तेजश्री गायकवाड
लॉकडाऊनमध्ये कंटाळलेल्या तरुणाईने त्यातून बाहेर पडल्या पडल्या फ्रेश होण्यासाठी लूक चेंज करण्याकडे आपला मोर्चा वळवलेला दिसून येतो. यात प्रामुख्याने केसाच्या रंगामध्ये, रचनेमध्ये बदल करून घेण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो आहे. या संदर्भात पुण्याचे ‘कपिल्स सलोन आणि अॅकॅडमी’चे विकेश ठोंबरे सांगतात, ‘बॉलीवूड आणि हॉलीवूड या दोन्ही इंडस्ट्रीचा प्रभाव केसांच्या स्टाइलिंग बाबत प्रकर्षांने जाणवतो. एखाद्या कलाकाराने के साला केलेला रंग पाहून तसाच रंग करण्याकडे लोकांचा कल आहे. सध्या कॅरेमल रंग, हनी गोल्ड, रोजो रेड आणि अॅश रंगाच्या शेड्स प्रचंड ट्रेण्डमध्ये आहेत. परंतु बाहेरच्या देशातील लोकांप्रमाणे पूर्ण केस रंगवण्याकडे आपल्याकडे कोणाचा कल दिसून येत नाही. चंक अर्थात थोडे थोडे केस घेऊन रंग करायचा ट्रेण्ड जास्तआहे. रंग देण्याच्या फ्री हॅण्ड टेक्निकला सध्या खूप मागणी आहे. कारण या टेक्निकमुळे रंगाची वेगळी छटा मिळते’. हेअरकलर बरोबरच हेअरस्टाइलही के ली जाते. केसांना व्हॉल्यूम मिळेल अशाच हेअरस्टाइलची निवड मुली करताना दिसत आहेत. वर्किं ग वूमन्सचा मॅनेजेबल हेअरस्टाइल आणि हेअरकटकडे कल आहे. तर मुलांची हेअरस्टाइल त्यांच्या दाढीच्या स्टाइलवर अवलंबून आहे, असेही त्यांनी सांगितले.
मुलांमध्ये खास करून टॅटू हेअरकटला जास्त मागणी वाढली आहे. या हेअरकटमध्ये एका बाजूला कमी केस करून त्यावर टॅटू डिझाइन केला जातो. हेअर ट्रीटमेंटमध्ये आधी हेअर स्ट्रेट करण्यावर भर होता. पण त्या स्टाइलमुळे हेअरस्टाइल करायला अवघड जात होतं. त्यामुळे हेल्दी हेअर करण्यावर तरुण-तरुणी भर देत आहेत, त्यासाठी पहिल्यांदा हेअर ट्रीटमेंट घेतली जाते आणि मग आपल्या आवडीची हेअरस्टाइल किं वा हेअरकलर के ला जातो, असे विवेक यांनी सांगितले. मुंबईतील ‘बॉडी सलोन’च्या मास्टर क्रिएटिव्ह स्टाइलिस्ट अश्विनी देवस्थळी यांनीही हेअर ट्रीटमेंटवर तरुणाईचा जोर वाढला असल्याची माहिती दिली. ‘माझं स्टाइलिंगचं शिक्षण लंडनच्या ‘विडाल ससून मास्टर अॅकॅडमी’मधून झालं आहे. त्यामुळे माझं दोन्ही ठिकाणच्या ट्रेण्डकडे लक्ष असतं. आपल्याकडे तिकडचे ट्रेण्ड इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सहज माहिती होत आहेत. त्यामुळे त्या लुक्सची मागणीही ग्राहकांकडून होत असते. फंकी आणि रेग्यूलर कलर्समध्ये ब्राऊन, गोल्डन आणि त्याच्या जवळपास जाणाऱ्या सगळ्याच शेड्स-रंग ट्रेण्डमध्ये आहेत. मिक्स रंगाचीही मागणी ग्राहकांकडून होताना दिसते’, केसांना रंग करून घेताना केसाच्या खालच्या बाजूला रंग करण्यावरही भर आहे, कारण नंतर त्या लूकचा कंटाळा आला तर सहज केस कापून लूक चेंज करता येतो, असेही त्यांनी सांगितले. हेअरकटमध्ये पूर्ण लूक चेंज होतील असे कट केले जातात. लॉकडाऊनमध्ये कंटाळून लोकांनी पूर्ण लूक चेंज होईल अशापद्धतीनेच स्टाइलिंग करण्याकडे मोर्चा वळवला आहे. हेअर ट्रीटमेंट करतानाही फ्रीज फ्री, सिल्की, शाईन देणारे केस आणि हेल्दी केस हवे आहेत, अशी मागणी केली जात आहे. या ट्रीटमेंटसाठी ऑरगॅनिक प्रॉडक्ट्सच वापरण्याचा आग्रह तरुणाईकडून धरला जात असल्याचे अश्विनी यांनी सांगितले.
ठाण्याच्या ‘कलर मी क्रेझी फॅमिली सलोन आणि वेलनेस’च्या हरप्रीत मनोचा अनलॉकपासून हेअरकलर ट्रेण्डमध्ये काय आणि कसा बदल झाला याबदल सांगतात, आधी बहुतेक मुली तपकिरी रंगाला जास्त पसंती देत होत्या. परंतु लॉकडाउननंतर त्या रेग्युलर कलर्सना मुलं-मुली कंटाळले आहेत असं दिसून येतं आहे. सध्या लाल रंगाचा मोठा गाजावाजा झाला आहे. ग्लोबलीच लाल रंगाला मुली पसंती दर्शवत आहेत. हायलाइट करण्यासाठीसुद्धा मुली लाल आणि मॅजेन्टाच्या गडद छटा करण्यावर भर देत आहेत. मुळात उबदार रंग फारच ट्रेण्डी आहेत. भारतीय केसांवर उबदार रंग उठून दिसतात. ज्यांना हेअरकलरने लूक चेंज करण्यात रस नाही ते लूक बदलण्यासाठी हेअरस्टाइल किंवा हेअरकटला प्राधान्य देतात, असे हरप्रीत यांनी सांगितले. मेकओव्हर करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाईला हेअरकलर किं वा हेअरकट हा लूक चेंजसाठी सहजसोपा मार्ग वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. जुलैपासून आतापर्यंत बहुतेक तरुणी या शॉर्ट हेअरकट निवडत आहेत असं हरप्रीत सांगतात. तर मुलांच्या स्टाइलिंगमध्ये लांब केसांची क्रेझ दिसून येतेय. लॉकडाउनमध्ये मुलांचे केस वाढले आहेत आणि आता तीच स्टाइल मुलं पुढे कॅरी करत आहेत. ‘कबीर सिंग’ चित्रपटातील अभिनेता शाहीद कपूरचा लूक अजूनही ट्रेण्डमध्ये असल्याचे त्या सांगतात.
चेहऱ्यातील तोचतोचपणा टाळून काहीतरी नवा साजशृंगार देण्यासाठी हेअरकलरचा ट्रेण्ड खूप उपयोगी ठरतो आहे. तरुणाईचा उत्साह आणि वाढती मागणी पाहून नवनवे हेअरक लर ट्रेण्ड आणण्याची धडपड हेअरस्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट यांच्याकडून के ला जातो आहे. अगदी खास सवलतींचीही बरसात के ली जात असल्याने तरुणाईच्या के सांवर आणि परिणामी लूकवर रंग चढत चालला आहे !
viva@expressindia.com