‘‘मी जीवनाशी संघर्ष करतोय.. मदतीचे खूप हात पुढं येताहेत.. मीही शक्य तेवढी इतरांना मदत करायचा प्रयत्न करतोय..’’ प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने संघर्ष करून चित्रपट संकलनाचं काम करणारा आणि शिकणारा आशिष गायकवाड याच्याशी ओळख.
‘त्याच्या’शी गप्पा मारताना शालेय अभ्यासक्रमातली ‘क्षण क्षण काल इकठ्ठा होकर लंबा युग बन जाता हैं। क्षण को शुद्र न समझो भाई यह युग का निर्माता हैं।’ ही कविता आठवली. या कवितेतलं क्षण-कालाचं महत्त्व प्रतििबबित झालं ते त्याच्याशी झालेल्या संवादानं.. ‘त्याच्या’ घरची परिस्थिती, ‘त्याची’ शिक्षणासाठीची धडपड, ‘त्याचे’ कलागुण, ‘त्याची’ जिद्द हे सगळेच फॅक्टर्स भारी आहेत. कलेच्या अवकाशात भरारी घेऊ पाहणारा हा कलावंत आहे, आशिष गायकवाड.
आशिषच्या आयुष्याची गोष्ट आहे संघर्षमय. त्याचे वडील गेले तेव्हा तो अवघा चार वर्षांचा होता.  त्याच्या आईनं त्याच्या संगोपनासाठी ‘असीमा’ या स्वयंसेवी संस्थेचा आधार घेतला. तिथं जाण्याआधी तो वर्षभर मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत जात होता. संस्थेला त्याच्या कलागुणांविषयी कळल्यावर त्याचं शालेय शिक्षण वांद्य््राच्या ‘सेंट स्टॅनिसलॉस हायस्कूल’मध्ये होण्यासाठी संस्थेनं प्रयत्न केले. तो ‘नॅशनल कॉलेज’मधून तो बारावी – आर्टस् झाला.  ‘असीमा’त अभ्यासाखेरीज इतर कलागुणांनाही महत्त्व दिलं जातं. त्या कलांपकी आशिष नाटकात रमला. त्यानं अभिनय केला, गाणी लिहिली नि गायलाही.  
त्याच्या दिग्दर्शकीय हुन्नराची झलक लहानपणीच दिसली होती. तो िभतीवर वर्तमानपत्रं चिकटवायचा नि त्यातील चित्रांवर टॉर्च मारून आता हे पाहा, आता ते पाहा असा आगळा सिनेमा दाखवायचा.. आशिष सांगतो की, ‘कुठंतरी हे ‘सिनेमा दाखवणं’ माझ्यात रुजत असावं.. त्याला धुमारे फुटले ते अमोलसरांमुळं. ‘तारे जमीं पर’च्या निमित्तानं अमोल गुप्ते ‘असीमा’मध्ये आले होते. त्यांच्या सिनेमाच्या कार्यशाळेत मी दिग्दर्शनाच्या ग्रुपमध्ये सहभागी झालो. त्यांनी आम्हांला नाना प्रकारचे चित्रपट दाखवले. त्यावर आपापली मतं लिहायला सांगितली. मी तर काय, एका पायावर लिहायला तय्यारच होतो. चिल्ड्रेन ऑफ हेवनसह कितीतरी चित्रपटांबद्दल भरभरून लिहिलं. या अ‍ॅक्टिव्हिटीमुळं माझा चित्रपटांबद्दलचा इंटरेस्ट वाढला. मी इराणीयन फिल्मचा फॅनच झालो.. एका सुट्टीत सरांनी ‘आसू बने मोती’ हा लघुपट बनवला. पण काही कारणांमुळं मी त्यात सहभागी न झाल्यानं ते थोडे नाराजही झाले होते. पुढं मी तयार केलेला ‘उम्मीद’ हा पहिला लघुपट सरांना खूप आवडला. ‘सेलिब्रेट बांद्रा’ फेस्टिव्हलसाठी मी एक नाटक लिहिलेलं- ‘राहुलनगर में भी स्लमडॉग’. त्यावर आधारित माझ्या ‘तहान’ या लघुपटात माझ्या आईनं भूमिका केली. हा लघुपट मी अमोलसरांना बर्थडे गिफ्ट म्हणून दिला. एक प्रकारची ही गुरुदक्षिणाच होती.’
तो अमोलसरांच्या ऑफिसमध्ये अभ्यास करायला जात असे. तिथं एकदा ‘व्हिसिलग वूडस  इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म, फॅशन अँण्ड मिडिया’चे उमेश गुप्ता आले होते. त्यांनी चित्रपटाच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘व्हिसिलग वूडस’मध्ये एनजीओच्या विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळा घ्यायला अमोलसरांना सुचवलं. अमोलसरांनी गुप्तांना ‘तहान’विषयी सांगून तो दाखवला. पुढं सुभाष घईंनाही हा लघुपट खूप आवडला. ‘तहान’चं स्क्रििनग ‘व्हिसिलग वूडस’च्या वर्कशॉपमध्ये अनेक सेलेब्रेटींजच्या उपस्थितीत केलं गेलं. स्क्रििनगनंतर सुभाषसरांनी आशिषला स्कॉलरशिप जाहीर करून सुखद धक्का दिला.
