम कुर्ताचा दिलेला पर्याय जीन्सवरही सहज वापरण्याजोगा आहे. तिने लाइनर पॅटर्नवर भर देत हॅण्डलूम खादी, कोटा कॉटन व मटका सिल्कचा कॉम्बो पेश केला. तर कॉटनच्या फॅब्रिकवर शबोरी प्रिंटचे डिझाइन केले आहे.
कुणाल रावलसारख्या मेन्सवेअरमध्ये दरवेळेस स्वत:ची वेगळी शैली सिद्ध करणाऱ्या डिझायनरने अत्यंत पारंपरिक पण आजच्या तरुणांच्या प्रत्येक आवडीनिवडीवर बारकाईने अभ्यास करून म्हणजे ऑफिसमध्येसुद्धा फॅ शन करता येईल असे कलेक्शन आणले आहे. वेस्ट कॉट, सेमी चुणीदार, लूझ लाँग जॅकेट कुर्ता, क्लोज्ड नेक कुर्ता असे अगदी फॉर्मल पण पारंपरिक, सणासुदीला ऑफिसमध्ये नक्की वापरता येतील असे कपडे डिझाइन केले आहेत. फॅब्रिकमध्येही त्याने डेनिम, लाइनन, बुण्डी, कॉटन यांचा वापर केलाय. सेमी शेरवानी, कुर्ता आणि बाईकर जॅकेट, टू – टॉन ट्राऊ झरची स्टाइल खास मेन्सवेअरमध्ये आणलीये. अमित अग्रवालने जॅकेट्सवर प्रयोग केले आहेत, ज्यात डिझाइन आणि रंगावर त्याने एकसारखा पॅटर्न ठेवलाय. फेस्टिवलच्या अनुषंगाने शिमर, ग्लास वर्कवर त्याने भर दिला आहे. अनुश्री रेड्डीने नेहमीप्रमाणे तिच्या गुलाबी रंगावर आणि सिल्व्हर एम्ब्रॉयडरीवर भर दिला. तिने धोती पँट्सबरोबर वनसाइड जॅकेट व लाँग हॅण्ड शर्ट्स सेमी चेक्समध्ये आणले आहेत. सोनम व पारस मोदी यांनी जॉर्जेट आणि सिल्कच्या फॅब्रिकवर जोर दिलाय परंतु शेरवानीतसुद्धा जॅकेट किंवा विथआऊ ट जॅकेट लाँग एसेमिट्रिकल कुर्त्यांचा पर्याय दिलाय. विनित व राहुल यांनी किमोनो स्टाइल शेरवानी, कुर्ता रोब, जॅकेट, लूझ पँट, हुडी, शर्ट, टय़ूनिक आणले आहेत. ज्यावर ग्रे व काळ्या रंगाच्या पोलका डॉट्सचा उठाव आहे. राजेश प्रताप सिंगने देखील पेशव्यांच्या काळातील अंगरखा व त्यावर जॅकेट, कुर्ता याची फॅशन आणली आहे. त्याने यंदा चंदेरीवर काम केलं असून शेरवानीला धोती पँट्स आणि त्यावर वेस्टकोट, राजाकोट असा प्रयोग केला आहे.
सर्वसाधारणपणे यंदा मेन्सवेअरमध्ये गळ्याचा भाग कसा खुलून दिसेल यावर जास्त कल्पक काम करण्यात आले आहे. बंदगळ्याप्रमाणेच गळ्याभोवती टायपेक्षा स्कार्फ , क्लोज्ड कॉलर या स्टाइलवर भर दिलाय. जसं अन्विता शर्मा या डिझायनरने टॅक टॉप आणलाय, ज्यात गळ्याचा भाग हा बंद दिसेल. तर चेक्स आणि पॅरेरल लाइन्स व स्ट्राइप्सवरदेखील खादी, कॉटन या फॅब्रिकसह भर दिलाय; ज्वेलियन अल्वारिस या डिझायनरने मेन्सवेअरसाठी झिकझॅक लाइन्सचा वापर अल्टिमेट चेक्सच्या ऐवजी करून दाखवला आहे. अंतर-अग्नी, उज्ज्वल दुबे यांनी एसिमेट्रिक कुर्ता, जॅकेट, लांब बुण्डी, ब्रोकेड शेरवानी पेश करताना साधारणपणे मुलांची उंची, त्यांची बारीक शरीरयष्टीला महत्त्व दिलंय.
हल्ली खरं तर तरुणांना ऑफबीट फॅ शन जास्त आवडते. मात्र पूर्णपणे ऑफबीटचा प्रयोग टाळत पारंपरिक कापड, पॅटर्न यालाच आधुनिक टच देत सुटसुटीतपणे हे कपडे सणासुदीला, पार्टीला किंवा अगदी सहज ऑफिसमध्येही कॅरी करता येतील. अशा प्रकारे डिझाइन करण्यावर जास्त भर यंदाच्या फॅ शन डिझायनर्सनी दिला असल्याने मेन्सवेअरची ही रॅम्पवरची फॅ शन या वेळी खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल, यात शंका नाही.