केळी हे सर्व हंगामात दिसणारं आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारं फळ. केळ्यात पुष्कळ जीवनसत्त्व असतात. केळी नुसती खाणं चांगलंच. पण केळ्याचे पदार्थ म्हटल्यावर शिकरण आणि वेफर्सपलिकडे आपली मजल जात नाही. याच केळ्यापासून बनवलेले काही वेगळे पदार्थ आजच्या मेन्यू कार्डमध्ये खास तुमच्यासाठी.
केळांच्या उत्पन्नाच्या बाबतीत भारताचा पहिला क्रमांक लागतो. सर्वात उत्तम जातीच्या केळ्यांची पदास भारतातच होते. भारतात सर्वच भागांत केळी होतात. केळ्याचे मूळ स्थान भारत व दक्षिण आशियाचा प्रदेश आहे. आशियामध्ये चार हजार वर्षांपेक्षा अधिक काळापासून केळीचे उत्पन्न होत आहे. ठाणे जिल्ह्य़ातील वसईपासून अगदी थेट आगाशी, सुरत, बलसाड जिल्ह्य़ार्प्यतच्या प्रदेशांत लाखो मण केळ्यांची पदास होते. कच्ची केळी पचण्यास जड असतात. केळी कच्ची खाल्ल्याने जठरात जड वाटते व पोटही फुगल्यासारखे वाटते. त्यामुळे पोटात दुखते. सर्दी झाली असता केळी खाणे हितावह नसते. भरपूर जेवल्यानंतर केळी खाऊ नये. केळी खाऊन लगेच पाणी पिऊ नये. त्यामुळे सर्दी होते. केळी खाल्ल्यानंतर थोडी वेलची खाल्ली पाहिजे. वैज्ञानिक मताप्रमाणे केळ्यात भरपूर स्टार्च असते. केळ्यात वीस ते बावीस टक्के काबरेहायड्रेट असते. हे प्रमाण इतर फळांच्या तुलनेत अधिक असते. त्यात जीवनसत्त्वे पुष्कळ प्रमाणात असतात. केळ्यांमध्ये क्लोरिन, तांबे, लोह, मँगनीज, पोटॅशियम, सोडियम, गंधक, सिलिका वगर उपयोगी व पौष्टिक खनिज पदार्थ असतात. याशिवाय त्यात कॅल्शियम व मॅग्नेशियमचे प्रमाण फॉस्फरसपेक्षा अधिक असते.केळ्याचे भानोले
साहित्य : पिकलेले केळे २ नग, नारळाचे दूध १ वाटी, जाडसर तांदळाचे पीठ अर्धी वाटी, वेलची पावडर १ चमचा, मीठ चिमूटभर, साखर १ चमचा, जाड रवा २ चमचे.
कृती : सगळे जिन्नस एकत्र करून मिक्सरमध्ये एकजीव करा व बीडाच्या तव्यावर जाडसर भोनोले तयार करून रबडीबरोबर सव्र्ह करा.
टीप : भानोले म्हणजेच, थोडक्यात उत्तपमप्रमाणे तयार करावेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा