तेजश्री गायकवाड

आपल्याला हवं तेव्हा आपल्या मित्रांसोबत बाईक काढून आवडीच्या ठिकाणी फिरायला जायचं, वीकएण्डला जवळच छोटीशी ट्रिप करायची, असं फक्त मुलांनाच करताना आपण ऐकलेलं असतं. रोड ट्रिपचं नियोजन असेल तर तिथेही बऱ्याचदा बाईकचं हॅन्डल किंवा मग कारचं स्टेअरिंग पुरुषाच्याच हाती. एक बाई किंवा मुलगी कधीही उत्तम ड्रायव्हर असू शकत नाही, असे हेटाळणीचे सूर आणि  मुलींना नेहमीच कोणाची तरी साथ लागते असा समजही सर्वदूर आहे. याच सगळ्या स्टीरिओटाइप्स विचारांना कात्री लावत मराठमोळ्या मुलीही एकटय़ाने, मनसोक्त बाईकिंग करत दऱ्याखोऱ्याही पालथ्या घालताना दिसतात..

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…

‘राइडरगर्ल विशाखा’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या विशाखा फुळसुंगेच्या यूटय़ूब चॅनेलची फॉलोअर्स संख्या साडेपाच लाखांच्या घरात आहे. तिच्या मते रायडिंग तिच्या रक्तातच आहे.

ती सांगते, जेव्हापासून मला समजतंय तेव्हापासून मी माझ्या आईवडिलांबरोबर राइड्स करतेय. सुरुवातीला ‘पिलियन’ म्हणून अर्थात रायडरच्या मागे बसून मी अनेक स्थळांना भेट दिली. नंतर मी स्वत: रायडर म्हणून ६ वर्षांपूर्वी सुरुवात केली. लहानपणापासूनच प्रवासाप्रती असलेला माझा ओढा, नव्या ओळखी करून घ्यायची इच्छा आणि भन्नाट काहीतरी करण्याची आस हे सगळं बाईक रायडिंगमुळे पूर्ण झालं. यूटय़ूब माध्यमावर हा प्रवास मांडणाऱ्यांमध्येही पुरुषांची मक्ते दारी जास्त.. ती मोडण्यासाठीच ‘राइडरगर्ल विशाखा’ची सुरुवात के ल्याचे ती सांगते. तिने महाराष्ट्रातील विविध भागांना भेट द्यायला सुरुवात केली, पण खऱ्या अर्थाने तिची  पहिली सोलो राइड ठरली ती लेह—लडाख. ‘प्रत्येक रायडरची आयुष्यात एक सुप्त इच्छा असते, निसर्गरम्य पर्वतीय प्रदेश एकदा तरी बाईकवरून पालथा घालण्याची.. खरंतर इतकी मोठी  राइड पहिल्यांदा आणि तेही एकटय़ाने करायची हे एक आव्हानच होतं. पण मी मनाशी पक्कं  ठरवून ही राइड के ली. माझ्यासाठी हा एक वेगळाच अनुभव होता. वाटेत वेगवेगळ्या ठिकाणी अजून रायडर्सला भेटणं, त्यांचे विचार ऐकणं यात वेगळीच बात होती. मी सुरुवातीला जरा बावरले होते, पण हळूहळू सरावले. खारदुंगला पास यशस्वीपणे पार करून दिल्लीला परतले तेव्हा माझा आत्मविश्वास कमालीचा वाढला होता, असं ती म्हणते. बाईक रायडिंगची प्रेरणा आईकडून मिळाल्याचे ती सांगते. ‘आई माझ्यामागे ठामपणे उभी राहिली. ती माझी गुरू-मार्गदर्शक सगळं काही आहे. सतत नवीन काहीतरी शोधण्याची प्रेरणा तिने मला दिली’, असं ती सांगते. बाईक रायडिंगमुळे मानसिक समाधान, नवी ऊर्जा आणि दरवेळी स्वत:शी नव्याने ओळख करून घेण्याची संधी मिळते, असं विशाखा म्हणते.

