सध्याचं सगळ्यात हॉट फॅशन स्टेटमेंट कुठलं असं विचारलं तर त्याचं उत्तर ‘बॅकलेस’ असं द्यावं लागेल. हॉलिवूडच्या सेलिब्रिटीज कुठल्याही मोठय़ा इव्हेंटसाठी सध्या असे बॅकलेस ड्रेस आणि गाऊन्स घालणं पसंत करताहेत. अर्थातच तिथून ही फॅशन आपल्याकडेही येतेय. आपल्या देशातल्या सेलिब्रिटींनीही या पॅटर्नला आपलंस केलंय असं वाटतंय. सेलिब्रिटींमागून हा ट्रेंम्ड सामान्य जनांपर्यंत पोचतोय. कारण दुकानांमध्ये न्यू अरायव्हल्सच्या शेल्फमध्ये असे बॅकलेस टॉप्स आणि हॉल्टर नेक्स दिसायला लागले आहेत.
बॅकलेसचा ट्रेंड आपल्याकडे काही नवा आहे असं अजिबात नाही. तब्बल दोन दशकापूर्वी माधुरी ‘हम आप के है कौन’मध्ये बॅकलेस ब्लाऊजमध्ये कमाल दिसली होती. आता पुन्हा एकदा ग्लोबल फॅशन बॅकलेस ड्रेसकडे वळतीय. अनेक डिझायनर्स आणि स्टायलिस्ट बॅकलेस डम््ेसचे वेगवेगळे पॅटर्न देताहेत. पारंपरिक कपडय़ांमध्ये बॅकलेस ब्लाऊजचा ट्रेंड आलाय. तर वेस्टर्न आऊटफिट्समध्ये हॉल्टर आणि बॅकलेसमध्ये गाऊन्स आणि टॉप्स आलेआहेत.
बॅकलेस घालताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ड्रेसचं फिटिंह परफेक्टच हवं आणि दुसरं म्हणजे तुम्ही त्यामध्ये कॉन्फिडंट दिसला पाहिजेत. अशा पद्धतीचे ड्रेस घातल्यावर तुम्ही कॉन्शस होत असाल तर त्याच्या वाटेला न जाणं चांगलं.
बॅक केअर ही नवी बाब आता सौंदर्यप्रसाधनांच्या कंपन्यांनी विचारात घेतल्याचं दिसतं. कारण त्यासाठीची प्रॉडक्टस मार्केटमध्ये यायला लागली आहेत. त्याच्या जोरदार जाहिरातीही सुरू आहेत.
मुली चेहऱ्याची जेवढी काळजी घेतात तेवढी इतर भागांची घेत नाही. पाठ या सौंदर्यसाधनेतला सगळ्यात दुर्लक्षित भाग असू शकतो. बॅकलेस घालताना मात्र तीच महत्त्वाची बाब असते. व्यवस्थित काळजी न घेतल्यानं पाठीवर अनेकदा सनबर्न असतात. त्वचा काळवंडलेली असते. अशा त्वचेला ट्रीटमेंटची आवश्यकता असते. नियमित काळजी घेतली तर ही वेळ येणार नाही आणि कुठलाही बॅकलेस ड्रेस अगदी कॉन्फिडंटली मिरवू शकाल.