आशिष त्याच्या यशाचं श्रेय आई, ‘असीमा’च्या संचालक दिलबर पारख, चित्रकला शिक्षिका वर्षां त्रिवेदी आणि अमोलसर, सुभाषसरांना देतो. तो म्हणतो की, ‘मी सात वर्षांचा असल्यापासून चित्र काढतोय. चित्रकलेत मला चांगली गती आहे. अनेक सेलेब्रेटींनी माझी चित्रं घेतल्येत. माझ्या काही चित्रांचा समावेश ‘राईट टू बी’ या पुस्तकात करण्यात आलाय. मी गायचोही. पण सगळयाच कला एकदम कशा साधणार.. त्यामुळं सध्या चित्र नि चित्रपट या कला साध्य करतोय. पण चित्रांचे असे कितीसे पसे मिळणार नि आई-वर्षांताईंना किती त्रास देणार, यावरही विचारही मी केला.’
‘व्हिसिलग वूडस’मधील शिक्षणासाठी त्याला ‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बे’कडून दोन वर्षांची लोन स्कॉलरशिप मिळाली. तो सांगतो की,‘ ‘व्हिसिलग वूडस’.. त्याबद्दल किती नि काय काय बोलू.. मेघना घई-पुरी, प्रशांत नाईकसर, सगळे प्रोफेसर्स नि स्टाफनं मला कायम प्रोत्साहन दिलं. देशविदेशातून आलेले विद्यार्थी माझे मित्र झाल्येत. त्यांच्याकडून मला कितीतरी व्यावहारिक बाबींची ओळख होत्येय नि चौकटीपलिकडच्या जगाची जाणीव होत्येय. हे मित्र मला कायमच धीर देतात. आम्हांला दाखवल्या जाणाऱ्या विविध चित्रपटांच्या स्क्रििनगनंतर त्यांच्या टीमशी आम्हांला संवाद साधता येतो. मी स्वतला खूपच नशीबवान समजतो.. वाटतं की, ‘खुशी मिलती हैं यहॉंपर, हसीं खिलकी हैं यहॉंपर..’ ‘व्हिसिलग वूडस’मुळं माझ्यासारख्या मुलांना खूप मोठा प्लँटफॉर्म मिळालाय.’
 तो ‘असीमा’च्या ऋणात रहाणं पसंत करतो. संस्थेच्या मदतीमुळं त्याच्या करिअरचे पुढचे टप्पे त्याला गाठता आल्येत. त्याचा कल अभिनय नि दिग्दर्शन असतानाही ‘व्हिसिलग वूडस’मध्ये एडिटिंग शिकायचा मोलाचा सल्ला अमोलसरांनी त्याला दिला. त्या आíथक स्थिती लक्षात घेता संकलानाचं काम सातत्यानं मिळू शकेल, असा आडाखा त्यांनी बांधला. ‘व्हिसिलग वूडस’मधल्या शिक्षणादरम्यान त्यानं ‘बालजीवन’ आणि ‘घरकुल’ या स्वयंसेवी संस्थांचे व्हिडिओज केले. त्यानिमित्तानं त्याला तेथील बालमनांत डोकावून त्यांच्या भावना जाणता आल्या.   
वडील गेल्यावर नातलगांनी त्याच्या कुटुंबाला आधार दिला नाही. पण त्याची आई न कोलमडता परिस्थितीशी झुंजत राहिली.. आता त्याला आईचा आधार व्हायचंय.. सध्या तो ‘टेंभुर्ली प्रॉडक्शन’निर्मित ‘क्षण’ हा लघुपट करतोय. सात महिने त्याच्या कथानकावर काम चालू होतं. तो शहापूरच्या टेंभुर्ली गावातल्या मुलांसोबत शुटिंग करतोय. सुजय डहाकेचा शाळा चित्रपट त्यानं तब्बल २५- ३० वेळा पाहिलाय. त्यापासून प्रेरणा घेऊन ‘क्षण’ची निर्मिती झाली. दहावीतल्या दोन मित्रांना क्षणांचं महत्त्व कळणं, ही या लघुपटाची स्टोरीलाईन आहे. या १० मिनिटांच्या लघुपटाचं दिग्दर्शन, छायांकन, संकलन, कथा, निर्मिती हे सगळं तोच करतोय.
आशिष सांगतो की, ‘आता माझा ‘व्हिसिलग वूडस’ सोडायचा ‘क्षण’ जवळ येतोय.. तिथं अ‍ॅडमिशन मिळाली नसती तर मी बीएमएम केलं असतं. आताही या शिक्षणानंतर मी दूरस्थ शिक्षणाद्वारे ‘मुंबई विद्यापीठा’ची पदवी मिळवणार आहे. एकीकडं मी संकलनाचं काम शोधणारेय. क्षणवर माझ्या सगळ्या आशा केंद्रित झाल्यात. तो सगळ्यांच्या पसंतीस उतरला तर.. वेल बिगन इज हाफ डन हे तत्त्व मी शिकलोय.. पुढल्या वर्षी माझा एक चित्रपट येणारेय, हे मी आत्मविश्वासानं सांगू शकतोय.. कारण मी जीवनाशी संघर्ष करतोय.. मदतीचे खूप हात पुढं येताहेत.. मीही शक्य तेवढी इतरांना मदत करायचा प्रयत्न करतोय. हे सगळं करताना माझे पाय जमिनीवरच राहावेत नि ते रहतील असं वाटतं.. या विचारांचं प्रतििबब मी लिहिलेल्या गजलमध्ये पडतंय. त्यातील काही ओळी-  
जिंदगी आसान नहीं है। उसे आसान बनाना हैं। अंगारों पे चल। यहीं हैं खरी अकल। चौबीस घंटे खुशी से क्या पाएगा तू। दुखों से अंधेरे में खो जाएगा तू। कर रोशन उस अंधेरे को। जिस में तू खोया हैं। सुबह उठकर तुझे। देखना एक नया सवेरा हैं।..’