केळी हे सर्व हंगामात दिसणारं आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारं फळ. केळ्यात पुष्कळ जीवनसत्त्व असतात. केळी नुसती खाणं चांगलंच. पण केळ्याचे पदार्थ म्हटल्यावर शिकरण आणि वेफर्सपलिकडे आपली मजल जात नाही. याच केळ्यापासून बनवलेले काही वेगळे पदार्थ आजच्या मेन्यू कार्डमध्ये खास तुमच्यासाठी.
केळांच्या उत्पन्नाच्या बाबतीत भारताचा पहिला क्रमांक लागतो. सर्वात उत्तम जातीच्या केळ्यांची पदास भारतातच होते. भारतात सर्वच भागांत केळी होतात. केळ्याचे मूळ स्थान भारत व दक्षिण आशियाचा प्रदेश आहे. आशियामध्ये चार हजार वर्षांपेक्षा अधिक काळापासून केळीचे उत्पन्न होत आहे. ठाणे जिल्ह्य़ातील वसईपासून अगदी थेट आगाशी, सुरत, बलसाड जिल्ह्य़ार्प्यतच्या प्रदेशांत लाखो मण केळ्यांची पदास होते. कच्ची केळी पचण्यास जड असतात. केळी कच्ची खाल्ल्याने जठरात जड वाटते व पोटही फुगल्यासारखे वाटते. त्यामुळे पोटात दुखते. सर्दी झाली असता केळी खाणे हितावह नसते. भरपूर जेवल्यानंतर केळी खाऊ नये. केळी खाऊन लगेच पाणी पिऊ नये. त्यामुळे सर्दी होते. केळी खाल्ल्यानंतर थोडी वेलची खाल्ली पाहिजे. वैज्ञानिक मताप्रमाणे केळ्यात भरपूर स्टार्च असते. केळ्यात वीस ते बावीस टक्के  काबरेहायड्रेट असते. हे प्रमाण इतर फळांच्या तुलनेत अधिक असते. त्यात जीवनसत्त्वे पुष्कळ प्रमाणात असतात.  केळ्यांमध्ये क्लोरिन, तांबे, लोह, मँगनीज, पोटॅशियम, सोडियम, गंधक, सिलिका वगर उपयोगी व पौष्टिक खनिज पदार्थ असतात. याशिवाय त्यात कॅल्शियम व मॅग्नेशियमचे प्रमाण फॉस्फरसपेक्षा अधिक असते.केळ्याचे भानोले
साहित्य : पिकलेले केळे २ नग, नारळाचे दूध १ वाटी, जाडसर तांदळाचे पीठ अर्धी वाटी, वेलची पावडर १ चमचा, मीठ चिमूटभर, साखर १ चमचा, जाड रवा २ चमचे.
कृती : सगळे जिन्नस एकत्र करून मिक्सरमध्ये एकजीव करा व बीडाच्या तव्यावर जाडसर भोनोले तयार करून रबडीबरोबर सव्‍‌र्ह करा.
टीप : भानोले म्हणजेच, थोडक्यात उत्तपमप्रमाणे तयार करावेत.

फलधारी कोफ्ता
साहित्य : कच्ची केळी चार ते पाच नग, रेड ग्रेव्ही १ वाटी, गरम मसाला १ चमचा, आलं-लसूण पेस्ट २ चमचे, तिखट १ चमचा, हळद छोटा अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, धने-जिरे पावडर १-१ चमचा, भाजलेली कणीक २-३ चमचे, तळायला तेल पाव वाटी
कृती : एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात थोडी हळद व मीठ घालावे व या पाण्यात केळ्याचे दोन तुकडे करून भिजवून घ्यावेत. साल काढून हे केळे कुस्करून घ्यावे. यात आलं-लसूण पेस्ट, धने-जिरे पावडर, तिखट, हळद, मीठ चवीनुसार घालून एकजीव करून घ्यावे. भाजलेल्या कणकीच्या साहाय्याने गोळे करून मंद आचेवर तळून घ्यावे. फ्राय पॅनवर ग्रेव्ही घेऊन पाणी घालून गरम करून त्यात कोिथबीर व तळलेले कोफ्ते घालून पोळीबरोबर सव्‍‌र्ह करावे.
टीप : १) कोफ्ते चिकट होऊ नयेत म्हणून आपण भाजलेल्या कणकेचा वापर करू शकतो. कणकेऐवजी तुम्ही कॉर्नस्टार्चचाही वापर करू शकता. तसे केल्यासही ग्रेव्ही स्वादिष्ट होते.
रेड ग्रेव्ही तयार करण्याकरिता साहित्य : पाव किलो टोमॅटोची प्युरी (त्याकरिता टोमॅटो बारीक चिरून उकडून घ्यावे किंवा वाफवावे. यात वरून पाणी घालू नये. अंगच्याच पाण्याने शिजवणे, त्यामुळे प्युरी घट्ट होईल. मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून चाळणीतून गाळून घ्यावी.)
काजू मगज पेस्ट ३ वाटय़ा (१ वाटी काजू व २ वाटय़ा मगज स्वच्छ पाण्यात घेऊन १५-२० मिनिटे उकळावेत. त्यानंतर स्वच्छ धुऊन मिक्सरमध्ये बारीक करावेत.) आलं-लसणाचे द्रावण १ वाटी, धने पावडर १ चमचा, जिरे पावडर १ चमचा, कसुरी मेथी १ चमचा, खडा मसाला पावडर १ चमचा, हळद पाव चमचा, मीठ, साखर व तिखट चवीप्रमाणे, रेड ऑरेंज रंग छोटा अर्धा चमचा, व्हिनेगर २ चमचे, तेल अर्धी वाटी, तेजपान ३-४.
कृती : पातेल्यात तेल घेऊन, ते गरम झाल्यावर आलं-लसणाचे द्रावण टाकावे. मिश्रण उकळल्यावर, पारदर्शक झाल्यावर, तयार केलेली टोमॅटो प्युरी, काजू मगज पेस्ट घालून थोडेसे पाणी व तेजपान घालावे. मिश्रणाला तेल सुटल्यावर उर्वरित सर्व मसाले, मीठ घालून पुन्हा उकळी येईस्तोवर किंवा तेल सुटेस्तोवर परतावे. ग्रेव्ही थंड करून फ्रिजमध्ये ठेवावी.