‘लहानपणापासूनच एक मुलगी म्हणून काय करावे यापेक्षा काय करू नये याचेच धडे दिले जातात. आयुष्य स्वत:च्या इच्छेनुसार जगता येऊ शकते, हे दाखवून देण्याची गरज होती. म्हणूनच मी राइड करते. राइड करताना मला पुष्कळ अडचणी आल्या, पण आशावादी राहणं हाच माझा कानमंत्र आहे, असे म्हणणारी विशाखा तिच्या आजवरच्या प्रवासात आवडलेल्या नर्मदा परिक्रमेच्या राइडबद्दलही भरभरून सांगते.

लॉकडाउनच्या आधी केलेली ही राइड म्हणजे नुसतीच एक सफर नव्हती तर साहस, आध्यात्मिकता आणि सामाजिक जाणिवेने भरलेली राइड होती. आपण या समाजाचे काही ना काही देणे लागतो याची सतत एक जाणीव असायची, पण ती प्रत्यक्षात आणणे हे एक प्रकारचे आव्हान होते. नद्या प्रदूषित करू नका, नद्या वाचवा, राष्ट्र वाचवा हा संदेश घेऊनच मी नर्मदा परिक्रमा केली. माझ्या या राइडच्या व्हिडीओला लोकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद बघितला की मला खरंच बरं वाटतं. या ९ दिवसांच्या परिक्रमेने मला जणू नर्मदामातेच्या उदरात ९ महिने घालवण्याचे आणि त्यातून जन्म घेण्याचे असीम समाधान दिले, असं विशाखा म्हणते.

‘आरतीज लाइफ’ हा आरती तावडे या बाईकरचा यूटय़ूब चॅनेल. आरतीला ४ वर्षांपूर्वी फक्त सायकल चालवता येत होती, परंतु फिरण्याची प्रचंड आवड होती. मग फिरण्यासाठी नेहमी कोणाची तरी साथ का हवी?, हा प्रश्न स्वत:लाच विचारत ती अवघ्या ३ दिवसांत बाईक चालवायला शिक ली. ‘मी बाईक शिकले आणि आठवडय़ातच मी माझी स्वत:ची बाईकसुद्धा घेतली. ४ वर्षांपूर्वी भारतात नुकतीच मोटर व्लॉगिंगला सुरुवात झाली होती. हेल्मेटला कॅमेरा जोडून पुरुष राइडर आपला प्रवास लोकांपर्यंत पोहोचवत होते. मलाही ते करावंसं वाटलं. आणि असा कॅमेरा घेऊन प्रवास करणं कधीही चांगलं. कारण यामुळे आपला प्रवास तर टिपला जातोच, पण कधी काही दुर्घटना झाली तर त्याचा खूप फायदाही होतो’,  असं आरती सांगते. सुरुवातीला सोलो राइड न करता आरतीने बाईकर्सचाच एक ग्रुप जॉइन केला, परंतु त्यात तिला स्वतंत्रपणे काही करता येत नव्हतं. ‘सोलो राइडच्या आधी मी छोटी राइड करायची ठरवली. मी माझ्या घरापासून आक्सा बीचपर्यंत राइड केली. नंतर मी कसारा घाटात सोलो राइड केली. या राइड्सने मिळालेल्या आत्मविश्वासामुळेच मी पुढे जात राहिले. आत्तापर्यंती मी नव्वद टक्के  सोलो राइड्स केल्या आहेत, असं ती सांगते. आरतीने मुंबई ते कन्याकुमारी ही ७ दिवसांत सगळ्यात मोठी राइड याच वर्षांच्या सुरुवातीला पूर्ण के ली. ‘ मी जेव्हा एकटी राइडला जाते तेव्हा पुढच्या क्षणाला कोण भेटणार, काय परस्थितीत असणार आहे, काय प्रसंग येईल काहीही माहिती नसतं. अशा वेळी आपलाच आपल्याला नव्याने शोध लागतो. माझा कॅमेरा आणि त्यायोगे माझे प्रेक्षक नेहमीच माझ्याबरोबर असतात. आणि तसेही प्रवासात आपण कधीच एकटे नसतो, कारण रस्त्यावरचे लोक, झाडं, आकाश सगळेच आपल्याबरोबर असतात. एक स्त्री रायडर म्हणून माझ्याकडे नक्कीच वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं. कधी कोणाच्या डोळ्यात कौतुक असतं तर कोणाच्या डोळ्यात नवल. सुदैवाने अजून तरी मला काही वाईट अनुभव आले नाहीत, पण मी सोबतीला पेपर स्प्रे आणि चाकू नक्कीच ठेवते’, असं आरती सांगते. सेफ्टी म्हणून राइडर्सनी आपल्याबरोबर काहीतरी ठेवावं  तसेच आपला रूट आपल्या घरच्यांसोबत, मित्रमंडळींसोबत शेअर करावा, अशी सूचनाही आरती करते.

