रोजच्या धकाधकीमध्ये स्वत:साठी आणि स्वत:च्या फिटनेससाठी पुरेसा वेळ देणं शक्य होत नाही, अशी खंत अनेक यंग प्रोफेशनल्स व्यक्त करतात. पण रोजच्या दिनक्रमात थोडे बदल केले तर वर्क-लाइफ-माइंड-बॉडी सगळ्याचं संतुलन साधता येईल. या बॅलन्सिंग अॅक्टचं सिक्रेट.
रोजचं ऑफिस किंवा कॉलेज आणि घर, मित्र व परिवार यामध्ये समतोल साधताना नियमितपणे व्यायाम करणं तसं आजकाल कठीणच झालंय. विशेषत: यंग प्रोफेशनल्सना वर्क- लाइफ बॅलन्स साधणं हळूहळू कठीण होतंय, कारण रोजचे कामाचे तासच इतके वाढलेत की त्यातून दैनंदिन कामं पार पाडण्यासाठीच बराच कमी वेळ हातात असतो. अशा परिस्थितीत व्यायाम कुठून करणार, असा त्यांचा रास्त सवाल असतो. खरं तर व्यायामाला आपल्या दैनंदिन कामात समाविष्ट करून आपण हे वर्क-लाइफ संतुलन व्यवस्थित राखू शकतो. पण ते कसं?
व्यवस्थित योजलेला व्यायाम आणि काम-घरामधलं संतुलन यांच्यात थेट संबंध आहे. व्यायामामुळे ताणतणाव कमी होतात आणि सामथ्र्य वाढीला लागतं, ऊर्जा मिळते. म्हणजे आपण अर्धा किंवा एक तास व्यायाम केला तर त्यातून मिळणारं चतन्य, ऊर्जा त्याहीपेक्षा जास्त काळ टिकते. दिवस चांगला जातो. वर्कआऊट सेशनदरम्यान एखादी गोष्ट साध्य केल्यास तुमचा वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही पातळ्यांवर आत्मविश्वास दुणावतो. व्यायामासाठी, स्वत:साठी दिवसातला थोडा वेळ काढलाच पाहिजे. त्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या.
’दररोज कामावरून घरी परतल्यावर मोबाइल आणि लॅपटॉप किमान दोन तासांसाठी बंद ठेवणे. हे अवघड वाटेल पण अशक्य नाही. एकटय़ाने टीव्ही बघत बसण्याऐवजी जोडीदाराला वेळ द्या. मित्र-मैत्रिणींसमवेत, घरातल्या मंडळींसोबत तो वेळ घालवताना तुमच्या चित्तवृत्ती फुलून येतील. दिवसभराचा ताण हलका होईल.
* आपल्या शरीरासाठी काही कठोर नियम बनवा. ज्यात अजिबात तडजोड होता कामा नये. दररोज व्यायामशाळेत दोन तास घालवणं शक्य नसेल तर किमान २० मिनिटांचा वॉक तरी रोज घेतलाच पाहिजे. त्यानंतर ५ मिनिटं श्वासाचे व्यायाम केले पाहिजेत. मी माझ्या क्लायण्टसना नेहमी सल्ला देते की, कामावरून घरी निघताना शक्यतो स्पोर्ट्स शूज घाला किंवा स्पोर्ट्स किट हाताशी ठेवा. अशाने तुम्ही कामाची वेळ संपल्यानंतर वॉकला जाऊ शकाल. वॉकची इच्छा पुढे ढकलण्यापेक्षा हा उपाय चांगला आहे.
* हातातला क्षण निसटून जाऊ देऊ नका! भविष्यात काय करायचं आहे याच्याच विचारात नेहमी बुडून राहिलात तर आत्ता तुम्हाला जे करायला मिळतंय त्याचं कौतुकच उरणार नाही. गंध, ध्वनी, आपल्या अस्तित्वाची जाणीव अशा आपल्या आसपासच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.
* आयुष्यातली अडगळ काढून टाका. साठलेल्या भावना बोलून मोकळ्या करा. भावनिक आणि शारीरिक ओझ्यामुळे आपण मागे खेचले जातो. जीवनात संतुलन राखण्यासाठी आपल्यात साधेपणा असणं अत्यंत गरजेचं आहे.
* दररोज किमान वीस मिनिटं व्यायाम आवश्यक आहे. क्विक फिटनेस रुटीनसाठी हल्ली तबाटा हा फिटनेस ट्रेण्ड लोकप्रिय होत आहे. वीस मिनिटांचा तबाटा वेट लॉस, वेट मॅनेजमेंटसाठीदेखील उपयुक्त ठरेल.
(सोनिया नारंग या न्यूट्रिशनिस्ट असून सध्या ‘ओरिफ्लेम’ कंपनीसाठी वेलनेस एक्स्पर्ट म्हणून काम करतात.)
फिटनेस टिप्स
* दररोज १० ग्लास पाणी प्यायलंच पाहिजे.
*आठवडय़ातून किमान ५ दिवस व्यायाम करावा.
* फळं आणि ताज्या भाज्या खाव्यात.
* गरजेप्रमाणे पुरवणी आहार घ्यावा.
*तुमचं शेडय़ुल कितीही बिझी असलं तरी सात तास झोप घेतलीच पाहिजे.
* हा दिनक्रम दररोज पाळलाच पाहिजे.
बॅलन्सिंग अॅक्ट
रोजच्या धकाधकीमध्ये स्वत:साठी आणि स्वत:च्या फिटनेससाठी पुरेसा वेळ देणं शक्य होत नाही, अशी खंत अनेक यंग प्रोफेशनल्स व्यक्त करतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-04-2015 at 01:30 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balancing act