क्रिस्पी बनाना
साहित्य : ४-५ केळांची स्वच्छ धुतलेली साल, कॉर्नस्टार्च अर्धी वाटी, मीठ चवीनुसार, आलं, लसूण पेस्ट १ चमचा, अध्र्या लिंबाचा रस, चाटमसाला
१ चमचा, तिखट १ चमचा,
तेल तळायला.
कृती : केळाची साल स्वच्छ धुऊन त्याच्या छान बारीक लांब पट्टय़ा कापून घ्याव्यात. त्याला िलबू, मीठ, आलं-लसूण पेस्ट चोळून ठेवावी. त्यानंतर कोरडय़ा कॉर्नस्टार्चमध्ये घोळवून डीप फ्राय करावे. वरतून चाट मसाला लावून सव्‍‌र्ह करावे.

केळ्याच्या चकल्या
साहित्य : केळी १ डझन, साबुदाणा १ वाटी, जिरे १ चमचा, मीठ अर्धा चमचा, अर्धा लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर पाव वाटी.
कृती : कच्ची केळी शिजवून गार झाल्यावर साले काढून घ्या. नंतर मिक्सर अथवा पुरणयंत्रातून बारीक करून घ्या. त्यात एक वाटी साबुदाणा भिजवून ठेवा. त्यात जिरं, मीठ, चिरलेली कोथिंबीर घालून चांगले एकत्र करा आणि प्लास्टिकच्या कागदावर चकल्या पाडा आणि उन्हात वाळवा.रेशमी बनाना
साहित्य : मोठय़ा आकाराची केळी ४ नग, साखर १ वाटी (तव्यावर ब्राऊन होईस्तोवर परतून घ्यावी), काजू, किसमिस ४ चमचे, कॉर्नस्टार्च ५ चमचे, तेल (रिफाइंड व्हे. ऑइल) तळायला, आइस्क्रीम स्लाइस २.
कृती : केळी सोलून त्याचे २ भाग करावेत व मधून पोखरून त्यामध्ये ब्राऊन शुगरबरोबर काजू, किसमिससुद्धा घालावे. अशी तयार झालेली केळी कॉर्नस्टार्चच्या द्रावणात बुडवून तळून घ्यावी. गरम तव्यावर साखर घालून कॅरामलसारखं करावे. त्यात केळी बुडवावी. एका प्लेटमध्ये फ्रेश क्रीम किंवा आइस्क्रीम ठेवून त्यावर केळी ठेवून खायला द्यावी.

बनाना रायता
साहित्य : केळी ५ नग, घट्ट दही २ वाटय़ा, लिंबू अर्धा नग, मीठ अर्धा चमचा, साखर अर्धा चमचा, बारीक चिरलेली हिरवी मिरची २ चमचे, बारीक चिरलेली कोथिंबीर पाव वाटी
कृती : केळ्यांचे काप करून त्याला लिंबू चोळून ठेवणे. त्यानंतर दही घट्ट घोटून घेणे. त्यात केळ्यांचे काप, दही, मीठ, साखर, मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर घालून सव्‍‌र्ह करणे.
टीप : केळाला लिंबू चोळल्याने केळे काळे पडत नाही. वाटल्यास यात भिजलेले जिरेसुद्धा घालू शकतो.