आवड असेल तर माणूस कितीही काम असलं तरी आवड पूर्ण करतोच, याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. अपर्णा बांदोडकर. डॉक्टरकीचा पेशा सांभाळत अपर्णा आपलं बाईक रायडिंगचं पॅशन पूर्ण करते आहे. ‘सातवीत असताना मला मोटरसायकल शिकायची होती. बाबांचा एकदा अपघात झाल्यामुळे माझ्या आईला माझं मोटरसायकल शिकणं अजिबात पटणारं नव्हतं. पण तरी मला त्याचीच क्रेझ होती. मी भावाकडून बाईक शिकले. आणि मला गिअरलेस नाही तर संपूर्ण गिअर असलेली बाईकच आवडायची. १९९७ मध्ये मी बाईक शिकले. तेव्हा माझी स्वत:ची बाईक नव्हती. पण मी ज्या महाविद्यालयात शिकत होते तिथे मी अनेकांना रॅगिंगपासून वाचवलं आहे. त्याबदल्यात मी त्यांच्याकडून त्यांची बाईक थोडय़ा वेळासाठी चालवायला घ्यायचे, असं ती सांगते. नंतर तिने बुलेट घेतली. ‘बाईक राइडला जाणं म्हणजे एकांत. एका खोलीत बसून योगा, मेडिटेशन करत जसं आपण स्वत:मध्ये झाकून बघतो. तसच माझं राईडला गेल्यावर होतं. मोकळ्या आकाशाखाली आजूबाजूला कितीही गर्दी-आवाज असला तरी मला मनातून शांत वाटतं’, असं ती सांगते. संपूर्ण प्रवासात अनेकदा बऱ्यावाईट अनुभवांचा सामना करावा लागतो. अशा वेळी आपण स्मार्ट काम केलं पाहिजे, असं ती आवर्जून सांगते. मी कोणत्याही राइडला जाताना मिलिटरी प्रिंट असलेली बॉटम घालते. रस्त्यात मध्येच थांबण्यापेक्षा आवर्जून पेट्रोल पंपावर थांबते. तिथेच जेवण करते. आपण आपल्या समोर कोण आणि कशी व्यक्ती येतेय हे बघूनच काय बोलायचं हे ठरवावं, असंही ती सांगते. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या फील्डमध्ये स्त्रीने भाग घेणं आजही अनेकांना रुजत नाही आणि याचा प्रत्यय अनेकदा बोलण्या-वागण्यातून येतो, परंतु अनेक सुंदर अनुभवही येतात. अनेक लोक समोरून मदत करतात, असं सांगतानाच या प्रवासात वेगवेगळी भाषा, महत्त्वाचे शब्द, वेगवेगळे पदार्थ असं सगळंच बघायला, शिकायला आणि चाखायला मिळतं, असं अपर्णा सांगते. सगळ्या अडथळ्यांवर मात करत बाईकगिरी करणाऱ्या या मराठमोळ्या रायडर्स सध्या तरुणाईसाठी प्रेरणा ठरतायेत यात शंका नाही!

viva@expressindia.com

Story img Loader