आय जस्ट लव्ह चॉकलेट! चॉकलेट आइस्क्रीमचे कुठलेही प्रकार जसे व्हाइट चॉकलेट, डार्क चॉकलेट वगैरे मला खूप आवडतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत मित्र-मैत्रिणींना भेटायचे झाले तर आम्ही कोणाच्या तरी घरीच भेटतो. उन्हात बाहेर जाणे टाळतो. कॉटन, मलमलचे कपडे वापरायला बरे वाटतात. टॉमेटोचा गर चेहऱ्याला लावते, चेहरा तजेलदार राहतो.
श्रीया जोशी


रखरखत्या उन्हात खाण्या-पिण्याचे बदल करणे गरजेचे आहे, असे मला वाटते. एरव्ही मी नॉन-व्हेज खातो, पण उन्हाळ्यात कंप्लीट व्हेज फूड. थंडगार फळांचा ज्यूस प्यायला आवडतो. शक्यतो एअरेटेड ड्रिंक टाळतो. उन्हात बाहेर पडताना गॉगल लावतोच.
मंदार सामंत

Jaggery in India
जागतिक स्तरावर केले जाते आरोग्यदायी गुळाचे सेवन; घ्या जाणून…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Why papaya is the perfect fruit in winter season as per Ayurveda papaya juice benefit in winter
हिवाळ्यात ‘पपईचा ज्यूस’ प्रत्येकानं प्यायलाच हवा; फायदे वाचून आश्चर्यचकित व्हाल
Find out if you should have curd on an empty stomach Benefits when had on an empty stomach
रोज सकाळी रिकाम्या पोटी दही खाल्ल्यानं आरोग्यावर काय परिणाम होतात? आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आश्चर्यकारक फायदे
how to get rid of shoe smell instantly
तुमच्या शूजमधून येणारी दुर्गंधी काही मिनिटांत होईल गायब, फॉलो करा फक्त ‘या’ ५ सोप्या टिप्स
Uber driver offer different facilities
‘फ्लाइटपेक्षा उत्तम…’ कॅबमध्ये खाण्यापिण्याची सोय पाहून प्रवासी झाला खूश; PHOTO शेअर करीत म्हणाला…
Valentine Special Lava Cake Recipe in Marathi
१४ फेब्रुवारीला द्या तुमच्या जोडीदाराला सरप्राईज, ‘व्हॅलेंटाईन स्पेशल लाव्हा केक’ बनवा घरच्या घरी
Why you should eat your meals in the sun right time to consume breakfast lunch and dinner
जर तुम्ही दररोज सूर्यप्रकाशात बसून जेवण केलं तर शरीरावर काय परिणाम होईल? आहारतज्ज्ञांनी सांगितली माहिती


घामाचा त्रास कमी होण्यासाठी मी रुमालात कोलोन वॉटर घालून रुमाल वापरतो. लाइट रंगाचे थोडे लूज शर्ट किंवा टीशर्ट वापरायला बरे वाटतात. खाण्यात विशेष असे काही बदल करत नाही, पण पाणी पिण्याचे प्रमाण मात्र उन्हाळ्यात वाढवतो. आइस्क्रीमपेक्षा कोल्ड्रिंक जास्त आवडते.
गौरव गोडबोले


हाशहुश करत, घाम पुसत उन्हाळ्याचे आगमन तर झाले आहे. अंगाचे पाणी पाणी होणाऱ्या या उन्हाळ्याचे स्वागत तर आपण केव्हाच केले. पण हाऊ टु बीट द हीट? याचे उत्तर आपल्याला काही मित्र-मैत्रीणींनी आइस्क्रीम किंवा कोल्ड्रिंक असे दिले आहे. चला तर जाणून घेऊया या सीझनमधले आवडते आइस्क्रीमचे फ्लेवर्स आणि गरमीपासून वाचण्याचे काही उपाय.
या सीझनमध्ये माझे आवडते फ्लेवर्स आहेत फ रेरो रॉशर आणि अमेरिकन नट्स. थंडगार आइस्क्रीम्स दुपारी किंवा रात्री जेवण झाल्यावर खायला मला खूप आवडतं. तसेच पाणी जास्तीतजास्त पिणे हे महत्त्वाचे. दिवसभरात दोन-तीनदा तरी मी गुलकंद खाते, उन्हाळ्यात ते खूप चांगले. उन्हाची वेळ टाळून शक्यतो मी घराबाहेर पडते. शरीराला थंड म्हणून आई मला पाण्यातून सब्जा घ्यायला सांगते.
किन्नरी जावडेकर


लिंबू सरबत हे माझे उन्हाळ्यातले फेव्हरेट ड्रिंक. उन्हापासून संरक्षण म्हणून बाहेर जाताना मी टोपी किंवा छत्री आवर्जून नेते. तेलकट खाणे टाळते, त्याने काही काही वेळा त्रास होऊ शकतो. उन्हाळ्यात काहीही खावेसे कमीच वाटते. म्हणून माझा भर लिक्वीड इनटेककडे जास्त असतो.
अनुजा ढेरे


दुपारच्या वेळेत भूक लागली की इतर काही खाण्यापेक्षा फळे खातो. आइस्क्रीम हा प्रकारच मला भयंकर आवडतो. पाणी जास्त पितो. फळांचे ज्यूस किंवा मिल्कशेक प्यायला आवडतो. शक्यतो कॉटनचे कपडे वापरतो.
-अजिंक्य भागवत


कोल्ड्रिंक, आइसक्रीमसारखे थंडगार पदार्थ उन्हाळात छान वाटतात. मी विशेष असे काही बदल करत नाही. पण अगदी बेसिक म्हणजे लूज कपडे घालणे, लाइट रंगाचे शर्ट बरे वाटतात. जीन्सच्या ऐवजी बर्मुडा, थ्रीफोर्थ घालणे. दिवसातून दोनदा अंघोळ करतो.
अखिलेश नेर्लेकर

Story img Loader